भारतीय राजकारणाचे ‘चाणक्य’ काँग्रेसला नवसंजीवनी देतील असं वाटलं होतं पण….
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सध्या काँग्रेसचं सगळीकडे पराभव होत आहे, आपले बुडते बोट किनाऱ्यावर आणण्यासाठी कांग्रेस पक्षातील नेते जोरदार प्रयत्न करत आहे. परंतु आता त्यांना लक्षात आले आहे की, केवळ सरकारच्या धोरणांना विरोध करून राजकीय यश मिळणार नाही, तर त्यासाठी आणखी काही प्रयत्न करावे लागतील…!
काँग्रेसच्या सद्यस्थितीचा अभ्यास केला तर पक्षात एकही चमत्कारिक नेता शिल्लक नसल्याचे दिसून येते आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस-नेहरू या नावाचा प्रयोग करून गांधी घराणे नेहमी सत्तेत येत असे, परंतु हल्ली यांचा हा प्रयोग अपयशी ठरत आहे. त्यामुळे काँग्रेसला नव्या पद्धतीने विचार करणे भाग पडले आहे.
काँग्रेसच्या बुडत्या बोटीला वाचवण्यासाठी आता काँग्रेस पक्षाने निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे धाव घेतली आहे.
काँग्रेसचे बुडणारे जहाज प्रशांत किशोर वाचवू शकतील का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. कारण हे अनेकदा सिद्ध झाले की प्रशांत किशोर हे केवळ पैशासाठीचं काम करतात, त्यांचा कोणाच्याही धोरणाशी आणि तत्त्वांशी संबंध नाही.
उदाहरणार्थ त्यांनी भाजपा, तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि आप या सर्व पार्टी साठी काम केले आहे आणि विशेष म्हणजे या सर्व पार्टी एकमेकांचे कट्टर विरोधक आहे.
असेही म्हणता येईल की प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत अशा अनेक राजकीय पक्षांसोबत काम केले आहे, जे पूर्णपणे विरुद्ध विचारधारेचे आहेत.परंतु प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये येण्यास नकार दिले आहे.
–
- काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला कंटाळून, अखेर हार्दिक पटेल ‘भाजपच्या’ वाटेवर?
- UPA सरकार सत्तास्थानी असताना झालेल्या ११ भीषण दंगली…
–
काँग्रेसमध्ये येण्याची आणि निवडणुकीची जबाबदारी घेण्याची ऑफर मी धुडकावून लावली आहे, असेही ते म्हणाले. प्रशांत किशोर पुढे म्हणाले, “माझ्या मते, परिवर्तनात्मक सुधारणांद्वारे खोलवर रुजलेल्या संरचनात्मक समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसला माझ्या जागी नेतृत्वाची आणि सामूहिक इच्छाशक्तीची गरज आहे.”
प्रशांत किशोर यांच्या ट्वीट आधी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले की, “प्रशांत किशोर यांच्याशी झालेल्या भेटीनंतर आणि चर्चेनंतर, काँग्रेस अध्यक्षांनी ‘प्रिव्हिलेज्ड वर्किंग ग्रुप-२०२४’ ही समिती स्थापन केली होती आणि प्रशांत यांना नेमून दिलेल्या जबाबदारीसह या गटाचा भाग बनून पक्षात प्रवेश करण्यासाठी आमंत्रण देण्यात आले होते, परंतु त्यांनी आम्हाला नकार दिले आहे.
तसेच त्यांनी पक्षाला दिलेल्या सूचनांचे आणि वेळेचे आम्ही कौतुक करतो.”तसेच प्रशांत किशोर यांना एक शंका होती की, काँग्रेस पक्षात जर त्यांनी प्रवेश केला तर काँग्रेस नेतृत्व त्यांच्या सूचना मानतील की नाही.
कारण गांधी घराण्याचा इतिहास आहे की काँग्रेसला ते आपली खाजगी मालमत्ता समजतात आणि काँग्रेसमधील इतर नेत्यांनी पण यांवर कधी आक्षेप घेतला नाही. अधुन-मधून अनेकवेळा पक्षातील नेतृत्वाविरोधात वरिष्ठ नेत्यांचा एक गट उघडपणे विरोधात उतरला आहे. पण तरीदेखील गांधी घराण्याने आपल्या पदावरुन राजीनामा दिला नाही.
प्रशांत किशोर यांनी खालील चार मुद्दे मांडले ज्यांनी ही सभा फिस्कटली :
१. पक्षात हवे दुसरे स्थान :
पक्षात काम करताना प्रशांत किशोर थेट अध्यक्षांना रिपोर्ट करणार, पक्षात त्यांना इतर नेत्यानापेक्षा वेगळे स्थान हवे होते.
२. तिकीट वाटप आणि कम्युनिकेशनवर पूर्ण भर :
कोणत्या व्यक्तीला तिकीट द्यायचे ते प्रचारासाठी कोणत्या पद्धतीचे मेसेजस पाठवले गेले पाहिजेत या सगळ्यावर पूर्णपणे प्रशांत किशोर यांचा कंट्रोल असेल अशी त्यांची मागणी होती.
३. पक्षांशी युती :
काँग्रेसने देशातील राज्यांमध्ये असणाऱ्या प्रादेशिक पक्षांशी युती केली पाहिजे असे प्रशांत किशोर यांचे मत आहे, तसेच मोदींना हरवण्यासाठी जगमोहन ममता दीदी एकत्र आल्या पाहिजेत जे काँग्रेसला मान्य नाही.
४. २०२४ वर लक्ष :
सध्या अनेक राज्यात काँग्रेसची अवस्था बघता २०२४ मध्ये मुसंडी मारण्यासाठी प्रशांत किशोरसाठी कंबर कसणार होते त्यांना राज्यातील निवडणुकांमध्ये रस नाही.
काँग्रेस मधील काही दिग्गज नेत्यांचा एक वर्ग प्रशांत किशोरच्या पक्षप्रवेशाला घेऊन सावध होता. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गटाच्या नेत्यांनी प्रशांत किशोर यांच्या कंपनीच्या अनेक राज्यांतील काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी पक्षांशी केलेल्या कराराचा उल्लेख केला होता.
पीकेची हैदराबादमध्ये केसीआर यांच्यासोबतची बैठक आणि टीआरएससोबत झालेल्या कथित समझोत्यावरही बैठकीत चर्चा झाली. तसेच प्रशांत यांनी भाजपा आणि आम आदमी पार्टी सोबत देखील काम केले आहे.
पुढचा रस्ता सोपा नाही हे काँग्रेसला माहीत आहे, भाजपच्या रूपाने एक मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. परंतु अजुनही काँग्रेस हे आव्हान स्वीकारण्याच्या स्थितीत नाही. कारण भाजप आपले पत्ते अतिशय काळजीपूर्वक उघडत आहे.
आता काँग्रेस सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नशील असताना आता काँग्रेसला नवीन रणनीतिकारांची गरज आहे, परंतु किशोर प्रकाश यांनी नकार दिल्याने कांग्रेसच्या पदरी निराशा आली आहे.
कारण २०१७ मध्ये यांनीच उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे संपूर्ण काम हाती घेतले होते. अखिलेश यादव यांनी काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढवली होती, पण निकाल आल्यावर दोन्ही पक्ष वैतागले होते. त्यामुळे आता प्रशांत किशोर यांनी पार्टी माध्ये सामील होण्यास नकार दिल्याने, काँग्रेस पक्षाची पुढची नीती काय असेल, यांवर सगळ्यांचे लक्ष असणार आहे….!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.