Site icon InMarathi

तरूणांनो, तुमचं प्रजनन स्वास्थ्य एकदम टकाटक ठेवण्यासाठी ५ महत्वाच्या टिप्स!

sexual health IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

स्त्रियांच्या लौंगिक आरोग्याबाबतीत आपल्याकडे बरीच चर्चा होते. मात्र पुरुषांच्या आरोग्याची चर्चा त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीपुरतीच मर्यादित राहिल्याचं आपल्याला आढळून येतं. स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनादेखील लैंगिक समस्यांचा सामना करावा लागतो. नॉर्मल वजन असलेल्या पुरुषांपेक्षा स्थूल पुरुषांचा स्पर्म काउंट बऱ्यापैकी कमी असतो हे फारसं कुणाला माहीत नसतं.

आपल्या लैंगिक जाणिवांविषयी मुलांची, पुरुषांची काय मतं आहेत हे प्रगल्भपणे समोर येत नाही. एखाद्याला असलेलं वंध्यत्व हे आजही उपहास आणि हेटाळणीचं लक्ष्य बनतं. यामागचं मुख्य कारण म्हणजे प्रजनन करण्याची क्षमता गृहीत धरली जाणं. पुरुषांच्या लौंगिक आरोग्यासंदर्भात बरेच गैरसमज आहेत.

 

 

पुरुष किती सुदृढ आहेत यावर ते प्रजनन करण्यास सक्षम आहेत की नाही हे ठरतं. त्यांची तब्येत चांगली असेल तर त्यांचा ‘स्पर्म काउंट’ म्हणजेच त्यांच्या वीर्यातल्या शुक्राणूंची संख्या जास्त असते. पण पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता महत्त्वाची असली तरी ते प्रजनन करण्यासाठी सक्षम आहेत की नाहीत हे ठरण्यामागचा हा एकमेक घटक नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपल्या लौंगिक आरोग्याची काळजी कशी घ्यायची याचं ज्ञान बऱ्याचदा पुरुषांना नसतं. याच महत्त्वाच्या समस्येवर लक्ष केंद्रित करत सल्लागार प्रसूती तज्ञ आणि स्त्रीरोगतज्ञ असलेल्या डॉ. सुरभी सिद्धार्थ यांनी मिलेनियल जनरेशनच्या पुरुषांचं लैंगिक आरोग्य उत्तम राहावं या दृष्टीने ५ महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

डॉ. सुरभी सिद्धार्थ या खारघरच्या ‘मदरहूड हॉस्पिटल’मध्ये सल्लागार प्रसूती तज्ञ आणि स्त्रीरोगतज्ञ आहेत.

 

 

एचटी लाईफस्टाईलला मुलाखत देताना त्या म्हणाल्या, “तणाव, अनियमित जीवनशैली आणि शारीरिक कसरतीचा अभाव यामुळे हल्ली कुणाला आपल्या लैंगिक आरोग्याकडे लक्ष द्यायला जमत नाहीये. त्यामुळे निकृष्ट दर्जाचं लैंगिक आरोग्य हे मिलेनियल पुरुषांच्या दृष्टीने काळजीचं कारण ठरू शकतं. पुरुषांना लौंगिक आरोग्यासंबंधीच्या बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो.

लैंगिक इच्छा कमी असणे, स्खलन विकार, इरेक्टाइल डिसफंक्शन, जननेंद्रियांशी निगडीत अल्सर्स (जेनिटल अल्सर्स), लैंगिक संक्रमित रोग (सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस), अंडकोषाशी संबंधित विकार (टेस्टिक्युलर डिसॉर्डर्स), पुर:स्थ कर्करोग (प्रोस्टेट कॅन्सर) आणि वंध्यत्व अशांसारख्या समस्या पुरुषांना असू शकतात आणि त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात संघर्ष निर्माण होऊ शकतो.”

पुरुषांना आपल्या लैंगिक आरोग्याची काळजी घेता यावी यासाठी डॉ. सुरभी सिद्धार्थ यांनी ५ टिप्स दिल्या आहेत :

१. संतुलित आहार घ्या –

 

 

सगळी महत्त्वाची पोषकमूल्यं असलेला आहार तुम्ही घेणं महत्त्वाचं आहे. शक्यतो अंडी खा. कारण, अंड्यामध्ये प्रथिनं आणि इ व्हिटॅमिन असतं, त्यामुळे शुक्राणूंची गती सुधारते आणि त्यांच्या संख्येत वाढ होते आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस पासून त्यांचं रक्षण होतं. करवंद (बेरीज्) खा कारण, त्यांच्यात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि स्पर्म काउंट चांगला ठेवायला ती मदत करू शकतात.

पालक खाल्यामुळे शुक्राणूंच्या उत्पादनाला चांगला वाव मिळतो. अक्रोडांमध्ये ओमेगा-३ मेदाम्लं असतात आणि त्यांच्यामुळे शुक्राणूंची गती सुधारायला मदत होते. जंक, पॅकेजिंग केलेल्या आणि डबा बंद खाद्यपदार्थांमुळे समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ते खाणं टाळा.

२. लैंगिक संक्रमित रोगांसंदर्भात नियमित तपासणी –

 

पुरुषांमध्ये एचआयव्ही, सिफिलिस, च्लामीडिया आणि हर्प्स यांसारख्या सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस (लैंगिक संक्रमित रोगां)बद्दल पुरेशी जागरूकता असायला हवी. अजून तरी त्यांच्यावर कुठली लस आलेली नाही. या रोगांपासून आपलं संरक्षण करण्यासाठी त्यांना प्रतिबंध घालणे हा एकच मार्ग आपल्याकडे आहे.

कॉन्ट्रासेप्टिव्ह्जच्या वापरालाही प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. या तपासणीसंदर्भात तुम्हाला डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं लागेल.

३. चांगल्या प्रकारे वैयक्तिक स्वच्छता राखा –

 

 

शरीराखालच्या नाजूक भागांकरता कुठलीही केमिकल प्रॉडक्ट्स वापरणं टाळा. कॉटनसारख्या चांगल्या प्रकारे हवा खेळती राहील अशा कापडांची अंतर्वस्त्रं शक्यतो घाला आणि ती फार घट्ट होत नाहीयेत ना याची खात्री करून घ्या.

४. नियमित व्यायाम –

 

 

यामुळे शुक्राणूंची संख्या वाढायला मदत होऊ शकते. आठवड्यातले किमान ५ दिवस अर्धा तास व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. पोहणे, धावणे, योगा, जिमिंग, ऍरोबिक्स, सायकलिंग यांसारख्या पर्यायांचाही तुम्ही विचार करू शकता. ध्यान करून तणाव मुक्त व्हा.

५. धूम्रपान करणं सोडा –

 

 

धुम्रपानाचा तुमच्या शुक्राणूंच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे धूम्रपान करू नका.

डॉ. सुरभी सिद्धार्थ यांनी मिलेनियल पुरुषांना या टिप्स देऊन निश्चितच एका दुर्लक्षित अशा महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे. आपल्या मित्रांपर्यंत, संपर्कातल्या, नात्यांतल्या पुरुषांपर्यंत या टिप्स नक्की पोहोचवूया.

डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणि योग्य मार्गदर्शन मिळवून यापुढे महिलांबरोबरच पुरुषांनीही न चुकता आपल्या लैंगिक आरोग्याकडे जातीने लक्ष द्यायला हवं.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version