कुठे मुके वेटर्स, तर कुठे दत्तक घेतलेल्या मांजरी; मुंबईतल्या या ८ कॅफेजमध्ये जायलाच हवं
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मंडळी..आपण हॉटेलमध्ये, कॅफेमध्ये मित्रांसोबत-आपल्या जवळच्या लोकांसोबत कायम मजा करायला किंवा आताच्या भाषेत हँगआऊट करायला जात असतो पण मुंबईत अशी काही हॉटेल किंवा प्रामुख्याने कॅफे आहेत जी काही कारणांमुळे विशेष आहेत.
दरवेळी आपल्या एखाद्या ठराविक कॅफेमध्ये जाण्यापेक्षा अश्या काही ‘विशेष’ ठिकाणी जाऊन आपण आपला विकेंड एन्जॉय करू शकतो. कोणती आहेत ती ठिकाणं? चला तर मग पाहुयात…
१. कॅट कॅफे स्टुडिओ (Cat Cafe Studio) :
या जगात प्राणिप्रेमी काही कमी नाहीत. त्यात मांजरप्रेमींची संख्या तर काही विचारू नका. अश्याच मांजरप्रेमींसाठी हे कॅफे आहे. कॅट कॅफे स्टुडिओ हा भारतातील पहिला कॅट कॅफे आहे जिथे ४० हुन अधिक मांजरी आहेत.
या सर्व मांजरी दत्तक घेतलेल्या किंवा काही काळ सांभाळण्यासाठी घेतलेल्या आहेत. २००९ मध्ये पहिल्या मांजरीला वाचवण्यापासून याची सुरुवात झाली आणि २०१५ मध्ये याने एक संघटित आणि सार्वजनिक स्वरूप धारण केले.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
त्याचे प्राथमिक उद्दिष्ट भटक्यांना दत्तक घेणे व त्यांचा सांभाळ करणे आहे .
पत्ता : कॅट कॅफे स्टुडिओ-आराम नगर भाग-1,हरमिंदर सिंग रोड, वर्सोवा,अंधेरी वेस्ट,मुंबई
२. बंबई नजरीया (Bambai Nazariya) :
मंडळी ट्रेन, बस किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी आपल्याला तृतीयपंथी लोक दिसतात. मात्र महाराष्ट्राच्या राजधानीत एक असा अनोखा कॅफे सुरू करण्यात आलाय की तिथे सर्व कर्मचारी तृतीयपंथी आहेत.
सामाजिक काम करून समाजालाच आरसा दाखवण्याचे काम या तृतीयपंथी लोकांनी केले आहे. मुंबईतील अंधेरी भागातील या कॅफेमध्ये उत्तम जेवण तर मिळतेच पण सर्व कर्मचारी आदराने सेवादेखील देतात.
पत्ता: बंबई नजरीया-आस्था बंगला ३०, जे.पी रोड,आराम नगर २, जीत नगर, वर्सोवा,अंधेरी वेस्ट, मुंबई
३. मिर्ची अँड माईम (Mirchi & Mime) :
मिर्ची अँड माईम हे पवईमधील एक अनोखे कॅफे आहे. हे एक आधुनिक-भारतीय खाद्यपदार्थ देणारे एक ट्रेंडी जेवणाचे रेस्टॉरंट आहे. भारतात प्रथमच, केवळ बोलण्यास आणि ऐकण्यास कमी येणाऱ्या म्हणजे मूकबधिर बांधवांकडून चालवले जाणारे हे कॅफे आहे.
इथे अत्यंत स्वादिष्ट खाद्यपदार्थ तितक्याच संयतपणे व शांतपणे आपल्याला सर्व्ह केले जातात.
पत्ता : मिर्ची अँड माईम-जी ६ तळमजला Transocean House,हिरानंदानी बिझनेस पार्क, पवई, मुंबई
४. कॅफे अर्पण (Cafe Arpan) :
आपल्या मुली ऑटिझम याने ग्रासलेल्या असताना काहीतरी अश्या लोकांसाठी सुरू करावे व स्वतःच्या चरितार्थासाठीही चालू करावे असा विचार डॉ.सुषमा नगरकर यांनी केला आणि हे कॅफे सुरू केलं.
ऑटिझम किंवा अन्य काही अपंगत्व आलेले कर्मचारी यात कार्यरत आहेत.सुरवातीला टिफिनची सेवा देणाऱ्या नगरकर आता एका उत्तम कॅफेच्या मालकीण झाल्या आहेत जिथे उत्तम चव आणि सर्व्हिस यांचं मिश्रण पाहायला मिळतं.
