' ऑप्शन खरेदी करणे म्हणजे जवळ फ्रीज नसताना बर्फाचे गोळे विकण्याचा धंदा करण्यासारखे! – InMarathi

ऑप्शन खरेदी करणे म्हणजे जवळ फ्रीज नसताना बर्फाचे गोळे विकण्याचा धंदा करण्यासारखे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण सहज आजूबाजूला चौकशी केली तर अशी अनेक उदाहरणं सापडतील जेव्हा सर्वसामान्य लोक डायट प्लॅन किंवा फिटनेस प्लॅन नियमित पाळू शकत नाहीत! यामध्ये अपयश येण्यामागे ते आपल्याला शेकडो कारणे आहेत.

जी लोकं यशस्वी झाली आहेत त्यांची आपण खोलात जाऊन चौकशी केली तर आपल्या लक्षात येईल यामागे केवळ यशाचा मंत्र हा एकच आहे ते म्हणजे सातत्य.

 

success mantra IM

 

इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत जर विचार केला तर सामान्य गुंतवणूकदारासमोर असलेले प्रश्न काही याहून वेगळे नाहीत. पण इन्वेस्टर समोर काही वेगळी कठीण  कारणं आणि चॅलेंजेस देखील असतात.

गुंतवणुकीचे निर्णय घेणे त्यांच्यासाठी खूप कठीण जातं कारण त्यांना असलेलं मर्यादित नॉलेज, मनातील भीती आणि एकांगी विचार करण्याची पद्धत (Bias). सामान्य गुंतवणूकदार इन्वेस्टमेंट पासून दूर राहण्याचं कारण म्हणजे मार्केटचे स्वरूप; मार्केट सतत वर-खाली, दोलायमान परिस्थितीत असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

गोल्ड, बॉन्ड, म्युच्युअल फंड आणि शेअर्स यामधील व्यवहार आता खुप सोपे आणि सोयीचे झाले आहेत, आड येते ती निर्णय-क्षमता.

योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये नेमकं काय करायचं हे समजून सांगणारी विश्वासाची, जबाबदार व्यक्ती हवी, अशीच एक व्यक्ती म्हणजे नीरज बोरगांवकर!

 

neeraj borgaonkar IM

 

गेल्या अनेक वर्षांपासून ते सामान्य इन्वेस्टरला या गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर नीट उलगडून सांगत आहेत.

===

आज आपण ऑप्शन ट्रेडिंग या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत.

तुमच्यापैकी बर्‍याच लोकांना ठाऊक नसेल, परंतु २०२०-२०२१ या आर्थिक वर्षामध्ये आपल्या देशामध्ये सुमारे बत्तीस लाख कोटी रुपयांचे ऑप्शन्सचे व्यवहार झाले. आणि हाच आकडा २०२१-२०२२ या आर्थिक वर्षामध्ये सत्तर लाख कोटी रुपयांवर पोहोचला. म्हणजेच ऑप्शन्सचा व्यापार डबल झाला.

 

option trading IM

 

इतकेच नाही तर २८ एप्रिल रोजी, म्हणजेच नविन आर्थिक वर्षाच्या पहिल्या १७ ट्रेडिंग सेशन्समध्ये या ऑप्शन्समध्ये सात लाख कोटी रुपयांहून अधिक व्यवहार ऑलरेडी झालेले दिसत आहे (या माहितीचा स्त्रोत – नॅशनल स्टॉक एक्स्चेंजची अधिकृत वेबसाईट).

या माहितीवरुन आपल्याला असे लक्षात येते की आपल्या देशामध्ये ऑप्शन ट्रेडर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. फ्युचर्स आणि ऑप्शन्स या सेगमेंटमधल्या एकूण वाढीचा विचार केला तर गेल्या पाच वर्षांमध्ये या क्षेत्रामध्ये सरासरी वार्षिक ८०% टक्क्यांहून अधिक वाढ होत आहे.

