' अरुण लाल यांच्या लग्नाची चर्चा करण्याआधी त्यांनी असाध्य रोगावर कशी मात केली, वाचा – InMarathi

अरुण लाल यांच्या लग्नाची चर्चा करण्याआधी त्यांनी असाध्य रोगावर कशी मात केली, वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मित्रांनो २०११ साली महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेटचा विश्वचषक जिंकला होता. तेव्हा संघात असलेल्या युवराज सिंग याने आपल्या अष्टपैलू खेळाने शेवटचा सामना जिंकवून देवून विश्वचषकावर भारताचे नाव कोरले होते. त्यानंतर कळले होते की त्याला झालेल्या अत्यंत दुर्मिळ अशा कर्करोगाशी लढतो आहे. पण त्याने ती लढाई जिंकल्याची गोष्ट नजरेसमोर असताना आणखी एका अशाच लढवैया क्रिकेटपटूची कहाणी समोर आली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

युवराज प्रमाणे भारताचे माजी फलंदाज अरुण लाल यांनाही कर्करोगाशी झुंज द्यावी लागली. चांगली गोष्ट म्हणजे अरुण लाल यांनी कॅन्सरवरही विजय मिळवला. त्यांच्या दुसर्‍या लग्नाची चर्चा होत असतानाच कोविड-१९ चे इन्फेकशन झालेल्या या माजी फलंदाज आणि सध्या बंगालच्या रणजी संघाचे प्रशिक्षक असलेल्या या फलंदाजाने कोविड शी लढताना आपल्या लढाऊ वृत्तीचे दर्शन घडवले आहे.

 

yuvraj-inmarathi
facenfacts.com

 

अरुण लाल अॅडिनोइड सिस्टिक कार्सिनोमा या लाळ ग्रंथींच्या दुर्मिळ अशा कर्करोगाने ग्रस्त होते. या असाध्य रोगाशी झुंज देऊन त्याला हरवल्यानंतर त्यांना वाटते की आशावाद आणि तुमची रोगप्रतिकार शक्ति उच्च दर्जाची ठेवणे खूप गरजेचे आहे. कोव्हीड १९ चा उपचार घेताना त्यांनी सांगितले की, “एकंदरीत हा एक आजार आहे. आपण त्याच्याशी लढू शकता यावर विश्वास ठेवला पाहिजे.

तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही. तुम्हाला सर्वात वाईटासाठी तयार राहावे लागेल परंतु सर्वोत्तमची अपेक्षा करावी लागेल.”ते पुढे असेही म्हणाले, “तुम्हाला तुमची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवावी लागेल. त्यासाठी संघर्ष करावा लागेल. तुम्हाला सकारात्मक राहावे लागेल आणि स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. त्याचबरोबर पौष्टिक आहार घ्या, चांगली झोपा आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवा.”

एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, मी या दुर्धर आजारातून बरा झालो हे खरं तर एक चमत्कार आहे. मला जेव्हा या आजराचे कळले तेव्हा मी पूर्णपणे हताश झालो होतो. कारण मला झालेला कॅन्सर हा दुर्मिळ होता, हा कॅन्सर तुमच्या रक्तातून नव्हे तर नसांमध्ये पास होतो.

 

arun lal im 1

 

या आजरातून पूर्णपणे बरा होण्यासाठी मला १ वर्ष गेले, कारण माझा जबडा पूर्णपणे नव्याने बसवण्यात आला, नाहीतर माझा चेहरा पाहिल्यासारखा झाला नसता. माझ्या पायातले एक हाड कापून त्यापासून एक जबडा तयार केला आणि तो बसवण्यात आला.

पाय कापल्याने मी पूर्णपणे कुबड्यांचा आधार घेतला, मी माझा उजवा खांदा हलवू शकत नव्हतो कारण माझ्या मानेवरील नसा कापल्या होत्या. या त्रासदायक आजारातून मी आता बाहेर आलो आहे, आता पूर्णपणे फिट आहे.

 

arun lal im

सचिनच्या झंझावातामुळे प्रत्येकवेळी झाकोळला गेलेला क्रिकेटमधला खरा ‘जंटलमन’!

CSK विरुद्ध गोलंदाजी करताना ऋषी धवनने ‘फेस शील्ड’ का घातले होते?

मूळचे कपूरथला, पंजाबचे, १९५५ मध्ये जन्मलेले लाल चहाच्या कंपनीत नोकरी मिळाल्यानंतर १९७८ मध्ये कोलकाता येथे आले. थोड्याच दिवसात क्रिकेट विश्वात ते mr. बंगाल बनले.

लालच्या नेतृत्वाखाली, बंगालने १३ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर २०२० मध्ये रणजी करंडक अंतिम फेरीत प्रवेश केला आणि चालू हंगामात त्यांनी तीन विजयांसह १८ च्या सर्वोच्च गुणांची नोंद करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

स्वत: लाल यांनी १६ कसोटी सामने आणि १३ एकदिवसीय सामन्यांमध्ये १९८२ते १९८९ दरम्यान भारतीय राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले होते. नुकतंच कोलकाता येथे ते, दीर्घकाळ मैत्रीण असलेल्या बुल बुल साहासोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे.

 

arun lal im 3

 

मित्रांनो आहे त्या परिस्थितीला शरण न जाता, life, I dare to fight with you अशी जिगर दाखवणारे अरुण लाल यांसारखे अनेक प्रेरणास्त्रोत आपल्या अवती-भवती आपल्याला नक्की दिसतील. त्यांच्या लढवैया वृत्तीला सलाम!! त्यांच्या लग्नाची चर्चा होत असतानाच कोविड-१९ चा सामना करत त्यांनी त्यावर केलेली मात तितकीच प्रेरणादायी आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?