Site icon InMarathi

आजच्या काळातल्या या १० नोकऱ्यांवर भविष्यात येऊ शकते गदा!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रोजीरोटीकरता नोकरी करणे ही गोष्ट आपल्या सगळ्यांसाठीच आवश्यक असते. ठराविक शिक्षण, पदव्या मिळवल्यानंतर काहींना आपल्या मनासारखी नोकरी करायला मिळते तर काहींना त्यांच्या समोर असलेल्या बाकीच्या पर्यायांमधल्या पर्यायांची निवड करावी लागते. आपल्यासमोर सध्या असे नवेजुने बरेच पर्याय खुले आहेत.

 

 

असं असूनही आज, विशेषतः कोविड आणि कोविडनंतरच्या काळात बरेच जण बेरोजगार आहेत. तशात तंत्रज्ञानानेदेखील कामाच्या, व्यवहाराच्या अनेक बाबतींतलं माणसांचं माणसांवरलं अवलंबित्त्व कमी करून टाकलं आहे.

 

दैव देतं अन् कर्म नेतं; पैशांच्या राशीत लोळणारे ६ कोट्याधीश झाले दरिद्री…

निवृत्तीनंतरही दरमहिना उत्पन्न मिळण्यासाठी काय करावं? या टिप्सचा नक्की वापर करा

आपण सगळेचजण या नव्या डिजिटल युगाला हळूहळू सरसावत असताना आता आपल्याला भविष्यात नोकरी निवडण्यासाठीच्या आपल्यासमोर असलेल्या पर्यायांचा विचारही अधिक गांभीर्याने करावा लागणार आहे.

तंत्रज्ञानाच्या विलक्षण प्रगतीमुळे आपल्यासाठी काही वेगळ्या रोजगाराच्या संधी खुल्या झाल्या आहेत. तर याच तंत्रज्ञानामुळे वर्षानुवर्षे आपल्याला येनकेनप्रकारे ज्या नोकऱ्या परिचयाच्या होत्या त्यातल्या काही नोकऱ्या भविष्यात गायबही होऊ शकतात अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यापुढे आपल्याला अशा काही नोकऱ्यांचे पर्याय गृहीत धरून भविष्याच्या योजनांची आखणी करता येणार नाही.

याकडे आपण डोळेझाक केली तर त्यामुळे आपलंच नुकसान होऊ शकतं. येत्या दशकात अशा कुठल्या १० नोकऱ्या नामशेष होऊ शकतात ते पाहू.

 

 

१. ट्रॅव्हल एजंट्स :

आजच्या काळात कुठल्याही ट्रॅव्हल एजंटच्या मदतीशिवाय आपण स्वतःसाठी विमानाचं किंवा ट्रेनचं तिकीट बुक करू शकतो. त्याचप्रमाणे, इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल्स बुक करण्यासाठी चिक्कार वेबसाईट्स आहेत. येत्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रावर आणखीनच परिणाम होईल आणि हळूहळू ट्रॅव्हल एजन्सीमधल्या नोकऱ्या नाहीश्या होत जातील.

 

 

२. कॅफे आणि रेस्टॉरंट्समधले वेटर्स :

या व्यवसायावर तंत्रज्ञानाची नजर सगळ्यात जास्त आहे. आजकाल मार्केटमध्ये रोबो वेटर्स आलेत. कितीही तणावपूर्ण परिस्थिती असली तरी सामान्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत हे रोबो वेटर्स परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात.

 

 

एकीकडे कामगार कपातीमुळे बऱ्याच देशांकडून विरोध होत आहे तर दुसरीकडे तंत्रज्ञानाच्या लाटेचा अप्पर हॅन्ड आहे. दरदिवशी तंत्रज्ञान विकसित होतंय आणि येत्या काळात ते या क्षेत्रात वेगाने बदल घडवून आणेल.

३. टेक्स्टाईल वर्कर :

कापड उद्योगातल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट होण्यामागे उत्पादनाची मागणी कमी होणे हे कारण नसून ज्या प्रकारे ते बनतं त्यामुळे ही घट होत आहे. यंत्रांमुळे आज उत्पादनाची बरीचशी कामं होत आहेत. साहजिकच, या क्षेत्रात कर्मचाऱ्यांची गरज बरीच कमी झाली आहे. येत्या काही वर्षांत हे क्षेत्र यंत्रांवरच अवलंबून असेल.