याचाच अर्थ फ्युचर्स आणि ऑप्शन्स ही आपल्या देशामधली एक बूमिंग इंडस्ट्री आहे. या इंडस्ट्रीमध्ये येत्या काळामध्ये प्रचंड मोठ्या संधी आहेत आणि या संधी मिळवण्यासाठी आपल्याला हा धंदा नीट समजून घेतला पाहिजे.

ऑप्शन्स ट्रेडिंग हा धंदा काय आहे?

मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. ऑप्शन्समध्ये दोन प्रकार असतात – “कॉल ऑप्शन” आणि “पुट ऑप्शन”.

 

call put IM

 

जास्त विचार करु नका. कॉल ऑप्शन म्हणजे मायबोलीमध्ये “खरेदी करण्याचा हक्क” आणि पुट ऑप्शन म्हणजे “विक्री करण्याचा हक्क” बास! इतकेच आहे.

समजा अबक या कंपनीचा शेअर आत्ता शंभर रुपयांवर ट्रेड होत आहे, तुम्हाला असे वाटले, की हा शेअर या महिन्याच्या शेवटच्या गुरुवारपर्यंत दीडशे रुपयांवर जाईल तर तुम्ही शंभर रुपयांचा “कॉल ऑप्शन” तुमच्या कडे विकत घेता.

तुमचा अंदाज जर खरा ठरला आणि शेअरचा भाव खरोखर दीडशे रुपयांवर गेला तरी तुमच्याकडे तोच शेअर शंभर रुपयांना खरेदी करण्याचा हक्क असेल आणि तुम्ही तो बजावून फायदा देखील मिळवू शकाल!

याच्या बरोब्बर उलट म्हणजे समजा तुमचा असा अंदाज आहे, की अबक चा शेअर या महिन्याच्या शेवटच्या गुरुवारपर्यंत खाली पडेल आणि पन्नास रुपयांवर येईल तर तुम्ही त्या शेअरचा शंभर रुपयांचा पुट ऑप्शन तुमच्याकडे विकत घेता.

तुमचा अंदाज खरा ठरला आणि शेअरचा भाव खरोखर पन्नास रुपयांवर आला तरी तुमच्याकडे तोच शेअर शंभर रुपयांना विक्री करण्याचा हक्क असेल आणि पुन्हा तुम्ही तो बजावून फायदा मिळवू शकाल! आता कॉल आणि पुट हे हक्क फुकटात मिळतात का हो? तर नाही, हे हक्क तुम्हाला “प्रिमियम” भरुन विकत घ्यावे लागतात.

 

share premium IM

 

हा जो प्रिमियम असतो तो वेळेनुसार कमी कमी होत जातो. दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी डेरिव्हेटिव्ह कॉंट्रॅक्ट्सची एक्स्पायरी म्हणजेच शेवटचा दिवस असतो.

या दिवशी सर्व डेरिव्हेटिव्ह कॉंट्रॅक्ट्स “एक्स्पायर होतात”. महिन्याच्या एक तारखेला जर ऑप्शन प्रिमियमचा दर दहा रुपये असेल तर दर दिवशी हा प्रिमियम कमी कमी होत एक्स्पायरीच्या दिवशी शून्य होतो. (भाव आहे तिथे राहिला तर!)

ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्ही “ऑप्शन बायर” म्हणूनदेखील काम करु शकता तसेच “ऑप्शन सेलर” म्हणूनदेखील काम करु शकता. होय, सर्वसामान्य कोणीही व्यक्ती ऑप्शन्स सेलर म्हणून बाजारामध्ये काम करु शकते.

बहुतांश लोकांना ऑप्शन सेलिंगबद्दल माहिती नसते आणि ऑप्शन सेलिंग करण्यामध्ये इंटरेस्टदेखील नसतो. कारण सोपे आहे – ऑप्शन खरेदी करण्यासाठी अतिशय कमी भांडवल लागते. परंतु ऑप्शन सेलर होण्यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते. यामुळे बहुतांश रिटेल ट्रेडर्स ऑप्शन खरेदीचा मार्ग स्वीकारतात आणि इथेच या सर्वांची चूक होते.

