' काँग्रेससोबत फिस्कटलं, प्रशांत किशोर यांचे सूचक वक्तव्य; ‘सत्याच्या बाजूने उभं राहण्याची वेळ आली आहे’ – InMarathi

काँग्रेससोबत फिस्कटलं, प्रशांत किशोर यांचे सूचक वक्तव्य; ‘सत्याच्या बाजूने उभं राहण्याची वेळ आली आहे’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काल परवा पर्यंत राजकारणात चर्चा होती की, धूसर होत चाललेल्या काँग्रेस पक्षाला प्रशांत किशोर नवसंजीवनी देतील मात्र झालं उलटच, काँग्रेस पक्ष आणि प्रशांत किशोर यांच्या बैठकीत ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली ते मुद्दे काँग्रेसला मान्य नव्हते, प्रशांत किशोर यांनी ज्या अटी घातल्या त्या बहुदा काँग्रेसला पटल्या नाहीत म्हणून हे गणित काही जुळून आले नाही.

 

congress-plenary-session-inmarathi
dnaindia.com

 

मागच्या वर्षी बंगाल निवडणुकीत ममता दीदींना ज्यांनी निवडून आणले ते प्रश्नांत किशोर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, आजतगायत त्यांनी निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग न घेता पडद्याआड राहून सर्व सूत्र हलवली होती, तेच आता पडद्यासमोर येणार आहेत, काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊयात…

 

prashant kishor inmarathi

 

नेमकं काय म्हणणं आहे प्रशांत किशोर यांचं?

नुकत्याच ५ राज्यांच्या निवडणुका पार पडल्या ज्यात भाजपने ४ राज्यात चांगले यश मिळवले आहे, यावर्षी देखील गुजरात राज्यांच्या निवडणुका असणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष देखील सक्रिय झाले आहेत. आता या निवडणुकीच्या रिंगणात प्रशांत किशोर देखील उतरणार असं दिसतंय….

या संदर्भातील एक ट्विट त्यांनी आपल्या सोशल अकाउंट वर टाकले आहे, त्यात ते असं म्हणत आहेत की, गेल्या १० वर्षांपासून लोकशाहीमध्ये अर्थपूर्ण सहभाग घेऊन लोकांच्या धोरणाला आकार देण्याचा माझा प्रयत्न एखाद्या रोलर कोस्टल राईड प्रमाणे आहे.

आज मागे वळून बघता आता वेळ आहे आली आहे खऱ्या मास्टरसोबत जाण्याची, म्हणजे लोकांच्यात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याची आणि जनसुराज कडे वाटचाल करण्याची. याची सुरवात बिहारापासून…

 

kishor im 2

 

सूत्रांच्या म्हणण्यानुसार प्रशांत किशोर यांचा पक्ष पूर्णपणे डिजिटल रूपात असेल, जनसंपर्क वाढवण्यासाठी नवनव्या संकल्पना राबवल्या जाणार आहेत अशी चर्चा आहे. येत्या एक दोन वर्षात ते पक्षाची स्थापना करतील.

कोण आहेत प्रशांत किशोर?

२०१४ साली अब की बार मोदी सरकार हा नारा देण्यामागे प्रशांत किशोर होते, मोदींना सत्तेत आणण्यामागे त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्याकाळात डिजिटल माध्यम अगदी बाल्यावस्थेत होते तेव्हा प्रशांत किशोर यांनी अशी काही कमाल केली आणि भाजप सत्तेत आले.

 

kishor modi im

मूळचे बिहारचे असलेले प्रशांत किशोर संयुक्त राष्ट्र ( UN) मधली नोकरी सोडून २०११ साली गुजरात निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींच्या संपर्कात आले. आणि इथून त्यांचा राजकीय रणनीतीकर आणि ब्रॅण्डिंग या पर्वाकडे वाटचाल सुरवात केली. IPAC नावाची कंपनी देखील त्यांनी सुरु केली आहे. जिचं काम राजकीय रणनीती आखणे, कॅम्पेन चालवणे, ब्रॅण्डिंग करणे इत्यादी.

२०१४ नंतर त्यांचे मोदींशी असलेले संबंध बिघडले तेव्हापासून त्यांनी मोदींना हरवण्याचा एक प्रकारे विडाच उचललेला आहे. येत्या काही दिवसात ते आपला पक्ष काढतील, तो पक्ष २०२४ मध्ये किती यशस्वी होईल ते आपल्याला कळलेच.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?