Site icon InMarathi

सज्ज व्हा, आता २०० रुपयाची नवी नोट येतेय!

rbi-marathipizza00

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

नोटाबंदी होऊन आज जवळपास सहा महिने पूर्ण झाले, या नोटाबंदीने आपल्याला दिल्या ५०० आणि २००० च्या नवीन नोटा, पण आता सहा महिन्यानंतर आपल्याला बघायला मिळणार आहे २०० रुपयांची नवी नोट! आणि ही कोणती अफवा नसून अगदी सत्य गोष्ट आहे, कारण रिजर्व बँक ऑफ इंडियातर्फे २०० रुपयांच्या नोटींची छपाई सुरु झाल्याची बातमी आहे. ५०० आणि २००० च्या नोटा सुट्टे करून घेण्यात नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन हे पाउल सरकारने उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे.

livemint.com

टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार,

आरबीआय कडून अगदी काही आठवड्यांपूर्वीच २०० च्या नवीन नोटा छापण्याचा आदेश देण्यात आला होता आणि हा आदेश शिरसावंद्य मानून नोटांची शक्य तितकी जास्त आणि लवकर छपाई करण्याचे काम सुरु आहे.

(सदर इमेज ही केवळ संदर्भासाठी वापरण्यात आली आहे. प्रत्यक्षात २०० ची नोट कशी आहे ते अजूनही उघड झालेले नाही.) indiatoday.intoday.in

मध्यंतरी बातमी आली होती की या नोटा जुलै महिन्यात बाजारात उतरवण्यात येतील, परंतु काही कारणांमुळे या मनसुब्यात बदल करण्यात आला आहे. २०० रुपयांच्या नवीन नोटांच्या छपाईचे काम मध्यप्रदेशच्या होशंगाबाद मधील प्रिंटींग प्रेस मध्ये सरकारच्या देखरेखीखाली सुरु आहे.

thequint.com

सुरक्षा आणि गुणवत्ता तपासण्याच्या उद्दिष्टाने या नोटांना अनेक प्रक्रियांमधून जावे लागत आहे. २०० रुपयांच्या या नवीन नोटांमुळे बाजारातील देवाण घेणाव सुलभ होईल अशी आशा व्यक्त होत आहे. २०० रुपयांच्या या नवीन नोटांमध्ये खास सिक्युरिटी फीचर्स आहेत, ज्यामुळे त्यांची नक्कल करणे सोप्पे असणार नाही.

येत्या २-३ महिन्यांत २०० रुपयांच्या या नवीन नोटा तुमच्या आमच्या खिशात स्थिरावतील.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Exit mobile version