Site icon InMarathi

पत्नीचं अफेअर, आत्महत्येचे विचार: यावर मात करून जबरदस्त कमबॅक…

dinesh karthik 3 IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा स्फोटक फलंदाज ‘दिनेश कार्तिक’ची बॅट सध्या आयपीएल २०२२ मध्ये जबरदस्त धावा करत आहे. त्याने आपल्या फलंदाजीच्या शैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरंनं (RCB) त्याला फिनिशरची भूमिका दिलीय आणि तो ती भूमिका चोख पार पाडतोय, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

आरसीबी च्या आत्तापर्यंतच्या चारही विजयात कार्तिकचा महत्त्वाचा वाटा आहे. धोकादायक फलंदाजीच्या बाबतीत त्याने युवा खेळाडूंनाही चकित केले आहे. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की एक काळ असा होता की पत्नीच्या अफेअरमुळे कार्तिक पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेला होता. आणि त्याच्या फलंदाजीचा आलेख खाली आला होता.

 

 

त्याचे क्रिकेटमधील करिअर पणाला लागले होते. वैयक्तिक आयुष्यातील संकटाचा सामना धिराने आणि संयमाने करत या खेळाडूने स्वत:ला दुसरी संधी देत आपली क्रिकेट कारकीर्द पुन्हा रुळावर कशी आणली हे आपण या लेखातून सविस्तर जाणून घेऊया.

आयुष्यात आपल्या सोबत काय घडते हे आपल्या हातात बऱ्याचदा नसते परंतु आलेली आकस्मिक संकटे, अपयश यांना आपण रिस्पॉन्स (रिऍक्ट नव्हे) कसे करतो याची लेटेस्ट स्टोरी म्हणजे दिनेश कार्तिक!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

तसे पाहिले तर खेळाडूंचे वैयक्तिक आयुष्य त्यांच्या खेळावर नेहमीच प्रभाव करते. दिनेशच्या बाबतीत ही असेच काहीसे घडले तरीही त्याने त्यावर मात करत केलेले कमबॅक कौतुकास्पद आहे.

दिनेश कार्तिक २००४ साली भारतासाठी पहिला सामना खेळला होता. त्यानंतर जरी तो संघात आत-बाहेर होत राहिला तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची उत्कृष्ट कामगिरी कायम राहिली.

भारतीय क्रिकेट टीम मधून सातत्याने वगळले गेले तरी त्याला तमिळनाडूच्या रणजी संघाचा कॅप्टन बनवण्यात आले आणि त्याची टीम रणजीमध्ये चांगली कामगिरी करत होती. एक वेळी होती जेव्हा दिनेश कार्तिक भारतीय संघात चांगली कामगिरी करत होता.

धोनीनंतर विकेटकिपर म्हणून त्याचीच ओळख होती पण याच काळात त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मोठे वादळ घोंघावत होते.

 

 

२००७ मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण निकितासोबत त्याने लग्न केलं. मात्र, काही काळानंतर कार्तिकच्या पत्नीचं क्रिकेटर मुरली विजयसोबत अफेअर सुरू झालं. एके दिवशी निकिताने ती मुरली विजयच्या बाळाची आई होणार असून तिला घटस्फोट हवा आहे असं कार्तिकला सांगितलं.

दोघांचा घटस्फोट झाला आणि लग्न मोडल्यानंतर कार्तिक मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोसळला. त्याने क्रिकेटचा सराव बंद केला, जिमला जाणं सोडलं आणि एकटा राहायला लागला.

दिनेशची बायको घटस्पोट घेऊन मुरली विजय सोबत संसारात रमली तर मुरली विजय पण चेन्नई सुपर किंगस कडून चांगली कामगिरी करत होता. दिनेशची कामगिरी इतकी खालावली की त्याच्या कडून तामिळनाडू रणजी संघाची कॅप्टनसी काढून घेऊन तीच मुरली विजयला देण्यात आली.

 

 

त्याची भारतीय संघातही निवड झाली आणि बराच काळ विजय टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियासाठी खेळला. पण दुसरीकडे कार्तिक मात्र डिप्रेशनमध्ये गेला.

आता आत्महत्या करून जीवन संपवून टाकावे असे त्याच्या मनात येऊ लागले होते. एके दिवशी त्याला ट्रेनिंग देणारा ट्रेनर त्याला भेटायला गेला असता त्याने त्याची ही अवस्था बघितली. ट्रेनरने त्याला जबरदस्ती जिमला नेले.

तिथे दीपिका पल्लीकल ही राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू पण येत असे. तिने दिनेश कार्तिकची ही अवस्था बघून त्याला आधार दिला. दोघांनी मिळून हळूहळू ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली. दीपिकाच्या आधाराचा परिणाम दिसू लागला. दिनेश कार्तिक प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धुवांधार बॅटिंग करू लागला.

 

 

त्याला भारतीय संघात पण घेतले गेले आणि तो कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा कॅप्टन पण झाला. दुसरीकडे मुरली विजयची कामगिरी मात्र खालावत चालली होती. तो चेन्नई सुपर किंग्स मधून पण बाहेर फेकला गेला.

कार्तिकच्या नेतृत्वाखाली कोलकाता टीम चांगली खेळली पण ते चॅम्पियन बनू शकले नाही त्यामुळे कार्तिकच्या जागी मॉर्गनला केकेआर चा कॅप्टन बनवण्यात आलं. यावेळी कार्तिक इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन फक्त आयपीएल खेळण्याचा विचार करत होता. कार्तिकच्या आयुष्यात पुन्हा अडचणी आल्या, पण यावेळी दीपिका त्याच्यासोबत होती.

२०१८ साली निदाहस ट्रॉफीच्या फायनलमध्ये सिक्स मारत दिनेश कार्तिकने भारताला सामना जिंकून दिला आणि तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. दिनेश कार्तिकने आपल्या तडाखेबंद कामगिरीने आपण संपलेले नसून फिनिक्सप्रमाणे पुन्हा भरारी घेऊन परत आलो आहोत हे दाखवून दिले.

 

 

डिलिव्हरीच्या अवघ्या सहा महिन्यांनी झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये दीपिका पल्लीकलने अनेक पदके कमावत आपल्या नवऱ्याप्रमाणे आपण पण कमी नाही हे सिद्ध केले.

जुळ्या मुलांचे पालक झालेल्या दिनेश आणि दीपिका या जोडीने ‘SKY is the LIMIT’ हे सिद्ध केले आहे. पुढे या दांपत्याने पोएस गार्डनमध्ये आपले स्वप्नातले भव्य घर विकत घेतले आणि आपला सुखी संसार सुरू ठेवला.

तुम्हाला कोणी दुख: दिले किंवा तुमची फसवणूक केली तर यात स्वत:ला दोष देण्यात काहीच मोठेपणा नाही. त्याऐवजी मनाचे बंद केलेले दरवाजे उघडा आणि आनंदाला आत येऊ द्या. तुम्हाला आणि आयुष्याला पुन्हा एक संधी द्या. दिनेश कार्तिकची गोष्ट आपल्याला हेच तर सांगते.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version