Site icon InMarathi

”छोटी बच्ची हो क्या” सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या मिम्समागील भन्नाट गोष्ट

meme im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जॅकी श्रॉफचा मुलगा इंडस्ट्रीत पदार्पण करतोय म्हटल्यावर ‘हिरोपंती’ या चित्रपटाच्या वेळेस प्रेक्षकांच्या नजरा टायगर श्रॉफकडे वळल्या नसत्या तर नवलच होतं. या स्टारकिडने अगदी कमी वेळात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं खरं. पण ‘हिरोपंती’चं नाणं काही बॉक्स ऑफिसवर खणखणीत वाजलं नाही.

 

 

टायगरच्या ऍक्शन सिक्वेन्सेसची, त्याच्या कमाल नृत्य कौशल्यांची बरीच चर्चा आजवर होत आलेली आहे. मात्र त्यामानाने त्यांच्या दिसण्याविषयी, अभिनयाविषयी फारसं बोललं गेलेलं नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

टायगरच्या वाट्याला खरंतर कौतुकापेक्षा टीकाच अधिक आलेली आहे. काहींना तो आवडतो मात्र अनेकांना नाही. असं सगळं असताना टायगर श्रॉफ सध्या अचानक चर्चेत येण्यामागे नेमकं काय कारण आहे?

‘हिरोपंती’ या त्याच्या पहिल्या चित्रपटात “छोटी बच्ची हो क्या” असा एक अगदी साधारण संवाद होता. त्यावेळी या संवादाची कुणी दखलही घेतली नव्हती. पण नेमका हाच संवाद तब्बल ८ वर्षांनी नव्याने चर्चेत आलाय.

 

 

सोशल मीडियावर “छोटी बच्ची हो क्या” या संवादाच्या मिम्सनी चांगलाच धुमाकूळ घातलाय. पण टायगर मुळे हे घडलेलं नसून टायगरची नक्कल करणाऱ्या एका सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसरमुळे हे घडतंय. या मिम्समागची भन्नाट गोष्ट नेमकी आहे तरी काय? जाणून घेऊ.

१३ फेब्रुवारीला दीपेंद्र सिंग या मिमिक्री आर्टिस्टने टायगर श्रॉफची नक्कल करत “छोटी बच्ची हो क्या” हा डायलॉग त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता.

 

 

दीपेंद्र सिंगने यापूर्वी परेश रावल, सलमान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, अजय देवगण, संजय दत्त, अक्षय कुमार, सोनू निगम या कलाकारांच्या नकला करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. पण त्याने केलेल्या टायगर श्रॉफच्या नकलेमुळे त्याने प्रेक्षकांची मनं खऱ्या अर्थाने जिंकून घेतली आणि त्याची ही मिमिक्री काहीच दिवसांत सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली.

 

 

केवळ व्हायरल होण्यावरच ती थांबली नाही तर आपली अफलातून क्रिएटिव्हिटी दाखवत नेटकऱ्यांनी “छोटी बच्ची हो क्या” या डायलॉगवरच्या मिम्सचा सोशल मीडियावर अक्षरश: पाऊस पाडला.

बऱ्याचदा गोष्टी अशा अचानक व्हायरल होतात आणि काही काळाने थंडावतात. मात्र या खेपेला काहीतरी निराळंच घडलंय. खरा गंमतीचा भाग तर इथून पुढे सुरू होतो. टायगर श्रॉफसारख्या एका फारश्या लोकप्रिय नसलेल्या कलाकाराला आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चक्क या मिमिक्री आर्टिस्टचाच सहारा घ्यावा लागतोय.

आपला हा डायलॉग प्रचंड व्हायरल होतोय हे टायगरला कळलं पण तो का व्हायरल होतोय, कुणामुळे होतोय हे सुरुवातीला त्याच्या गावीही नव्हतं. ‘हिरोपंती’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या ट्रेलर लॉन्चला त्याने हे सांगितलं. पण ‘कुठलीही प्रसिद्धी ही चांगली प्रसिद्धी’ या तत्त्वाला जागत पठ्ठ्याने आपला व्हायरल होणारा हा डायलॉग म्हणून दाखवला आणि आयती समोर आलेली हातची संधी सोडली नाही.

टायगरची अकारणच चर्चा झाली. मात्र ही चर्चा होण्यामागे खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरलेल्या दीपेंद्र सिंगची अखेरीस टायगरने भेट घेतली. दीपेंद्रने टायगरसोबतचा आपला फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. शिवाय, “छोटी बच्ची हो क्या” असं टायगरसोबत म्हणत त्या दोघांचं रीलही शेअर केलं आहे.

 

 

दीपेंद्रच्या मिमिक्रीचा फायदा टायगरच्या चित्रपटाला झाला किंवा झाला नाही तरी सरतेशेवटी टायगरने चित्रपटात कसा अभिनय केलाय हेच प्रेक्षकांच्या दृष्टीने महत्त्वाचं असणार आहे. दीपेंद्र सिंग हा मिमिक्री आर्टिस्ट मात्र या सगळ्यात भाव खाऊन जाणार हे नक्की. लगे रहो दीपेंद्र भाई!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version