Site icon InMarathi

जेव्हा दारा सिंगनी २०० किलोच्या ‘किंगकाँग’ला उचलून रिंगच्या बाहेर फेकून दिले होते…

dara final im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुम्हाला जब वी मेट सिनेमा आठवत असेल तर त्यात एका सीनमध्ये करीना कपूर आपल्या आजोबांना तिच्यासोबत घडलेला पूर्ण प्रकार सांगते, संपूर्ण सिनेमात बडबड करणारी गीत म्हणजे करीना कपूर आपल्या आजोबांसमोर मात्र एखाद्या गुणी मुलीसारखी शांतपणे उभी असते. तिच्या आजोबांच्या भूमिकेत होते दारा सिंग.

आज खलीची जितकी चर्चा होते तितकीच चर्चा पूर्वी दारा सिंग यांची व्हायची. पंजाबचे पुत्तर असलेल्या दारा सिंग यांनी कधीकाळी अनेक मात्तबर पैलवानांना थेट आसमान दाखवले आहे, त्यातीलच एका पैलवानाबद्दल आजच्या लेखात जाणून घेणार आहोत…

 

 

दारा सिंग यांना आपण जरी सिनेमातून ओळखत असलो तरी ते आधी पैलवान होते. पंजाबची मातीतून जसे सोनं पिकते तसे अनेक पैलवान देखील तयार होतात. आपल्या भावासोबत त्यांनी गावातून पैलवानीला सुरवात केली, आणि तालुका स्तरावरील अनेक कुस्त्या त्यांनी जिंकल्या.

 

 

आपल्यातील कुस्तीला आणखीन वाव देण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील प्रयत्न केले आणि यशस्वी झाले. उंची, बलदंड शरीर या त्यांच्या जमेच्या बाजू असल्याने त्यांनी सिंगापूर येथे जाऊन प्रोफेशनल रेसलिंगचं ट्रेनिंग घेण्यास सुरवात केली.

ग्रेट वर्ल्ड स्टेडियममध्ये हरनाम सिंग या कोचच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग घेण्यास सुरवात केली. पोटापाण्यासाठी एका मिलमध्ये नोकरी देखील केली. बघता बघता ट्रेनिंग देखील संपले आणि दारा सिंग मातब्बर पैलवानांना हरवण्यासाठी मैदानात उतरले.

२०० किलोच्या किंग काँगला फेकलं?

दारा सिंग यांनी २० वर्षात देशविदेशातल्या पैलवानांना धूळ चार्ली होती. त्यातीलच एक पैलवान होता औस्ट्रेलियाचा किंग काँग, तब्बल २०० किलोच्या या पैलवानाच्या कुस्तीचा सामना आजही अनेकांच्या लक्षात आहे.

 

 

या महाकाय पैलवानाला दारा सिंग यांनी अगदी सहज उचलून कुस्तीच्या रिंगमधून बाहेर फेकून दिले होते. दारासिंग यांनी आपल्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत जवळजवळ ५०० कुस्त्यांच्या सामन्यात एकदाही  हार पत्करली नाही. १९८३ साली त्यांनी शेवटचा कुस्तीचा सामना खेळला.

पैलवानीतून अभिनयाच्या आखाड्यात :

तांबड्या मातीत खेळलेल्या पैलवानाने अभियानाच्या आखाड्यामध्ये पाऊल ठेवले आणि तिथेही यशस्वी झाले. कुस्तीप्रमाणे त्यांनी जवळजवळ १०० च्या वर सिनेमात काम केले. मात्र त्यांचं एक पात्र चांगलंच गाजलं ते म्हणजे हनुमानाचं, ८० च्या दशकात घरोघरी आवर्जून बघितली गेली अशी एक मालिका होती ती म्हणजे रामानंद सागर यांची रामायण ही मालिका, यातील दारा सिंग यांनी साकारलेले पात्र आजही लोकांच्या लक्षात आहे.

 

 

अभिनेत्री काम करण्यास नकार द्यायच्या :

आपल्या भारदस्त शरीराने त्यांनी अनेकांना आसमान दाखवले खरे मात्र बॉलीवूडमध्ये त्यांना थोडीशी पंचाईत झाली होती, कारण त्याकाळातील अभिनेत्रींना इतक्या भारदस्त नायकासमोर काम करण्याची भीती वाटत असे, त्यामुळे त्या नकार देत असत.

 

 

पुरस्कारांनी सन्मानित :

भारताचं नाव जगभरात पोहचवणाऱ्या दारा सिंग यांना रुस्तम ए पंजाब,कॅनेडियन ओपन आणि रुस्तम ए हिंद या पुरस्कारांनी सन्मानित केले होते. तसेच wwe सारख्या कुस्तीच्या कार्यक्रमात देखील त्यांचा सन्मान केला गेला आहे.

 

भारतीय जनता पक्षाकडून ते २००३ ते २००९ सालापर्यंत राज्यसभेचे खासदार होते , वयाच्या ८४ वर्षी या पंजाबच्या पुत्तरने मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version