Site icon InMarathi

शेअर मार्केट कोसळत असताना प्रत्येक मध्यमवर्गीयाने ‘ही’ स्ट्रॅटेजी आमलात आणायलाच हवी

share market crash featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एखादी पार्टी असो वा कट्ट्यावरील मित्रांचा अड्डा, त्यात शेअर मार्केटमधील गुंतवणूक हा विषय हमखास ऐकू येतो. मग काही अनुभवी लोकं इतरांना टिप्स देतात आणि नवोदितांना अधिक हुरूप येतो. त्यातून गुंतवणूकीला सुरुवात होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

शेअर बाजाराच्या आधाराने नफा झालेल्यांची उदाहरणं कौतुकाने पाहताना त्याचवेळी नाण्याची दुसरी बाजुही पडताळणे तितकेच आवश्यक आहे.

 

policenama

 

अनेकदा शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याच्या बातमीने आपल्या दिवसाची सुरुवात होते, आणि अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. ही घसरण का होते? यामागे वेगवेगळी कारणे आहेत. मात्र त्याचा थेट परिणाम गुंतवणूकदारांना होतो हे मात्र नक्की!

कोरोना महामारी, रशिया-युक्रेन युद्ध, अफगाणिस्तानातील गंभीर स्थिती यांसारख्या अनेक संकटांत शेअर बाजारातील आर्थिक नुकसानीची झळ अनेकांनी सोसली आहे. अशावेळी आमचा पैसा गुंतलेला आहे. शेअर तर पत्त्यासारखा कोसळत आहे. सेफ राहायचं तरी कसं? हा प्रश्न अनेकांना पडतो.

अशा परिस्थितीत ज्यांचं उत्पन्नच मूळ शेअर मार्केट मधून आहे आणि जे नवीन गुंतवणूकदार आहेत त्यांना मोठा फटका बसतो. पण एक लक्षात ठेवा,

ही परिस्थिती काय पहिल्यांदाच नाही आलेली. आणि ती काय कायम राहणारी देखील नाही. फक्त या परिस्थितीत सरव्हाईव्ह करता आलं पाहिजे.

मग आता नेमकं करायचं तरी काय? य़ाबाबतचे महत्वाचे मार्गदर्शन गुंतवणूक तज्ञ नीरज बोरगावकर यांनी केले आहे.

 

jagran.com

 

आता अशा परिस्थितीत पैसा परत आणण्या साठी किंवा नवीन गुंतवणूक करण्यासाठी एक स्ट्रॅटेजी आपण ठेवू शकतो. क्रमशः जा आणि गुंतवणुकीत विविधता आणा. घाबरून शेअर विकण्यापेक्षा एक्स्पोजर साठी संधी शोधा.

शेअर मार्केट पडले याचा अर्थ ज्यांचा पैसा गुंतलेला आहे त्यांना तोटा आणि जे संधी शोधत असतात त्यांना फायदा असं आपण म्हणून शकतो.

नवीन गुंतवणूक करण्यासाठी आणि गुंतवलेला आपला पैसा वाचवण्यासाठी आपण पुढील पद्धतीचा अवलंब करू शकतो.

१.लॉंग टर्म गुंतवणूक

 

smartasset.com

 

शेअर मार्केट मध्ये खेळत असाल तर हा बेसिक रुल आहे.शेअर मार्केट पडले काय आणि वधारले काय,ज्यांची ही स्ट्रॅटेजी असते त्यांना काही एक फरक पडतो नसतो.

१९९५ ला ५००० गुंतवून २०१५ पर्यंत ३ करोड कमावले,अशा अनेक शेअर मार्केट मधल्या कथा आपण ऐकल्या असतीलच. पेशन्स नावाची गोष्ट इथे कामी येते.

मार्केट जरी पडलं असेल तरी घाबरण्याचे काही कारण नाही. पैसा गुंतलेला असेल तर मार्केट वरती जाण्याची वाट बघा आणि जर नवीन गुंतवणूकदार असाल तर कवडी मोल भावात पण शेअर आता मिळत आहेत.

२. हळूहळू गुंतवणूक करत जा

 

inc.com

 

एक फिक्स ठराविक रक्कम ही एका ठराविक शेअर मध्ये गुंतवत जा.