पत्ता : कॅफे अर्पण, जुहू ऋतुराज CHS,SNDT विद्यापीठासमोर, जुहू, मुंबई
५. म्हैसूर कॅफे (Mysore Cafe) :
जुने ते सोने असतं अस म्हणतात. १९३० मध्ये स्थापन करण्यात आलेला हा म्हैसूर कॅफे मुंबईतील सर्वोत्तम दक्षिण भारतीय कॅफेंपैकी एक आहे.पारंपरिक पद्धतीचे डोसे ते अगदी रिअल सांभार आणि चटणी.
विशिष्ट असा दक्षिणात्य पद्धतीचा चहा ही इथली खासियत. तुम्ही जर खरोखर साऊथ इंडियन खाण्याचे शौकीन असाल तर या कॅफेला नक्की ट्राय करा!
पत्ता : म्हैसूर कॅफे,दुर्लभ निवास,डॉ.आंबेडकर रोड,माहेश्वरी उद्यानासमोर,माटुंगा, मुंबई
—
- हे ७ कॅफेज फक्त खाबूगिरीसाठीच नव्हे, तर नेत्रसुखासाठीही आहेत प्रसिद्ध!
- मौल्यवान सोन्याच्या रक्षणासाठी रात्रभर हादडणारी धमाल सराफा गल्ली!
—
६. पृथ्वी कॅफे (Prithvi Cafe) :
तरुणाईसाठी खास असं एक सुंदर कॅफे म्हणजे पृथ्वी कॅफे. खिमा पाव, चहाचे विविध प्रकार, पराठा, आयरिश कॉफी या सगळ्यासाठी प्रसिद्ध असलेले हे कॅफे तरुणांसाठी हँगआउट करायची बेस्ट जागा आहे.
पृथ्वी थेटरच्या अगदी जवळ असणारे हे कॅफे तुम्ही चुकवू नका! तुमचा विकेंड खऱ्या अर्थाने या पृथ्वी कॅफेमधेच सार्थकी लागेल.
पत्ता: जानकी कुटीर अपार्टमेंट, पृथ्वी थेटर जवळ,जुहू चर्च रोड, मुंबई
७. फार्मर्स कॅफे (Farmer’s Cafe) :
फार्मर्स कॅफे ही जागा अश्या खवय्या लोकांसाठी आहे की जिथे रिअल शेतातील अनेक गोष्टी थेट तुमच्या ताटात वाढल्या जातात. बिटाचे काही पदार्थ असतील किंवा रासबेरी-स्ट्रॉबेरीचे बरेचसे पदार्थ अगदी नैसर्गिक स्वरूपात तुमच्यासमोर ठेवले जातात.
या कॅफेचे वैशिष्ट्य हेच आहे की ‘जास्त प्रक्रिया न करता पदार्थाची नैसर्गिकता टिकवत त्याचा स्वदिष्टपणा वाढवणे’. बऱ्याचश्या लोकांचे म्हणणे हे असते की बाहेरचे खाणे म्हणजे मग तेलकट किंवा मसालेयुक्त असू शकतं पण या कॅफेच्या पदार्थांचा साधेपणाच तुम्हाला आवडून जाईल.
ताज्या भाज्या, उत्कृष्ट फळे यांचा वापर या कॅफेमध्ये केला जातो.आम्हाला खात्री आहे की तुम्हाला तुमच्या चवीनुसार इथे काहीतरी सहज मिळेल!
पत्ता: फार्मर्स कॅफे, किंचिन रोड, खार पश्चिम, मुंबई-400052
८. बेस्ट बडीज कॅफे (Best Buddies Cafe) :
बेस्ट बडीज कॅफे हे एक कॅज्युअल, स्टायलिश आणि तरीही परवडणारे हँग-आउट ठिकाण आहे जे उत्तम दर्जाचे जेवण आणि उत्तम सेवा देते. खास मित्रांना वेळ देण्यासाठी व त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
इथे नॉटी कॉर्नर, सेल्फी पॉईंट, ब्लॅकबोर्ड अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही मित्रांसोबत उत्तम फोटो क्लिक करू शकतात.
इथली खासियत म्हणजे इथल्या मेनुकार्डकडे तुम्ही बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की परवडणाऱ्या किमतीत उत्कृष्ट दर्जाचे अन्न आणि ड्रिंक्स इथे मिळतात. या ठिकाणी बोर्ड गेम आणि टेबल गेम देखील आहेत जिथे तुम्ही तुमची ऑर्डर येईपर्यंत मित्रांसोबत खेळू शकतात.
पत्ता : बेस्ट बडीज कॅफे, ओशिवरा पोलिस स्टेशन रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई
अश्या काही विशिष्ट ठिकाणी जाऊन आपण आपला विकेंड एन्जॉय करू शकतो आणि काही प्रमाण समाजातील या घटकांना नकळत मदत करून प्रोत्साहन देऊ शकतो!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.