त्या ‘एका’ अटीमुळे अमृता सिंग आणि रवी शास्त्रीचं फिस्कटलं आणि सैफुची एंट्री झाली
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
बॉलीवूड आणि क्रिकेट जगतमध्ये अशा अनेक प्रेमकथा आहेत, ज्या गाजल्या तर खुप, पण त्या यशस्वी होऊ शकल्या नाहीत. परंतु जरी या प्रेमकथा यशस्वी होऊ शकल्या नसल्या तरी लोकांनी अजुनही यांना लक्षात ठेवले आहे.
क्रिकेट आणि बॉलीवूड या दोघांचे नाते खूप जुने आहे. शर्मिला टागोर-मंसूर खान पतौडी या प्रतिष्ठित जोडीपासून तर विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या जोडीपर्यंत, क्रिकेटपटू आणि अभिनेत्रींच्या या प्रेमकहाण्यांनी प्रत्येक वेळी ठळक बातम्या मिळवल्या आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
आजच्या लेखात आपण अशाच एका जोडीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या प्रेमाची चर्चा संपूर्ण बॉलीवुड आणि क्रिकेट जगात होती. परंतु फक्त त्या ‘एका’ अटीमुळे त्या जोडप्यांच लग्न तुटले आणि त्या दोघांच्या मधात तिसऱ्याची एंट्री झाली.
१९८० मध्ये रवी शास्त्री आणि अभिनेत्री अमृता सिंग यांच्या प्रेमप्रकरणाच्या बातमीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यावेळी रवी शास्त्री हे भारतीय क्रिकेट संघातील सर्वात जास्त लोकप्रिय असलेले खेळाडू होते आणि याच कारणामुळे लोकांनी त्यांना क्रिकेट संघाचा ‘पोस्टर बॉय’ बनवले होते. रवी शास्त्री यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे अमृता पण खूप आकर्षित झाली होती.
८० च्या दशकात या दोघांच्या अफेअरच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. अनेक सामन्यांदरम्यान अमृता रवी शास्त्री यांना चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचायची. दोघांची जवळीक तेव्हा चर्चेत आली जेव्हा एका मासिकाच्या मुखपृष्ठावर दोघांचे चित्र एकत्र दिसले होते. यानंतर रवी आणि अमृताचे अफेअर ८० च्या दशकातील सर्वात चर्चेत असलेले अफेअर बनले.
कालांतराने, यांच्या प्रेमाकहाणीची चर्चा सर्वत्र सुरु झाली होती. यानंतर काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर १९८६ मध्ये दोघांचा साक्षेगंध पार पडला, परंतु वेळेने दुसरेच काहीतरी ठरवले होते. असे म्हटले जाते की अमृता आणि रवी एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि जर रविने अमृतासमोर जर ती एक अट ठेवली नसती तर दोघांनी लग्न केले असते. अट अशी होती की लग्नानंतर अमृताने चित्रपटांपासून कायमचे संन्यास घ्यावे, म्हणजे पुन्हा कधीही चित्रपटांमध्ये अभिनय करू नये.
परंतु रवी शास्त्रींची ही अट अमृता सिंगला मान्य नव्हती. याचा परिणाम असा झाला की रवी शास्त्री आणि अमृता सिंग यांचे नाते कायमचे तुटले. मात्र, रवी शास्त्रीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अमृताच्या आयुष्यात लगेच अभिनेता विनोद खन्ना यांचा प्रवेश झाला.
विनोद खन्ना आणि अमृता सिंग यांनी ‘बंटवारा’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. येथूनच या दोघांमधील जवळीक वाढली होती. असे म्हटले जाते की, अमृता सिंग या अभिनेत्याच्या प्रेमात पार वेडी होती. मात्र, अमृता सिंगच्या आईला हे नाते मान्य नव्हते. यामागे त्यांनी दोन कारणे दिली होती.
पहिले कारण म्हणजे विनोद खन्ना यांचा आधी पण एक घटस्फोट झाला होता आणि दुसरे मोठे कारण म्हणजे विनोद खन्ना वयाने अमृता सिंगपेक्षा खूप मोठे होते. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीच्या आईने तिच्या राजकीय संबंधांचा वापर करून मुलगी अमृता सिंगला विनोद खन्नापासून वेगळे केले. यानंतर, विनोद खन्ना आणि अमृता सिंग यांनी नातेसंबंधाच्या या गदारोळामुळे विचलित झाल्यानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
विनोद खन्ना यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर सैफ अली खानने अमृता सिंगच्या आयुष्यात प्रवेश केला आणि १९९१ मध्ये त्यांनी लग्न केले. सैफ वयाने अमृता सिंगपेक्षा १२ वर्षांनी लहान होता. मात्र, लग्नाच्या १३ वर्षानंतर सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचाही घटस्फोट झाला.
–
‘कपूर अण्ड सन्स’ चे हे २७ दुर्मिळ B&W फोटो चित्रपटप्रेमींनी पहायलाच हवेत
बॉसच्या मुलीच्या प्रेमात पडले परेश रावल; म्हणाले, ‘हीच होणार माझी पत्नी’!
–
यानंतर एका इंटरव्यू मध्ये सैफ याने या घटस्फोट विषयी माहीती दिली होती कि, अमृतापासून वेगळे होण्यामागचे कारण म्हणजे तिची वाईट वागणूक. अमृता माझ्या कुटुंबासोबतही नीट राहिली नाही. यामुळे आमची खट्टू होऊ लागली आणि शेवटी आम्ही दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
घटस्फोटाच्या वेळी, सारा १० वर्षांची होती तर तिचा भाऊ इब्राहिम फक्त ४ वर्षांचा होता.तर ही आहे अमृता सिंह यांची तीन वेगवेगळी प्रेमकहाणी, ज्यात एकही शेवटपर्यंत टिकली नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.