आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
केवळ दक्षिणेकडचेच नाही तर देश-विदेशातले अनेक प्रेक्षक खेचून आणण्याची आपली क्षमता दाक्षिणात्य चित्रपटांनी सिद्ध केली आहे. दाक्षिणात्य चित्रपटांना मिळणारं यश पाहून सगळ्यांनीच या चित्रपटांची दखल घेतली आहे. चित्रपटांमधल्या गाण्यांवर ठेके धरले आहेत.
सुपरस्टार यश मुख्य भूमिकेत असलेला ‘KGF 2’ हा चित्रपटही सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने आधीचे सगळे रेकॉर्ड्स तोडलेत. ‘KGF 2’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकने सर्वाधिक कमाई केलेल्या ‘बाहुबली’ या चित्रपटालाही मागे टाकलं आहे.
या चित्रपटाने केवळ एका आठवड्यात २५५ करोड रुपयांचा आकडा पार केला आहे. जगभरात या चित्रपटाने एव्हाना ६०० करोड रुपयांहूनही अधिक कमाई केली आहे. रॉकी भाईच्या ऍक्शन आणि डायलॉगबाजीला लोकांनी डोक्यावर घेतलंय.
रॉकी भाई आणि अधीरा यांच्यात रंगलेला संघर्ष आपल्याला चित्रपटात दिसतो. ‘KGF 2’ या चित्रपटात ८०च्या दशकातली कहाणी दाखवली आहे. या चित्रपटातल्या रॉकी भाईची ‘डोडम्मा’ मशीन गन सध्या सगळीकडे चर्चेत आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
चित्रपटात रॉकीकडे असलेल्या या मशीन गनचं खरं नाव Browning M1919 हे आहे. आपल्यातल्या बहुतेकांना माहीत नसेल पण या मशीन गन मागे एक मोठा इतिहास आहे.
या गनने मोठमोठ्या युद्धांमध्ये योध्यांचं रक्षण केलं आहे. कुणी बनवली ही मशीन गन? आणि या मशीन गनचा नेमका काय इतिहास आहे? जाणून घेऊ.
या मशीन गनला ‘KGF 2’ मध्ये रॉकी भाई ‘डोडम्मा’ असं म्हणतो. कानडी भाषेत ‘डोडम्मा’ या शब्दाचा अर्थ ‘थोरली आई’ असा होतो. ही मशीन गन चित्रपटात रॉकीचं रक्षण करते म्हणून तो तिला ‘डोडम्मा’ असं म्हणतो.
या मशीन गन ने सलग १० मिनिटं गोळीबार करून तो आपल्या शत्रूंचा सर्वनाश करतो. पण चित्रपटात आपल्याला दिसणारी ही मशीन गन प्रत्यक्षात नेमकी कुणी बनवली तर जॉन ब्राउनिंग या अमेरिकन इंजिनियरने. १९१९ साली त्याने ही Browning M1919 मशीन गन तयार केली.
८०च्या दशकात बऱ्याच सेना आणि विद्रोही संघटनांकडे ही गन असायची. भारतात सुरुवातीच्या काळात याची किंमत जवळपास ६६७ डॉलर्स म्हणजेच ५०,८५४ रुपये इतकी होती. त्यानंतर उत्पादनात वाढ झाल्यामुळे तिची किंमत १४२ डॉलर्स म्हणजेच १०,८२६ रुपये केली गेली.
आपल्याला हे वाचून आश्चर्य वाटेल पण ८० च्या दशकात अमेरिकेतले सामान्य नागरिकही या मशीन गनचा वापर करायचे. मात्र १९८६ मध्ये बंदूक कायद्यात बदल झाल्यानंतर अमेरिकेने या मशीन गनच्या खरेदी-विक्रीवर बंदी आणली.
या मशीन गनचा वापर ‘दुसरं महायुद्ध’, ‘भारत-चीन युद्ध’, ‘कोरियन युद्ध’ आणि ‘व्हिएतनाम युद्ध’ या युद्धांमध्ये आणि याखेरीज अन्य काही युद्धांमध्येही झाला आहे.
२६ वर्षांमध्ये बनले याचे एकूण ८ व्हेरियंट्स :
१९१९ ते १९४५ या काळात Browning M1919 या मशीन गनचं उत्पादन केलं गेलं. या दरम्यान अमेरिकेने जगभरात एकूण ४.३८ लाखांहून अधिक Browning M1919 गन विकल्या.