लेखाचे शीर्षक नीट वाचा – “ऑप्शन खरेदी करणे म्हणजे जवळ फ्रीज नसताना बर्फाचे गोळे विकण्याचा धंदा करण्यासारखे आहे!” आता उन्हाळ्याचे दिवस आहेत.

 

ice gola IM

 

समजा तुम्ही असे ठरवले, की माझ्याकडे एक पाच हजार रुपये आहेत, या पाच हजार रुपयांमध्ये मी बर्फाचे गोळे विकण्याची गाडी लावतो आणि व्यवसाय सुरु करतो. परंतु तुमच्याकडे फ्रीज नाही. काय होईल अश्या परिस्थितीमध्ये? सकाळी तुम्ही बर्फाची लादी विकत घ्याल, गाडीवर टाकाल आणि स्टॉल लावून गोळे विकायची सुरुवात कराल.

दुपार जसजशी होत जाईल तसतसा तुमच्याजवळील बर्फ वितळू लागेल आणि दिवस संपताना तुमच्या बॉक्समध्ये फक्त पाणी उरलेले असेल. दिवसभरात गिर्‍हाईक आले तर ठीक नाहीतर सगळे भांडवल पाण्यात! ऑप्शन खरेदी करणार्‍यांचे देखील बहुतेक वेळेला असेच होते.

कारण शंभर रुपयांची वस्तु शंभर रुपयांना खरेदी किंवा विक्री करण्याचा हक्क विकत घेण्यासाठी तुम्ही “प्रिमियम” देत आहात. हा प्रिमियम तुम्ही फक्त आणि फक्त “वेळे”साठी देत आहात. नियोजित वेळेमध्ये जर तुम्हाला अपेक्षित अशी प्राईज मूव्हमेंट झाली नाही तर तुम्ही भरलेला प्रिमियम हा शून्य होणार आहे.

ऑप्शन ट्रेडिंग करताना “नेकेड पोझिशन्स” कधीच घ्यायच्या नसतात. ऑप्शन ट्रेडिंग करताना काही कॉम्बिनेशन स्ट्रॅटेजीज्‌ वापरुन काम करायचे असते. हे जिला योग्य वेळी समजते ती व्यक्ती ऑप्शन ट्रेडिंगमध्ये यशस्वी होऊ शकते.

ऑप्शन ट्रेडिंगमध्ये स्ट्रॅटेजी कश्या वापरल्या जातात हे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी आपल्या Neeraj Borgaonkar या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे.

वेळ मिळेल तेव्हा हा व्हिडिओ नक्की बघा :

 

गुंतवणूक कट्ट्याद्वारे शेअर मार्केट व गुंतवणूक या विषयाबद्दल प्रशिक्षण देण्याकरिता अनेक उपक्रम राबवले जातात. येत्या रविवारी दुपारी बारा वाजता “पोझिशनल ट्रेडिंग” या विषयावर एका विनामूल्य वेबिनारचे आयोजन केले आहे.

या वेबिनारला उपस्थित राहण्याकरिता (विनामूल्य) रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. पुढील लिंकवरुन या वेबिनारसाठी रजिस्ट्रेशन करता येईल – https://www.guntavnook.com/webinar

रजिस्ट्रेशन पूर्ण होताच वेबिनारची लिंक व्हॉट्सअ‍ॅप व ईमेलवर पाठवण्यात येईल.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

टीप : वरील माहिती ही फक्त आणि फक्त तुमच्या ज्ञानात भर पडावी याच उद्देशाने दिली गेली आहे. या माहितीच्या आधारावर शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये, शेअर्समध्ये गुंतवणूक करताना तज्ञ मंडळी यांचा सल्ला घेऊन नीट अभ्यास करूनच गुंतवणूक करावी.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?