याचा फायदा असा की, समजा त्या ठराविक शेअर चा भाव पडला तर जास्तीचे शेअर खरेदी करता येतात किंवा भाव वाढला तर कमी शेअर घेता येतात!

पण त्याची बॉण्ड व्हॅल्यू ही जास्त असते.आणि या गुंतवणूक लॉंग टर्म असतील याची विशेष काळजी घ्या.

कारण पॉलिसी,म्युचल फंड्स आणि शेअर मार्केट यात गुंतवलेला पैसा लॉंग टर्म जेवढा असेल तेवढी त्याची रिटर्न व्हॅल्यू जास्त असते.

३. चक्रवाढ व्याजाचा फायदा घ्या

 

medium

 

बाजारात येणाऱ्या योग्य वेळे पेक्षा जास्तीचा दिलेला वेळ हा महत्वाचा असतो. तुम्ही केलेल्या शिस्तबद्ध गुंतवणूकीच्या व्याजावर व्याज घेणे हे सध्याच्या पडझडीच्या काळात असलेलं शहाणपण आहे.

४. विविधता,विविधता आणि विविधता.

काही शेअर मार्केट चे खिलाडी हे एका ठराविक शेअर ब्रँड साठी प्रसिद्ध असतात. स्टील,फार्मा,ऑइल आणि पेट्रोलियम,आयटी असे बरेच.

पडतीच्या काळात गुंतवणूक करताना कमी किंमतीच्या, निष्क्रिय व्यवस्थापन असलेले किंवा एक्स्चेंज ट्रेंड फंड्स मध्ये गुंतवणूकीचा विचार करा.

जे तुम्हाला मल्टिपल आणि वाईड रेंज शेअर्स उपलब्ध करून देतील.

शेअर मार्केट चे अनुभवी गुंतवणूकदार म्हणतात,

ही वेळ काय कायम राहणारी नाही. मार्केट मध्ये तणाव आहेच पण त्यामुळे स्वतःवर त्याचा परिणाम होऊ देऊ नका.

 

 

जास्तच पैशाची गरज असेल तर आपले स्टेक विकून पैसा तुम्ही जमवू शकता. पण विनाकारण पॅनिक होऊन स्टेक विकायच्या भानगडीत पडू नका.

दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकीसाठी योग्य स्टॉक कसा ओळखायचा हे गुंतवणूकदारासमोर असलेले सर्वात मोठे आव्हान आहे.

कंपनीची मूलतत्त्वे मजबूत असली पाहिजेत परंतु भविष्यातील वाढ त्याच्या परताव्याच्या संभाव्यतेबाबत निर्णय घेण्यास अधिक गंभीर होईल, ज्या कंपन्या कच्च्या तेलाचा वापर कमी क्रूड दराचा फायदा होण्यासाठी कच्च्या मालाच्या रुपात करतात, त्यांना मार्जिन सुधारण्यास लवकर मदत होईल.

अशा प्रकारे संधी शोधून आणि थोडा अभ्यास करून शेअर निवडून त्यात गुंतवणूक करून चांगला परतावा आपण मिळवू शकतो.

५. दीर्घकालीन दृष्टिकोन

 

the economic times

 

मार्केट पडलं आहे मान्य पण ते पुढील महिना-दोन महिन्यात वरती जाण्याची शक्यता पण तेवढीच आहे. शेअर मार्केटच्या इतिहासात सुद्धा असे अनेक चढउतार आलेले आहेत आणि जर नवीन गुंतवणूकदार असाल तर गुंतवणूकी साठी आता उत्तम वेळ आलेली आहे.

६. योग्य वेळ कशी ओळखाल?

आपण जर नॉर्मल गुंतवणूकदार असल्यास आपण उच्च जोखीम गुंतवणूकीत येऊ नये.

 

NH websites

 

अशा घसरण झालेल्या बाजारपेठेत गुंतवणूक करणे केवळ अशा गुंतवणूकदारांनाच अनुकूल ठरेल ज्यांना जास्त रिस्क घ्यायची कपॅसिटी आहे आणि काही अल्प ते मध्यम मुदतीची हानी सहन करण्यास तयार आहेत.

नाही म्हटलं तरी शेअर मार्केट मध्ये सध्या तरी टायमिंग महत्वाचे आहे. योग्य वेळेची वाट पहा त्यानुसार गुंतवणूक करा आणि योग्य ते रिटर्न्स मिळवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version