Site icon InMarathi

विल स्मिथसारखे हिंदू धर्मावर गाढ श्रद्धा असणारे ७ हॉलिवूड स्टार्स!

hindu culture featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः । तस्माद्धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोऽवधीत्

मृत धर्म मारणार्‍याचा नाश करतो,आणि संरक्षित धर्म रक्षकाचे रक्षण करतो,म्हणून मारलेला धर्म कधीच आपल्याला मारणार नाही या भीतीने धर्माचे उल्लंघन करू नका.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हिंदू धर्म हा जगातील प्रमुख धर्मांपैकी एक आहे ज्याचे जागतिक अनुयायी १.०३२ अब्ज लोक आहेत. भारतात ज्या धर्माची मुळे अगदी खोल पर्यंत रोवली गेली आहेत, असा हिंदू धर्म जगातील सर्वात जुना धर्म मानला जातो. धर्म हा सनातन हिंदू संस्कृतीचा पाया आहे.

 

 

अगदी पुरातन काळापासून चालत आलेल्या हिंदू संस्कृतीचा प्रभाव केवळ भारतीयांवरच नाही तर परदेशी पाहुण्यांवर देखील झालेला आपल्याला दिसून येतो.

मध्यंतरी मनशांती मिळवण्यासाठी भारतात आलेला हॉलीवूड ऑस्कर विजेता कलाकार विल स्मिथ याने इस्कॉन मंदिरात जाऊन पूजा अर्चा केली, पूजा करतानाचे त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्याचे आध्यात्मिक गुरू सदगुरू यांची भेट घेऊन हा पाहुणा निघून गेला.

 

 

विल हा पहिला परदेशी पाहुणा नाही ज्याच्यावर हिंदू संस्कृतीचा जबरदस्त पगडा आहे. असे बरेच जण आपल्याला पाहायला मिळतील जे हिंदू संस्कृती जाणतात आणि मानतात.

हिंदू संस्कृतीमध्ये मनशांती मिळवण्यासाठी सांगितलेल्या ध्यानधारणा, योग ते आवर्जून करतात. अशाच काही परदेशी पाहुण्या कालाकरांबाबत आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

सिल्वेस्टर स्टैलोन :

 

 

रॅम्बो या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या सिल्वेस्टर स्टॅलोन या स्टारची कहाणी अतिशय आगळी वेगळी आहे. चार वर्षांपूर्वी मृत्यू पावलेला स्वत:च्या मुलाचा आत्मा त्यांना स्वता:च्या आजूबाजूला जाणवला.

अत्यंत अस्वस्थ अवस्थेत , त्यांनी एका पुजारी बाबांशी संपर्क साधन्याचा प्रयत्न केला, ज्या मध्ये त्या पुजारी बाबांनी सिल्वेस्टरला आपल्या मुलाचे पिंडदान, म्हणजे मृत व्यक्तीच्या मोक्षप्राप्तीसाठी जो विधी करतात तो करण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर, स्टॅलोन यांनी संपूर्ण कुटुंबासमवेत हरिद्वार जवळील कंखल येथील सती घाट येथे पिंडदान विधी पूर्ण केला. या घटनेनंतर स्टॅलोनचा हिंदू धर्मावरील विश्वास अधिकच दृढ झाला आहे.

ज्युलिया रॉबर्ट्स :

 

 

ज्युलिया रॉबर्ट्स यांचा समावेश हॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून होतो. ज्युलिया यांना हिंदू धर्माबद्दल खूपच आत्मियता आहे. जेव्हा ज्युलिया त्यांच्या ‘ईट, प्रे, लव’ या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी भारतात आल्या होत्या ,तेव्हा पासून त्या हिंदू धर्माच्या संपर्कात आल्या.

जन्माने ख्रिश्चन असलेल्या ज्युलिया यांनी जेव्हा बजरंगबली हनुमानाचा फोटो पाहिला, प्रेरित होऊन हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी तो अमलातही आणला.

