पेट्रोलचे वाढते भाव आहेतच, आता मात्र जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ देखील होणार महाग!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना घर चालवणे कठीण झाले आहे. खाद्यतेल, स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल, डिझेल यासह दैनंदिन खाद्यपदार्थांच्या किमतीत प्रचंड वाढ होतांना आहे. परंतु याउलट वाढत्या महागाईच्या प्रमाणात सर्वसामान्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली नाही.
महागाईत झपाट्याने वाढ झाल्यामुळे किरकोळ महागाई ७ टक्क्यांच्या जवळ पोहोचली आहे. परंतु एवढी महागाई आता पुन्हा अनेक वस्तुंची किंमत वाढणार आहे…!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
२०१९च्या अखेरमध्ये आलेल्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगभराची अर्थव्यवस्था कोलमडली होती. मागणीमध्ये अचानक घट झाल्याने अनेक उद्योगधंदे बंद पडले होते, तसेच शेतीमध्ये उगवलेले पिकाला पण मागणी नसल्याने ते तसेच नष्ट करावे लागले. परंतु लॉकडाऊन उघडल्यावर ही परिस्थिती अचानकपणे बदलली. जसे-जसे सर्व काही उघडत गेले, तसे-तसे प्रत्येक वस्तुची मागणी वाढत गेली. या कारणामुळे पुन्हा मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याकारणाने वस्तुंच्या किंमती वाढत गेल्या.
यात अजुन एक भर म्हणजे रशिया- यूक्रेन या दोन देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे, या देशांमधून निर्यात होणाऱ्या वस्तुंच्या किंमतीमध्ये झपाट्याने वाढ होतांना दिसत आहे.
तसेच अप्रत्यक्षपणे देखील या युद्धाने दुसऱ्या देशातून निर्यात होणाऱ्या वस्तुंच्या किंमती वाढवल्या आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहे त्या वस्तूविषयी ज्यांच्या किंमतीमध्ये मागील काही दिवसांपासून प्रचंड वाढ होतांना दिसत आहे.
इंडोनेशिया या देशाने खाद्यतेलाची(पामतेल) निर्यात बंद केली आहे. भविष्यात याचा थेट प्रभाव भारतासह अनेक देशांवर दिसून येणार आहे. विशेषत: भारतीयांसाठी ही बातमी अधिक त्रासदायक ठरू शकते कारण देशात खाद्यतेल महागणार आहे.
भारत इंडोनेशियामधून ७० टक्के पाम तेल आणि मलेशियामधून ३० टक्के तेल आयात करतो. देशात सुमारे ९ दशलक्ष टन पामतेल इंडोनेशिया आणि मलेशियामधून येते आणि इंडोनेशियातून निर्यात बंद झाल्यामुळे देशात पाम तेलाची उपलब्धता कमी होईल, ज्यामुळे येथे महागाई वाढेल.
एफएमसीजी आणि सौंदर्य प्रसाधने बनवणाऱ्या कंपन्या पाम तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात, त्यामुळे यांच्या वस्तुंचे किंमतीमध्ये वाढ होण्याची संपूर्ण शक्यता आहे.
युक्रेन-रशिया हे सुर्यतेलाचे सगळ्यात जास्त उत्पादन करणारे देश आहे. परंतु या देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे सूर्यफुलाचे तेल प्रचंड महाग झाले आहे, तर मोहरीच्या तेलाच्या किमतीमध्ये कमालीची वाढ झाली आहे.
सोयाबीनचे सगळ्यात जास्त उत्पादन दक्षिण अमेरिकी देशांमध्ये होते, परंतु मागील काही वर्षांपासून या प्रदेशामध्ये सातत्त्याने दुष्काळ पडत आहे. त्यामुळे सोयाबीनच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे सोयाबीन च्या तेलाच्या किंमती पण वाढल्या आहेत.
–
- वेळीच सावरलं नाही, तर आपल्या शेजारील आणखीन एका राष्ट्रावर ओढवेल आपत्ती
- पेट्रोल दरवाढीमागची कारणं, सरकारची भूमिका आणि भविष्यातील पर्याय
–
पामतेलाच्या निर्यातीवरील बंदीमुळे अडचणी वाढणार आहेत. पाम तेलाचा वापर सामान्यतः खाद्यतेल म्हणून केला जातो, याशिवाय, ते शाम्पू, टूथपेस्ट, आंघोळीचे साबण, व्हिटॅमिन गोळ्या, कॉस्मेटिक उत्पादने, केक आणि चॉकलेट इत्यादीसारख्या अनेक उद्योग उत्पादनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. याचबरोबर केक, बिस्किटे, चॉकलेटपासून शाम्पू-साबण अशा अनेक ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमती पण वाढणार आहेत.
आधीच जनता महागाईने त्रस्त आहेत, वाढत्या इंधन दरामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातला वाद संपेना, त्यामुळे सामान्य जनता यात होरपळी जात आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.