Site icon InMarathi

तुम्हाला माहित आहे का? बँकचे चेक तब्बल ८ प्रकारचे असतात!

cheque-types-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आर्थिक व्यवहार करणाऱ्यांचा बँकेच्या व्यवहारांशी नेहमीच संबंध येतो. बँक म्हटलं की चेक ओघाने आलाच. अगदी भाडेकरूने भाडं देण्यासाठी, अनेक प्रकारच्या स्पर्धांची बक्षिसं देणं, किंवा तत्सम काहीही काम करताना चेकचा वापर आजही हमखासपणे केला जातो. तुम्ही सुद्धा चेक वापरात असालच.

पण तुम्हाला माहित आहे का तुम्ही जो बँकेचा चेक वापरता तो एकाच प्रकारचा नसतो. तर त्याचे तब्बल ८ प्रकार असतात आणि ही गोष्ट अजूनही बऱ्याच जणांना माहित नाही.

चला तर जाणून घेऊया कोणते आहेत हे ८ प्रकार!

१. बेयरर चेक किंवा ओपन चेक

 

 

या चेकवर Bearer हा उल्लेख आढळतो. बेयरर चेकची रक्कम त्या व्यक्तीला दिली जाते जो व्यक्ती तो चेक बँकेत घेऊन जाईल किंवा ज्याचे नाव त्या चेकवर लिहिलेले असेल.

परंतु असा चेक देणे धोकादायक असते कारण जर चेक हरवला आणि कोणत्याही अज्ञात व्यक्तीला तो मिळाला तर तो व्यक्ती याचा वापर करून रक्कम काढू शकतो.

मग त्याचे खाते त्या बँकेत असो वा नसो काही फरक पडत नाही.

 

२. ऑर्डर चेक 

 

 

जेव्हा चेकवर लिहिलेला Bearer हा शब्द पेनाने खोडला जातो आणि त्याच्या जागी ऑर्डर असे लिहिले जाते तेव्हा अश्या चेकला ऑर्डर चेक म्हटले जाते.

अश्या चेकची रक्कम त्या व्यक्तीला दिली जाते ज्या व्यक्तीचे नाव या चेकवर लिहिलेले असते. याव्यतिरिक्त यामध्ये त्या व्यक्तीला सुद्धा रक्कम दिली जाऊ शकते. ज्या व्यक्तीच्या नावावर चेक हस्तांतरीत केला गेला आहे.

३. क्रॉस चेक किंवा अकाउंट पेयी चेक

 

 

या चेकच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात दोन समांतर रेषा ओढल्या जातात. किंवा त्यावर AC Payee असे लिहिले जाते.

क्रॉस चेकमुळे ज्याला पैसे मिळणार आहेत त्याला बँकेत चेक सादर केल्यावर हातात रक्कम मिळत नाही, ती रक्कम त्याच्या खात्यामध्ये जमा केली जाते.

४. अॅंटे-डेटेड चेक

 

 

जर एखाद्या चेकवर तो चेक बँकेत जमा करण्याच्या आधीची तारीख लिहिलेली असेल तर त्या चेकला पूर्व-तारखेचा चेक म्हणजेच अॅंटे-डेटेड चेक म्हटले जाते.

याप्रकारच्या चेकची वैधता चेक दिल्यानंतरच्या तारखेपासून तीन महिन्यांपर्यंत असते.

५. पोस्ट डेटेड चेक

 

 

जर एखादा चेक येणाऱ्या तारखेसाठी (Future Date) देण्यात आलेला असेल तर अशा प्रकारच्या चेकला नंतरच्या तारखेच्या चेक म्हणजे पोस्ट-डेटेड चेक म्हटले जाते.

या प्रकारच्या चेकमध्ये त्यावर दिलेल्या तारखेच्या आधीच चेक वटवला जाऊ शकतो.

६. स्टेल चेक

 

जर चेक दिल्यानंतरच्या तारखेनंतर बँक मध्ये पास होण्यासाठी आल्यास अश्या चेकला शिळा म्हणजेच स्टेल चेक म्हटले जाते. अशा प्रकारचा चेक बँकेकडून वटवला जात नाही.

कारण –

रिजर्व बँकच्या नियमांनुसार – चेक दिलेल्या तारखेनंतर ३ महिन्याच्या आत वटवला गेला पाहिजे म्हणजेच रक्कम काढली पाहिजे.

 

७. सेल्फ चेक

 

 

या प्रकारच्या चेकचा उपयोग खाते असणाऱ्या व्यक्तीला स्वतःसाठी रक्कम काढण्यासाठी होतो.

पहिल्या नियमांनुसार या प्रकारच्या चेकने केवळ त्याच बँकेमध्ये रक्कम काढता येत होती. ज्या बँकेत खाते धारकाचे खाते आहे. परंतु आता या प्रकारच्या चेकने संपूर्ण भारतामध्ये कुठेही रक्कम काढता येते.

८. कॅन्सल्ड चेक

 

 

अश्या प्रकारचा चेक हा वटवला जात नाही, या चेकने तुम्ही कोणतीही रक्कम काढू शकत नाही. या चेकचा उपयोग एखाद्या व्यक्तीला आपल्या बँक खात्याची माहिती देण्यासाठी केला जातो.

Employee Provident Scheme (EPS) साठी सुद्धा या प्रकारच्या चेकचा उपयोग केला जातो.

ही माहिती शक्य तितकी शेअर करा आणि इतरांना देखील हे प्रकार समजून घेण्यात मदत करा.

  1. आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :


           


===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version