' CSK विरुद्ध गोलंदाजी करताना ऋषी धवनने ‘फेस शील्ड’ का घातले होते? – InMarathi

CSK विरुद्ध गोलंदाजी करताना ऋषी धवनने ‘फेस शील्ड’ का घातले होते?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या देशात दोनच विषय चर्चेत आहेत ते म्हणजे मशीदीवरील भोंगे आणि IPL. क्रिकेट प्रेमींची हक्काची पसंती म्हणजे IPL, आज घराघरात सिरीयल लावावी कि IPL बघायची यावरून वाद होताना दिसून येत आहे.

मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीमुळे त्यांना बराच टीकेचा सामना करावा लागत आहे. ५ वेळा चॅम्पियन्सपद पटकवणारे मुंबई इंडियन्स सलग ८ वेळा सामना हरले आहेत. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सना चांगलीच कंबर कसावी लागणार आहे तरच ते फायनल पर्यंत पोहचू शकतील.

 

ipl inmarathi

सचिनपेक्षाही दमदार क्रिकेट खेळणारा हा खेळाडू केवळ ‘एका’ कारणामुळे पडला मागे

दादाने, लॉर्ड्सवर “टी शर्ट काढून” साजरा केलेल्या विजयामागचा अविस्मरणीय किस्सा!

दरवेळी IPL कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे गाजत असतेच, पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज ऋषी धवन तब्बल ५ वर्षांनी IPLमध्ये परतला आहे, कोणत्या ही खेळाडूचे पुरागमन हा चर्चेचा विषय बनतो. कारण खेळाडू असो व कलाकार तो जर सातत्याने चांगली कामगिरी करत नसेल तर आपोआपच मागे पडला जातो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

गेली दोन वर्ष आपण मास्कमध्येच फिरत होतो, मध्यन्तरी मास्कपासून सुटका करण्यात आली होती मात्र आता पुन्हा एकदा सरकार मास्कची सक्ती करत आहे. आता असाच एक मास्क ऋषी धवनने घातल्याने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे…

 

rushi dhawan im 1

 

हा मास्क घालण्यामागचं कारण :

आतापर्यंत फलंदाजने वेगवान गोलंदाजांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हेल्मेट घातल्याचे आपण पहिले आहे मात्र गोलंदाजी करणारा ऋषीने का बरं अशा प्रकारचे स्वतःचे रक्षण करणारे मास्क परिधान केले असेल? तर ऋषीने याचे स्पष्टीकरण दिले आहे, त्याच म्हणणं असं आहे की ज्या खेळाडूची नुकतीच चेहऱ्याची अथवा नाकाची शस्त्रक्रिया झाली आहे अशांसाठी हा मास्क उपयोगी पडतो.

या मास्कद्वारे तुमच्या चेहऱ्याचे रक्षण केले जाते, तो पुढे असं म्हणाला की रणजी ट्रॉफमध्ये झालेल्या दुखापतीमुळे मला पहिले IPL चे चार सामने खेळता आले नाही.

 

rushi dhawan im

 

रणजी ट्रॉफीमध्ये झालेल्या दुखापतीमुळे त्याला IPL मध्ये खेळात येणार नाही अशी भीती होती मात्र ३२ वर्षीय ऋषीने दोन विकेट्स घेत सामन्यात आपला प्रभाव टाकला आहे.

ऋषी २०१४ ते २०१६ काळात पंजाब किंग्समध्ये होता तसेच २०१४ साली टीम फायनलपर्यंत पोहचली होती. मात्र कोलकाता नाईट रायडर्सकडून त्यांचा पराभव झाला होता. ऋषीला रणजी स्पर्धेतील यशाच्या आधारे किंग्स पंजाबने संधी दिली आहे.

 

kings punjab im

 

कधीकाळी वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांसमोर सुनील गावस्करांसारखे खेळाडू हेल्मेट न वापरता थेट मैदानात फलंदाजीसाठी उतरायचे. आज खेळाडूंना आपले करियर बनवण्यासाठी आपल्या परफॉर्मन्स प्रमाणे स्वतःची काळजी देखील घेणे महत्वाचे आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?