—
- KGF; किरकोळ वादंगाचं रूपांतर थेट जीवघेण्या भांडणात झालं आणि…
- कोण म्हणतं KGF काल्पनिक आहे? रॉकी आणि या कुख्यात गुंडात आहे हे साम्य
—
२६ वर्षांमध्ये याचे एकूण ८ व्हेरियंट्स बनले. त्याचं वजन १४ किलो होतं. या बंदूकीच्या नळीची लांबी २४ इंच होती. विनाशकारी अशी ही मशीन गन स्टॅन्डच्या आधाराने किंवा जमिनीवर ट्रायपॉडवर ठेवूनही चालवता येऊ शकते.
आजच्या घडीला ‘अँटी-एयरक्राफ्ट गन’च्या रूपात असलेल्या तिचा आपल्याला फ़ाइटर जेट मारण्यासाठी उपयोग करता येऊ शकतो.
दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेला मिळवून दिलं यश :
Browning M1919 मशीन गनच्या A4 व्हेरियंटने दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेला यश मिळवून दिलं होतं. ‘कोरियन युद्ध’ आणि ‘व्हिएतनाम युद्धातही’ या बंदुकीने आपलं सामर्थ्य दाखवून दिलं होतं.
याच्या A6 व्हेरियंटला प्रचंड हलकं करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तेव्हा या बंदुकीच्या नळीचं वजन ३.८ किलोंवरून घटवून १.८ किलो केलं गेलं होतं. अमेरिकेच्या नौसेनेने A4 व्हेरियंटला बदलून त्याला ७.६२ मिलीमीटरचं NATO चेंबरींग करून त्याला MK-21 MOD0 असं नाव दिलं होतं.
या बदललेल्या ब्राउनिंग मशीन गनने ‘व्हिएतनाम युद्धा’त अमेरिकन सेनेची मदत केली होती. त्यावेळी या मशीन गनची जगभरात इतकी हवा झाली होती की वेगवेगळे देश या गनचे स्वतःचे व्हर्जन्स बनवायला लागले. त्याच काळात इंग्लंडने पॉईंट ३०३ कॅलिबरची बंदूक बनवली होती.
१० प्रकारच्या गोळ्या झाडता येऊ शकत होत्या :
Browning M1919 मशीन गनची सगळ्यात मोठी खासियत ही होती की त्याद्वारे १० प्रकारच्या गोळ्या झाडता येऊ शकत होत्या. या मशीन गनचा सुरुवातीचा व्हेरियंट एका मिनिटात ४०० ते ६०० गोळ्या झाडत असे.
या मशीन गन चा शेवटचा व्हेरियंट असलेल्या AN/M2 ची फायरिंगची क्षमता एका मिनिटाला १२०० ते १५०० गोळ्यांची होती. याची गोळ्या बाहेर येण्याची गती एका सेकंदाला ८५३ मीटर म्हणजेच १ किलोमीटर होती.
या गनची रेंज जवळपास दीड किलोमीटर होती. याच्या काडतुसामध्ये २५० गोळ्यांचा बेल्ट लावला जायचा. त्यामुळे बऱ्याच युद्धांमध्ये या मशीन गनचा वापर उत्तमरित्या केला गेला.
जगातली पहिली यशस्वी मशीन गन :
Browning M1919 मशीन गनला तिच्या गोळ्या झाडण्याचा प्रणालीमुळे ‘क्लोज्ड बोल्ट शॉर्ट रिकॉयल ऑपरेशन’ हे नाव दिलं गेलं होतं.
या कारणामुळे ही गन प्रचंड गरम व्हायची. त्यामुळेच सातत्याने त्याचे नवे व्हेरियंट्स बनवले जात होते. KGF 2 मध्ये आपण रॉकीला गनच्या नळीतून सिगारेट पेटवताना पाहिलं आहे.
ही जगातली अशी पहिली यशस्वी मशीन गन आहे जी ट्रक, टँक्स, जीप, लँडिंग क्राफ्ट्स, रणगाडे, चढ किंवा उतार, जमीन यावरून चालवता येऊ शकते.
एखादा चित्रपट गाजतो तेव्हा त्यातल्या कलाकारांबरोबरच त्यातल्या इतरही अनेक गोष्टी प्रेक्षकांच्या नजरेतून सुटत नाहीत. KGF 2 चं कथानकच एका विशिष्ट काळातलं असल्यामुळे त्यातल्या लोकप्रिय ठरलेल्या मशीन गन मागे काहीएक इतिहास असू शकण्याची शक्यता होती.
मात्र आपल्या मनात या मशीन गन मागे एवढा मोठा इतिहास असेल हा विचार कदाचित आला नसेल.
या मशीन गनच्या उदाहरणावरून यापुढे चित्रपट, विशेषतः विशिष्ट काळातले चित्रपट पाहताना त्यातल्या कलाकारांइतकंच त्यातल्या लक्षणीय ठरणाऱ्या वस्तूंविषयीही आपल्या मनात कुतूहल जागेल.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.