Site icon InMarathi

काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला कंटाळून, अखेर हार्दिक पटेल ‘भाजपच्या’ वाटेवर?

hardik final im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हार्दिक पटेल हे नाव घेतलं की राजकारणातील अनेक गोष्टी आठवतात. विशेषतः त्यांनी भाजपवर चढवलेला हल्ला आणि युवकांचं नेतृत्व या गोष्टींबद्दल बोलल्याशिवाय हार्दिक पटेल हा विषय पूर्णपणे संपू शकत नाही. पाटीदार समाजाला ओबीसी आरक्षण मिळावं यासाठी झटणारा हार्दिक पटेल हे या समाजातील नेत्यांपैकी एक नावाजलेलं नाव आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सुरुवातीला केवळ एक सामाजिक कार्यकर्ता म्हूणन काम करणाऱ्या हार्दिक पटेलने नंतर काँग्रेसचा हात पकडला आणि राजकारणात प्रवेश केला. एक हुशार राजकारणी ठरलेल्या हार्दिक पटेलला तिथेही उत्तम यश मिळालंय आणि आज गुजरात काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचा अध्यक्ष म्हणून तो काम पाहत आहे.

मात्र त्याचं सध्याचं वागणं पाहता, राजकारणाच्या सारीपाटात तयार झालेला हा राजकारणी, ‘काँग्रेस सोडून भाजपच्या वाटेवर आहे का?’ असा प्रश्न सध्या अनेकजण विचारू लागले आहेत. नेमकी काय आहेत याची कारणं, ते समजून घेऊयात.

 

Youtube

 

भगवं वस्त्र आणि…

गेल्या काही काळातील वागण्याबोलण्याचा विचार केल्यास, हार्दिक पटेल यांच्याबद्दल अशा उलटसुलट चर्चा होणं काही चुकीचं नाही असं म्हणायला हवं. नुकतंच स्वतःला रामभक्त म्हणवणारा हार्दिक पटेल, व्हॉट्सऍप डीपीमुळे अधिक चर्चेत आहे. त्याच्या या डीपीमध्ये त्याने भगव्या रंगाचं उपरणं परिधान केल्याचं दिसतंय.

रामभक्त असा स्वतःचा उल्लेख करणं आणि भगवं उपरणं वापरणं या दोन्ही गोष्टी काँग्रेस विचारसरणीशी मिळत्याजुळत्या अजिबातच नाहीत. याउलट या दोन्ही गोष्टी भाजपच्या विचारधारेशी साधर्म्य साधणाऱ्या आहेत. एवढंच नाही, तर व्हॉट्सऍप बायोमधून काँग्रेस हा शब्द गायब झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय.

 

 

गेले काही दिवस काँग्रेस नेते आणि हार्दिक पटेल यांच्यात बेबनाव असल्याची चर्चा आहे. याविषयी अनेकदा त्याने उघडपणे भाष्य सुद्धा केलं आहे. ‘एखाद्या नवरदेवाची नसबंदी केली असावी’ अशी माझी पक्षातील अवस्था झाली आहे, असंही हार्दिक याने मागे म्हटल्याचं सांगितलं जातं. या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेलचं असं वागणं शंकेला वाव देणारं ठरतंय.

हार्दिक पटेल म्हणतो की…

हार्दिक पटेल यांनी मात्र या अफवांविषयी बोलताना काहीसा सावध आणि वेगळा पवित्रा घेतल्याचं दिसतंय. “माझे मतभेद राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी नसून, स्थानिक नेतृत्वाशी आहे” असं ते सांगत आहेत.

 

 

अध्यक्ष असूनही, या नेतृत्वामुळे हवे तसे निर्णय घेता येत नसल्याचं हार्दिक पटेलचं म्हणणं आहे. आजवर काँग्रेस पक्षासाठी शंभर टक्के दिलं आहे आणि अधिकाधिक चांगलं काम कारण्याचा प्रयत्न केला आहे, असंही त्यांच म्हणणं आहे.

यंदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

यंदा डिसेंबर महिन्यात गुजरातच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. अशावेळी हार्दिक पटेलबद्दल भाजप नेत्यांनी केली कौतुकपूर्ण वक्तव्यं सुद्धा या अफवेला दुजोरा देण्यासाठी पुरेशी आहेत. गुजरात भाजपचे अध्यक्ष सी आर पाटील यांनी सुद्धा हार्दिकचं तोंड भरून कौतुक केल्याचं पाहायला मिळालं आहे.

 

asiadialogue.com

 

रामभक्त असल्याचं म्हणणं मांडणारा हार्दिक याने, “मला हिंदू असल्याचा गर्व आहे” असं वक्तव्य सुद्धा केलं होतं. गुजरातमध्ये या वर्षअखेरीस होत असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या गोष्टी शंका निर्माण करणाऱ्या आहेत असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही.

हार्दिकने दिला सराफ नकार

हार्दिकने मात्र या सगळ्या चर्चा म्हणजे निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं आहे. ‘भाजपमध्ये जाण्याचा कुठलाही मनसुबा नसून, मी काँग्रेसवासीच राहणार’ असं जणू काही ते ठासून सांगत आहेत.या अफवा नेमक्या कोण पसरवत आहे, हे ठाऊक नसल्याचं हार्दिक पटेल म्हणतोय. काँग्रेससाठी आजवर शंभर टक्के दिलं आहे आणि यापुढेही काँग्रेससाठी जीव ओतून काम करणार असल्याचं तो म्हणत आहे.

 

NewsClick

 

प्रत्येक पक्षात अंतर्गत मतभेद होत असतात, त्यातलाच हा एक भाग असल्याचं मत त्याने व्यक्त केलंय. मात्र गुजरात निवडणुकीत यश मिळवण्यासाठी झटणार असल्याचा पवित्रा हार्दिक पटेलने घेतला असल्याचं, त्याच्या बोलण्यातून तरी स्पष्ट दिसतंय. असं असूनही त्याने काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपचा झेंडा हाती घेण्याचं ठरवलं आहे, ही चर्चा काही थांबयचं नाव घेत नाहीये.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version