 

 

४. अंपायर :

जर तुम्हाला क्रीडाक्षेत्रात रुची असेल तर यापुढे रेफरी किंवा अंपायर होण्याचं स्वप्न बघू नका. भविष्यात कदाचित अंपायरची आवश्यक्ताच उरणार नाही. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासानुसार कम्प्युटरायझेशनमुळे स्पोर्ट्स रेफरी किंवा अंपायरच्या नोकरीच्या दृष्टीने धोका निर्माण झाला आहे.

 

 

५. अकाउंटंट्स :

टॅक्स तयार करणाऱ्यांच्या नोकऱ्यांबाबत धोका निर्माण झाला आहे. बरेच जण आता टॅक्स ऍप्सद्वारे टॅक्स भरतात. युकेमधल्या बऱ्याच कामगारांना टॅक्स फाईलही करावा लागत नाही कारण, त्यांच्या वतीने ते आपोआप केलं जातं.

 

६. कॅशियर :

गेल्या काही वर्षांपासून डिजिटल पेमेंट करणाऱ्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. आज कुठल्याही कॅशियरच्या मदतीशिवाय Paytm, Phone Pay सारख्या ऍप्समुळे एका सेकंदात बँकेत पैसे ट्रान्स्फर करणं शक्य आहे.

 

yesbank.com

आजही समाजातला एक वर्ग कॅश वर अवलंबून आहे. मात्र आता ‘डिजिटल पेमेंट’च्या सोयीमुळे दरवेळी पैसे बरोबर बाळगण्याची लोकांची गरज संपली आहे.

७. पोस्टल सर्व्हिस क्लार्क :

पोस्टल सर्व्हिस हे शारीरिक कष्टांचं क्षेत्र समजलं जातं. तशात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे तिथल्या कामगारांना पर्याय म्हणून तंत्रज्ञानाकडेच पाहिलं जातंय. कामगारांच्या दृष्टीने ही मोठीच समस्या आहे. येत्या काळात या नोकरीलादेखील उतरती कळा लागण्याची शक्यता आहे.

 

 

८. बिल्डर्स :

आजच्या काळात 3D तंत्रज्ञानाच्या मदतीने २४ तासांत फार लोकांना सामील न करता एक घर बनवता येणं शक्य आहे. जर अशीच प्रगती होत राहिली तर “कधीकाळी बिल्डर्सचा व्यवसाय होता”, असं म्हणावं लागण्याचा दिवस दूर नाही.

 

 

९. प्रिंट मीडिया :

आजच्या डिजिटल युगात वर्तमानपत्र वाचणारे खूप कमी लोक राहिलेत. बऱ्याच लोकांना सगळ्या घडामोडी फोनवरून किंवा एखाद्या डिजिटल मीडिया वेबसाईट वरून मिळतात. त्यामुळे वर्तमानपत्र वाचण्याची गरज त्यांना उरलेली नाही. प्रिंट मीडियाचा व्यवसाय आताच डबघाईला आला आहे. येत्या काही वर्षात हा व्यवसाय पूर्णतः ठप्प होऊ शकतो.

 

Sputnik International

१०. ड्रायव्हर :

समोर आलेल्या एका वृत्तानुसार, ५-१० वर्षांत कार्स स्वयंचलित होतील. त्या चालवायला ड्रायव्हरची गरज लागणार नाही. काही देश अशा कार्सची चाचणीही करत आहेत. तर काही देशामध्ये स्वयंचलित कार्स लॉन्चदेखील झाल्या आहेत. यामुळे रस्त्यावर होणारे अपघात, ट्रॅफिक, वाहतुकीत होणारा उशीर अशा समस्यांपासून आपली भविष्यात सुटका होईल.

 

 

तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या वेगाशी जुळवून घेणं काहींना जमतंय तर काहींची तारंबळ उडून यात पीछेहाट होतेय. अशावेळी निष्काळजीपणा न करता नवेनवे अपडेट्स समजून घेत राहणं आणि उतावळेपणा करून घाईघाईने कुठलीही नोकरी न धरता एखाद्या नोकरीची सध्याची परिस्थिती आणि भविष्यात तिला कितपत वाव असेल याचा अंदाज घेत आपल्याला नोकरीच्या निवडीसंदर्भात शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घेता यायला हवा. अन्यथा, आपणच आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा मारून घेऊ.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version