हा धर्म स्वीकारल्यानंतर मला शांतता मिळाली आहे असे हिंदू धर्माचा स्वीकार केल्यानंतर ज्युलिया यांनी सांगितलं. केवळ इतकंच नाही तर ज्युलिया रॉबर्ट्स या दिवाळीसह अनेक हिंदू सण देखील साजरे करतात

ह्यू जॅकमॅन :

 

 

सनातन हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्म या दोन्ही गोष्टींवर हॉलिवूडमधील अभिनेता ह्यू जॅकमॅन यांची श्रद्धा आहे. “हिंदू धर्मातील रहस्यवाद त्यांना खूप आकर्षित करतो” असे अनेकवेळा त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

हिंदू धर्माचे मूलभूत धर्मग्रंथ, उपनिषद आणि भगवद्गीता यांचे ते समर्पितपणे पालन करतात. खरं तर ह्यू जॅकमॅन जन्माने ख्रिश्चन आहेत, परंतु ते सर्व धर्मांतील चांगल्या गोष्टींचे आचारण करतात.

ख्रिश्चन म्हणून जन्मलेल्या या ताऱ्याकडे संस्कृत शिलालेख कोरलेली लग्नाची अंगठी देखील आहे ज्यावर लिहिले आहे “ओम परमार मैनामर” म्हणजे “आम्ही आमचे मिलन एका उच्च स्त्रोताकडे गहाण ठेवतो.”

रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर :

 

 

संपूर्ण सिनेमाविश्वामध्ये हॉलिवूड स्टार रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर हे आयर्न मॅन म्हणून खूपच लोकप्रिय झाले आहेत. रॉबर्ट यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला असून याबरोबरच ते इस्कॉनच्या हरे कृष्णा चळवळीशीही संबधित आहेत.

जन्माने यहुदी असलेले रॉबर्ट यांच्यावर बौद्ध आणि हिंदू धर्माचा खूप प्रभाव आहे. रॉबर्ट योगाभ्यासाचे ही कट्टर समर्थक आहेत, आणि ते त्याचा अभ्यासदेखील करतात.

मॅडोना :

 

 

केवळ स्वत: च्या गाण्यासाठीच नाही तर वेस्टर्न लाईफस्टाइलसाठी देखील कायम चर्चेत असणार्‍या ख्यातनाम पॉप गायिका मॅडोना ह्यांनी अलिकडेच आपण हिंदू धर्माच्या आणि भारतीय संस्कृतीच्या आपण खूप जवळ असल्याचं जाहीरपणे सांगितले.

मॅडोना अनेकदा हिंदू पेहेराव घालून मंदिरामध्ये आरतीमध्ये सहभागी होत असतात.

रसेल ब्रँड :

 

 

प्रसिद्ध कॉमेडियन कलाकार रसल ब्रँड ह्यांच्यावर देखील हिंदू धर्म,अध्यात्म आणि ध्यानधारणा यांचा फार मोठा प्रभाव असलेला दिसून येतो.

रसल यांनी कॅटी पेरी यांच्या बरोबर भारतातील राजस्थानमध्ये हिंदू रिती रिवाजांप्रमाणे लग्न केले आहे. त्यावेळी त्यांचे लग्न खूपच चर्चेत होते असे म्हंटले जाते.

अँजेलिना जोली :

 

 

अनेकदा भारतामध्ये भ्रमंती केल्यानंतर हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री अँजिलिना जोली यांना भारतीय संस्कृती मधील सभ्यता भावली.

अँजलिना यांना बौद्ध धर्मातील काही संकल्पना खूप आवडल्या. बौद्ध धर्माचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माचं आचरण करायला सुरुवात केली.

या व्यतिरिक्त मार्क जुकेरबर्ग, जॅकी हंग, उमा थर्मन, रिकी विल्यम्स, मिया, ब्रॅड पिट, मायली इ. अनेक मातब्बर कलाकार मंडळी हिंदू धर्म व संस्कृतीवर गाढ श्रद्धा ठेवतात.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version