‘तुमचे मौन अस्वस्थ करणारे आहे, द्वेषाचे राजकारण थांबवा’! १०८ माजी शासकीय अधिकाऱ्यांचे मोदींना पत्र
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मंडळी..आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून धर्म-जात यांच्या नावावर राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू आहे.मग ते अजानच्या नावाने असो की हनुमान चालीसावरून.. राजकारण याचभोवती फिरते हे नक्की!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
गेल्या काही आठवड्यांपासून देशभरातील अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये सांप्रदायिक हिंसाचाराच्या घटना नोंदवल्या जात असताना, देशातील काही माजी नोकरशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून या घटनांविरोधात कारवाई करण्यास सांगितले .
काय होते हे पत्र ? आणि काय केली पंतप्रधानांकडे मागणी? चला पाहुयात..
*मोदीजी..पत्रास कारण की..
या माजी नागरी सेवकांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे की… ‘भारतात गेल्या काही दिवसांपासून जे राजकारण चालले आहे ते द्वेषाचे आहे. ते द्वेषाचे राजकारण संपले पाहिजे. भारतातील जातीय हिंसाचारावर पंतप्रधान मोदी यांनी घेतलेला मौन पवित्रा हा बधिर करणारा आहे.
या धार्मिक द्वेषाच्या किंवा द्वेषाच्या राजकारणाच्या घटना फक्त भाजपशासित राज्यांमध्येच घडत आहेत’. एवढ्यावर न थांबता त्यात माजी नोकरशहांनी असे लिहिले की “आम्ही देशात द्वेषाने भरलेल्या विनाशाचा उन्माद पाहत आहोत जिथे त्यांच्या अंमलाखाली केवळ मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समुदायांचे सदस्य नाहीत तर आपले संविधानदेखील आहे”.
पीटीआयच्या वृत्तानुसार पत्रात असेही लिहिले आहे की,
“माजी नागरी सेवक या नात्याने, टोकाच्या शब्दांत आपली अभिव्यक्ती करण्याची आमची इच्छा नसते, परंतु आमच्या संस्थापकांनी निर्माण केलेल्या घटनात्मक वास्तूचा ज्या अथक गतीने विध्वंस होत आहे, तो विध्वंस आम्हाला बोलण्यास भाग पाडत आहे.त्यामुळे आम्ही आमच्या राग आणि वेदना व्यक्त करत आहोत.
त्यात पुढे म्हटले आहे, “गेल्या काही वर्षांत आणि महिन्यांत अल्पसंख्याक समुदायांविरुद्ध, विशेषतः मुस्लिमांविरुद्ध द्वेषपूर्ण हिंसाचार वाढला आहे .आसाम, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड ही सर्व राज्ये. ज्यामध्ये दिल्ली (जेथे केंद्र सरकार पोलिसांवर नियंत्रण ठेवते) वगळता भाजप सत्तेत आहे तिथे भयावह परिस्थिती आहे.
*त्या १०८ नोकरशांमध्ये या व्यक्तींचा समावेश.
बर हे पत्र लिहिले त्यात एवढं मोठं काय असे तुमच्या मनात जर येत असेल तर आता आपण त्या पत्र लिहिणारे नक्की आहेत कोण ते पाहुयात..
पत्र पाठवणाऱ्यांमध्ये दिल्लीचे माजी उपराज्यपाल नजीब जंग, माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन, माजी परराष्ट्र सचिव सुजाता सिंग, माजी गृहसचिव जीके पिल्लई आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे प्रधान सचिव टी.के.ए नायर यांच्यासारख्याच देशातील मान्यवर व्यक्तींपैकी एकूण १०८ जणांनी या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.
*हीच आमची आशा आहे…
पत्राचा समारोप करताना त्यांनी स्वाक्षऱ्यांनी पंतप्रधान मोदींना विनंती केली की, ‘आझादी का अमृत महोत्सवाच्या या वर्षी पक्षपाती विचारांच्या वर विचार करावा. तुम्ही तुमच्या पक्षाच्या नियंत्रणाखालील समुदायाला आवाहन करून द्वेषाचे राजकारण संपवण्याची विनंती कराल अशी आमची आशा आहे.’
–
‘वाढती मुस्लिम लोकसंख्या आणि हिंदू वास्तव’
राजकारणात येण्यापूर्वी तुमचे आवडते हे ‘१० नेते’ काय करायचे माहित आहे?
–
थोडक्यात काय तर आजच्या राजकारणात सामाजिक समस्या,रस्ते,बरोजगारी, महागाई यापेक्षाही धर्म-जात आणि त्यांच्या भावना मोठ्या झालेल्या पाहण्यास मिळत आहे.त्यामुळे स्वतः पंतप्रधानांनी या बाबतीत पुढाकार घेऊन ‘सर्वधर्म समभाव’साठी सुरवात करावी असे या पत्रातून सुचवण्यात आले आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.