टेस्लाला गडकरींचा ग्रीन सिग्नल; पण तरीही या ४ गोष्टींमुळे ती भारतात येणं अवघड दिसतंय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतात इलेक्ट्रिक कारचे भविष्य काय असेल, हे तर येणारा काळच सांगेल. परंतु जवळपास सर्वच कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार बनवण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये महिंद्रा, टाटा, टेस्ला इत्यादी इलेक्ट्रिक वाहने बनवणाऱ्या मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहेत.
हे बघता या कंपन्यांनी भारतीय रस्त्यांना अनुकूल असलेल्या इलेक्ट्रिक कार बनवायला सुरुवात केली आहे. इलेक्ट्रिक कारला आपण ‘ग्रीन कार’ असेदेखील म्हणतो. ग्रीन कार म्हणण्यामागचे कारण असे आहे की, या कारमुळे प्रदूषण होत नाही, त्यामुळे या वाहनांना ग्रीन कार असे म्हणतात. भारतामधील वाहनांचे पुढील भविष्य ग्रीन कारचे असेल, असे अनेक तज्ञांनी वर्तवले आहे.
तसेच २०४७ पर्यंत भारतात १००% इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ असेल, असेही भारत सरकारने जाहिरपणे म्हटले आहे. आणि हे योग्यही आहे कारण पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांचा खिश्यावर जोर पडतांना दिसत आहे.
या कारणामुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे आणि यामुळे भारतीय बाजारपेठ काबिज करण्यासाठी अनेक विदेशी कंपन्यादेखील उत्सुक आहे. या कंपन्यांमध्ये अग्रेसर असलेली कंपनी म्हणजे ‘टेस्ला’. इलॉन मस्क
संपूर्ण जगामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची जी मागणी वाढली आहे. त्या वाढीमागे सर्वात मोठा वाटा टेस्लाचा आहे. टेस्लाने आपल्या ऑटोनॉमस कार आणि सुपरचार्जिंग नेटवर्कसह EV च्या क्षेत्रात क्रांती केली आहे.
कालच नितीन गडकरींनी आपल्या भाषणात इलॉन मस्कला भारतात टेस्ला बनवण्याचे आवाहन केले आहे. मात्र त्याआधी आपल्या देशात अशा गाड्या बनवण्यासाठी नेमक्या काय अडचणी आहेत हे समजून घेऊयात…
भारतात देखील अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहन बनवतात, परंतु जर भारतात टेस्लाचे प्रवेश झाले तर याला प्रचंड वेग येईल. जसे भारतीय लोक टेस्ला ला घेऊन उत्सुक आहेत, तसेच टेस्लाही भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहे.
१. भारतात टेस्लाला सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे ‘आयात कर’. इलॉन मस्क यांनी नमूद केले आहे की भारतातील आयात कर इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत खूपच जास्त आहेत.
भारतात, $४०,००० पेक्षा जास्त CIF (किंमत, विमा, मालवाहतूक) मूल्य असलेल्या CBU कारवर १००% कर आकारला जातो. यामुळे टेस्ला कारच्या एकूण किमतीत लक्षणीय वाढ होते, परिणामस्वरूप टेस्लाच्या कारच्या किंमतीही खुप वाढतात.
यांवर उपाय म्हणून भारत सरकारने टेस्लाला सांगितले आहे की, तुम्ही भारतात एखादे प्लांट उभारू शकता. परंतु इतक्या लवकर भारतात एखादे प्लांट उभारायला टेस्ला कंपनी अनुकूल नाही आहे. टेस्लाचं भर टॅक्स कमी करण्यावरच आहे जे सध्या तरी अशक्य आहे.
२. अलीकडेच असे वृत्त आले होते की वाहनांची जमीनी पासूनची कमी ऊंची, टेस्लाची भारतात लॉन्च होण्याची गती कमी करत आहे. टेस्ला भारतीय रस्त्यांवर त्यांच्या वाहनांचे अधिक चांगले मूल्यांकन करण्यासाठी त्यांची चाचणी घेत आहे.
Tesla Model 3 चे ग्राउंड क्लीयरन्स हे ११५ मिमी आहे जे भारतीय रस्त्यांसाठी खूप कमी आहे. चाचण्यांदरम्यान, यामुळे गाडीचा खालचा भाग बऱ्याच स्पीड ब्रेकर आणि खड्डेमुळे घासला गेला. यावरून लक्षात आले आहे की टेस्लाला ग्राउंड क्लीयरन्स किमान १४०-१५० मिमी पर्यंत वाढवावा लागेल.
–
- गडकरींची ‘इकोफ्रेंडली हायड्रोजन’ कार, सामान्यांना फायदेशीर ठरणाऱ्या गाडीची खासियत बघा
- ४ इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर आणि तरीही महिन्याचा वीजबिलाचा खर्च फक्त ७० रुपये…
–
३. गाडीची किंमत :
आज भारतीयांची गाडीसाठी पहिली पसंती असते ती म्हणजे मारुती सुझुकी, हुंडाई अशा कंपन्यांना, टेस्ला सारख्या गाड्या भारतीयांना परवडतीलच असे नाही. Tesla Model 3 भारतात आयात करून $६५००० ते $७०००० पर्यंत विकण्याचा मानस कंपनीचा आहे.
४. वाहतुकीची शिस्त :
आज भारतातील रस्ते आणि पायभूत सुविधा जरी सुधारल्या असल्या तरी वाढते ट्रॅफिक, बेशिस्तपणे वाहन चालवणारे, तसेच टेस्लाच्या गाड्यांमध्ये अशी काही फीचर्स आहेत ज्यातून गाडी आपोआप लेन बदलते, त्यामुळे भारतीय रस्त्यांवर कितपत यशस्वी ठरेल ही शंका आहेच.
ही काही प्रमुख कारणे आहेत, ज्यामुळे टेस्ला ला भारतात येण्यास उशीर होत आहे.
टेस्लाने २०२१ मध्ये जवळपास १० लाख पेक्षा अधिक कार विकली आहेत आणि यामधील निम्म्यापेक्षा अधिक कारची निर्मिती चीन मध्ये केली गेली होती. टेस्ला कारला सर्वाधिक मागणी अमेरिका आणि युरोपीय बाजारात आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.