Site icon InMarathi

जगातील सगळ्यात सुंदर स्त्रिया राहतात या प्रांतात, जाणून घ्या यामागचं रहस्य

kashmir im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तसे बघितले तर देवाने सगळे जगच सुंदर बनवले आहे. सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असते असे म्हणतात. त्यामुळे जो प्रत्येक गोष्टीकडे चांगल्या नजरेने बघतो त्याला जगातल्या सगळ्याच गोष्टी चांगल्या दिसतात.

स्त्रियांबाबतीत बोलायचे झाल्यास प्रत्येक स्त्रीचे सौंदर्य हे वेगळ्या गोष्टीत असते.

कुणाचे डोळे सुंदर असतात, तर कुणाचे स्मितहास्य! कुणाचे केस सुंदर असतात तर कुणाच्या गालावरची खळी मनमोहक असते. कुणाचा चेहरा लक्ष वेधून घेणारा असतो तर कुणी सुंदर स्वभावामुळे कायम मनात स्थान मिळवते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

स्त्रीच्या सौंदर्याचेही निरागसता, सोज्वळता, नाजूकपणा, करारीपणा, स्मार्टनेस, मादकता असे अनेक प्रकार आहेत.

प्रत्येकाची आवड वेगळी असते, त्यामुळे कुणाला काय सुंदर वाटेल हे दुसरी व्यक्ती ठरवू शकत नाही. मात्र पाकिस्तानातील एका जमातीच्या स्त्रिया जगात सर्वात सुंदर आहेत असे अनेक लोक म्हणतात.

पाकिस्तानमधील एक आदिवासी जमात उत्तर पाकिस्तानातील पर्वतरांगांजवळ वास्तव्याला आहे.

 

 

ह्या जमातीतील स्त्रियांना जगातील सर्वात सुंदर स्त्रिया मानले जाते. ह्या जमातीची लोकसंख्या ८७००० इतकी आहे व आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या लोकांचे सरासरी आयुर्मान १२० वर्ष इतके आहे असे म्हणतात.

ह्या जमातीला “हुंझा” असे नाव आहे. हे लोक शंभरी तर आरामात पार करतात व जे लोक निरोगी आयुष्य जगतात ते १२० वर्षांपेक्षाही जास्त आयुष्य जगतात असे म्हणतात.

ह्या जमातीतील लोकांची लाइफस्टाइल अतिशय निरोगी व निसर्गाला धरून असल्याने त्यांना आजारांचे भय सहसा नसते. तसेच सकस आहार व कष्टाची कामे केल्याने ते तंदुरुस्त असतात व वयापेक्षा ते तरुण व सुंदर दिसतात.

सर्वसाधारणपणे आजच्या काळात बघायचे झाल्यास स्त्रिया केवळ चाळीशीपर्यंतच मूल जन्माला घालू शकतात.

चाळीशीनंतरचे गरोदरपण एकतर होणे अवघड असते आणि त्यात अनेक समस्या येऊ शकतात. परंतु ह्या जमातीतील स्त्रिया मात्र वयाच्या ६५व्या वर्षापर्यंत मुलांना जन्म देण्यासाठी सक्षम असतात.

 

 

निरोगी आयुष्य व हेल्दी लाइफस्टाइल असण्याचे किती फायदे आहेत हे आपल्याला ह्या जमातीतील स्त्री-पुरुषांकडे बघून कळते. ह्या लोकांचा आदर्श सर्वांनीच घेण्यासारखा आहे.

ह्यांच्यासारखी लाइफस्टाइल असल्यास निरोगी आयुष्य, तंदुरुस्त शरीर आणि सौंदर्य मिळवता येते व वयापेक्षा तरुण दिसता येते.

हे लोक स्वतःला जगज्जेत्या सिकंदराचे वंशज समजतात. सिकंदराने हा प्रांत काबीज केल्यानंतर हे लोक येथे आले व त्यांनी ह्या ठिकाणी आजूबाजूला असलेल्या गावांमध्ये वास्तव्य केले. तिथेच त्यांनी आपापसात लग्न करून वंश वाढवला व रोजगार शोधून कायमस्वरूपी हे लोक येथेच राहिले.

हुंझा लोक आहारविहाराचे नियम अगदी व्यवस्थित पाळतात. ते दिवसातून फक्त दोन वेळा जेवण घेतात आणि शरीराला व्यायाम होईल अशी कष्टाची भरपूर कामे करतात. ९९ टक्के हुंझा लोक शाकाहारी आहेत. हे लोक आहारात चीझ, दूध, सुकामेवा, पनीर व इतर दुग्धजन्य पदार्थ योग्य प्रमाणात घेतात.

त्यांचा आहार संतुलित असतो म्हणूनच त्यांचे शरीर निरोगी व तंदुरुस्त राहते. तसेच ते लहानपणापासूनच नियमितपणे लंघन करतात, जेणेकरून शरीराचे संतुलन कायम राहण्यास मदत होईल.

हे लोक संतुलित आहाराबरोबरच व्यायामालाही फार महत्व देतात. रोज सकाळी उठल्यावर दोन तास योग करतात. योग केल्याने शरीर लवचिक, निरोगी तसेच तरुण राहते हे तर सर्वांनाच माहिती आहे.

हे ही वाचा – ‘ह्या’ आहेत जगातील सुंदर आणि श्रीमंत मुस्लिम राजघराण्यातील स्त्रिया

त्यांचे तरुण व सुंदर दिसणे हा त्यांच्या नैसर्गिक संतुलित आहार व नियमित व्यायामाचा परिणाम आहे. तसेच हे लोक आपल्या जमातीबाहेरच्यांशी लग्न करत नाहीत तर आपापसांतच लग्ने करतात.

 

 

हुंझा जमातीतील स्त्री पुरुषांच्या सौंदर्याचे आणखी एक रहस्य म्हणजे वाइन होय. हे लोक भरपूर प्रमाणात वाईन पितात. वाईनच्या औषधी गुणधर्मामुळे त्यांची त्वचा नितळ व सुंदर राहण्यास मदत होते. हुंझा लोक एका घटनेमुळे १९८४ च्या सुमारास प्रकाशात आले.

ती घटना अशी की-

हुंझा जमातींपैकी एक असलेले अब्दुल मोबुदु हे लंडनच्या एयरपोर्टवर गेले असताना त्यांचा पासपोर्ट तपासला गेला.

त्यात त्यांच्या जन्माचे वर्ष १८३२ असे लिहिले होते. ही तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याला ह्यात काहीतरी गडबड वाटली आणि त्याने चौकशी केली असता त्यांचे वय खरंच १५२ वर्ष असल्याचे समजले.

ह्या लोकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य म्हणजे हे लोक मांस खात नाहीत, जंक फूड अजिबात खात नाहीत आणि दिवसातून कमीतकमी १५ ते २० किलोमीटर चालतात. तसेच सुक्या जर्दाळूचा रस हे लोक नियमितपणे घेतात. त्यामुळे अनेक आजारांपासून त्यांचे संरक्षण होते.

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात ताणतणाव, विचित्र आहार, व्यायामाचा अभाव ह्यामुळे २५ वर्षाचे तरुण सुद्धा आजारांनी ग्रस्त आहेत.

ह्या सर्व परिस्थितीत चांगले आरोग्य व निरोगी आयुष्य मिळवण्यासाठी संतुलित आहार, चांगल्या सवयी व नियमित व्यायाम ह्याबाबतीत आपण सर्वांनीच ह्या हुंझा लोकांचा आदर्श ठेवण्यात काहीच हरकत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version