' जाहिरातींमध्ये घड्याळातील वेळ नेहमी १०:१० का असते? कारण जाणून घ्या – InMarathi

जाहिरातींमध्ये घड्याळातील वेळ नेहमी १०:१० का असते? कारण जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजकाल सगळं जग घड्याळाच्या काट्यावर चालतं असं म्हणतात. खरंच आहे ना.

अगदी झोपेतून उठण्यापासून रात्री झोपताना आलार्म लावण्यापर्यंत सारं काही घड्याळावर अवलंबून असतं. मात्र जे घड्याळ आपण दररोज वापरतो, क्षणाक्षणाला ज्याची मदत घेतो, त्याबाबतच्या काही खास गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे.

बऱ्याचदा, घड्याळ्याच्या दुकानामध्ये तुम्ही पाहिलं असेल की घड्याळं ही १०:१० या स्थितीमध्ये सेट असतात. हे असं का? यामागचं कारण तुम्ही देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेल आणि तुम्हाला उत्तर देखील मिळाली असतील.

पण खरं सांगायचं तर तुमच्या कानी पडलेली उत्तरे ही बहुतके अफवा असू शकतात, कारण या मागे नक्की काय आहे हे अजूनही लोकांना माहित नाही, त्यामुळे कोणीही काहीही उत्तर बनवून ती पसरवली.

आज आम्ही तुम्हाला या कोडयामागचं खरं उत्तर सांगणार आहोत.

 

clock 10 inmarathi

 

सर्व प्रथम आपण या मागच्या अफवा जाणून घेऊ या.

अनेकजण असे म्हणतात की १०:१० वेळेला अब्राहम लिंकन यांनी अखेरचा श्वास घेतल्याने घड्याळं १०:१० वर सेट केलेली असतात.

पण खरंतर लिंकन यांना रात्रीच्या १०:१५ मिनिटांनी गोळी मारली गेली आणि सकाळी ७:२२ ला त्यांचा मृत्यू झाला.

त्यामुळे लिंकन यांच्या मृत्यूमुळे घड्याळं १०:१० वर सेट करण्याची प्रथा सुरु झाली असे म्हणणे चुकीचे ठरते.

घड्याळं १०:१० वर सेट असण्यामागची अजून एक अफवा म्हणजे १०:१० वेळेला नागासाकी आणि हिरोशिमा शहरांवर अणुबॉम्ब पडला म्हणून घड्याळं १०:१० वर सेट केली जातात.

पण कागदपत्र सांगतात, की फॅट मॅन बॉम्ब आणि लिटील बॉय बॉम्ब हे या शहरांवर १०:१० या वेळेला पडलेच नाहीत.

जर तुम्हाला देखील कोणी अशी उत्तरे दिली असतील तर ती विसरून जा, कारण आम्ही तुम्हाला आता त्यामागचं खरं कारण सांगत आहोत.

 

clock-inmarathi

 

यामागचं खरं कारण आहे – सौंदर्यशास्त्र…!

घड्याळ १०:१० या स्थितीमध्ये सेट असल्यास त्यामुळे घड्याळाला अनेक फायदे होतात.

१०:१० वर घड्याळ सेट असल्याने त्याचे काटे स्वतंत्र असतात. म्हणजे आपण दोन्ही काटे पाहू शकतो आणि घड्याळाकडे पाहिल्यावर ते सरळ नजरेत भरतात.

या खास शैलीमुळे घड्याळाला एक सौंदर्य शैली प्राप्त होते. जर हेच घड्याळाचे काटे एकमेकांवर असतील किंवा १०:१० च्या उलट स्थितीमध्ये असतील तर ते नजरेलाही छान वाटत नाहीत.

दुसरं म्हणजे घड्याळ बनवणाऱ्या कंपनीचा लोगो हा १२ च्या खाली आणि मधोमध असतो.

तो लोकांना अगदी योग्यरीतीने दिसावा म्हणून १०:१० या स्थितीपेक्षा दुसरी उत्तम स्थिती नाही. ही स्थिती लोगोच्या आड बिलकुल येत नाही.

तसंच घड्याळामध्ये विंडोज, सेकंडरी डायल्स यांसारख्या गोष्टी असल्यास त्या सहसा ३, ६ किंवा ९ या आकड्यांच्या आसपास असतात.

त्यामुळे घड्याळ १०:१० च्या स्थितीमध्ये असल्याने ते देखील पाहणाऱ्याला अगदी स्पष्ट दिसतात.

 

clock 10 inmarathi 2

 

हे ही वाचा –१९७७ साली बांधण्यात आलेल्या या घड्याळाचं अजब तंत्रज्ञान आजही अचंबित करतं

अजून एक महत्वाचं कारण म्हणजे –

१०:१० ही स्थिती आनंदी चेहऱ्यासारखी भासते (म्हणजे घड्याळ हसत आहे असा एक भास निर्माण होतो.) तसेच ही स्थिती विक्टरी/विजय अर्थात V या चिन्हासारखी भासते. जी एक सकारात्मक गोष्ट मानली जाते.

Timex कंपनी त्यांच्या प्रोडक्ट्स मध्ये पूर्वी ८:२० या स्थितीमध्ये घड्याळाचे काटे सेट करायची.

पण ते सौंदर्यशास्त्राच्या उलट असल्यामुळे आणि त्यांना नंतर १०:१० स्थितीचे महत्त्व पटल्यामुळे त्यांनी देखील आपल्या घड्याळातील काट्यांची स्थिती १०:१० वर सेट करायला सुरुवात केली.

उत्तर आश्चर्यकारक आहेच पण ते अगदी खरं ही आहे म्हटलं!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?