Site icon InMarathi

एकेकाळच्या डी-गँग फायनान्सरकडून नवनीत राणांनी कर्ज घेतलंय का?

yusuf final im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलीवूड आणि अंडरवर्ल्ड यांच्यातील साटंलोटं आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलोत आहोत, अगदी बॉलीवूडच्या मंडळींनी अंडरवर्ल्ड सोबतचे असलेले संबंध जरी नाकारले तरी त्याचे अनेकदा पुरावे आपल्यासमोर आले आहेत. नेतेमंडळी आणि अंडरवर्ल्डचे संबंध आहेत अशा बातम्या सध्या येऊ लागल्या आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

झालं असं की राज ठाकरेंनी सुरु केलेल्या हनुमान चालिसाला देशभरातुन प्रोत्सहन दिले आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आणि त्यांनी थेट मातोश्री वर येऊन हनुमान चालीसा पठणाचा घाट घातला होता मात्र त्यांनी नंतर माघार घेतली.

 

 

शिवसैनिकांनी मात्र त्यांना चांगलाच विरोध केला, त्यांना अटक झाली, आणि नुकतंच संजय राऊत यांनी एक धक्कादायक विधान केले आहे की नवनीत राणा आणि रवी राणा यांचे युसुफ लक्कडवाला याच्याशी संबंध आहेत. त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाला असून त्याची चौकशी करावी..

नेमकं राऊत काय म्हणाले?

संजय राऊत जसे टीव्ही माध्यमांमधून विरोधी पक्षावर टीका करत असतात तसेच ते ट्विटरच्या माध्यमातून देखील टीका करतात, त्यांनी ट्विट करत राणा दाम्पत्यावर टीका केली आहे. ते असं म्हणतात की युसुफ लक्कडवाला ज्याला ईडीने मनी लौंड्रीच्या आरोपाखाली अटक केली होती, त्याचा जेलमध्येच मृत्यू झाला.

लक्कडवाल्याने जो गैरमार्गाने पैसे कमवला आहे तो नवनीत राणा यांच्या अकाउंटमध्ये आहे. ईडी कधी नवनीत राणांना चहा पाजणार? ईडी का या डी गॅंगला वाचवत आहे? भाजप का शांत आहे? अशा शब्दात त्यांनी टीका केली.

 

कोण आहे युसूफ लक्कडवाला?

युसुफ लक्कडवाला मुंबईमधील एक प्रसिद्ध बिल्डर होता, पण तो प्रकाशझोतात आला तो बॉलीवूडमुळे, अनेक प्रसिद्ध अशा बॉलीवूडच्या सिनेमांची त्याने निर्मिती केली आहे. याच दरम्यान त्याचा संबंध डी गँगशी आला आणि तो डी गँगचा फायनान्सर बनला.

२०१९ साली एका जमीन खरेदी व्यवहारात त्याने कागदपत्रांची फेरफार करून पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केले होते तेव्हा त्याला मुंबई पोलिसांनी पकडले होते. गुजरात विमानतळावरून तो लंडनला जाण्याचा प्रयत्नांत असताना त्याला अटक करण्यात आली होती. प्रसिद्ध अभिनेत्री साधनाला धमकवण्याचे आरोप देखील त्याच्यावर करण्यात आले होते मात्र त्यातून त्याची सुटका झाली.

 

 

युसूफला ईडीने अटक केल्यांनतर त्याची रवानगी आर्थर रोडमध्ये करण्यात आली होती मात्र तो आधीच कॅन्सरग्रस्त असल्याने त्याचा मृत्यू जेलमध्येच काही महिन्यांपूर्वी झाला.

नवनीत राणा यांच्यावर आरोप तरी काय?

 

 

युसुफ लक्कडवाला याच्याकडून नवनीत राणा यांनी ८० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. तसेच पुरावा म्हणून एक अफेडेव्हिट दाखवले आहे.

खरं तर हनुमान चालिसाच्या पठणावरून सुरु झालेला हा प्रकार आता एक वेगळ्याच वळणावर जाऊन पोहचणार हे नक्की, येत्या दिवसात यातील आणखीन काही वादग्रस्त गोष्टी आपल्यासमोर येतीलच. त्यांनी खरंच असे कर्ज घेतले होते का? याबद्दलची माहिती समोर येईलच.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version