' स्विंग ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय? जाणून घेऊयात नीरज बोरगांवकर यांच्याकडून! – InMarathi

स्विंग ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय? जाणून घेऊयात नीरज बोरगांवकर यांच्याकडून!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण सहज आजूबाजूला चौकशी केली तर अशी अनेक उदाहरणं सापडतील जेव्हा सर्वसामान्य लोक डायट प्लॅन किंवा फिटनेस प्लॅन नियमित पाळू शकत नाहीत! यामध्ये अपयश येण्यामागे ते आपल्याला शेकडो कारणे आहेत.

जी लोकं यशस्वी झाली आहेत त्यांची आपण खोलात जाऊन चौकशी केली तर आपल्या लक्षात येईल यामागे केवळ यशाचा मंत्र हा एकच आहे ते म्हणजे सातत्य.

 

success mantra IM

 

इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत जर विचार केला तर सामान्य गुंतवणूकदारासमोर असलेले प्रश्न काही याहून वेगळे नाहीत. पण इन्वेस्टर समोर काही वेगळी कठीण  कारणं आणि चॅलेंजेस देखील असतात.

गुंतवणुकीचे निर्णय घेणे त्यांच्यासाठी खूप कठीण जातं कारण त्यांना असलेलं मर्यादित नॉलेज, मनातील भीती आणि एकांगी विचार करण्याची पद्धत (Bias). सामान्य गुंतवणूकदार इन्वेस्टमेंट पासून दूर राहण्याचं कारण म्हणजे मार्केटचे स्वरूप; मार्केट सतत वर-खाली, दोलायमान परिस्थितीत असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

गोल्ड, बॉन्ड, म्युच्युअल फंड आणि शेअर्स यामधील व्यवहार आता खुप सोपे आणि सोयीचे झाले आहेत, आड येते ती निर्णय-क्षमता.

योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये नेमकं काय करायचं हे समजून सांगणारी विश्वासाची, जबाबदार व्यक्ती हवी, अशीच एक व्यक्ती म्हणजे नीरज बोरगांवकर!

 

neeraj borgaonkar IM

 

गेल्या अनेक वर्षांपासून ते सामान्य इन्वेस्टरला या गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर नीट उलगडून सांगत आहेत.

===

शेअर मार्केटमध्ये दररोज हजारो कंपन्यांच्या शेअर्सचे व्यवहार सुरु असतात. सोमवार ते शुक्रवार सकाळी सव्वानऊ ते दुपारी साडेतीन या वेळेमध्ये हे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. दररोज या शेअर्सच्या भावांमध्ये चढ-उतार सुरु असतात. या शेअर बाजारामध्ये पैसे मिळवण्याच्या भरपूर संधी दडलेल्या आहेत.

सामान्यतः शेअर बाजाराचा विषय निघाला की लॉंग टर्म किंवा दीर्घकालीन गुंतवणूक करावी असा सल्ला दिला जातो. चांगल्या कंपन्यांचे शेअर्स ओळखून ते शेअर्स खरेदी करुन ठेवायचे आणि पाच, दहा, पंधरा वर्षे ते शेअर्स आपल्या खात्यामध्ये होल्ड करायचे अश्या पद्धतीची ही दीर्घकालीन गुंतवणूक असते.

दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये रिस्क थोडीशी कमी असते. परंतु त्यामुळे यामध्ये मिळू शकणारा रिटर्नदेखील मर्यादितच असतो. “हायर द रिस्क, हायर द रिटर्न” म्हणजेच तुम्ही जितका जास्त धोका पत्कराल तितका जास्त परतावा मिळणार हे कोणत्याही व्यवसायाचे तत्व आहे.

 

long term investment IM

 

शेअर बाजारामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक हा काम करण्याचा एक प्रकार आहे. याव्यतिरिक्तदेखील अनेक असे प्रकार आहेत ज्यामध्ये आपल्याला अधिक परतावा मिळण्याची शक्यता सर्वाधिक असते. दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये आपण आपल्या भांडवलावर वार्षिक पंधरा ते वीस टक्के परताव्याची अपेक्षा करु शकतो. परंतु आपल्याला जर यापेक्षा अधिक परतावा मिळण्याची इच्छा असेल तर आपल्याला शेअर मार्केटमध्ये काम करण्याचे इतर पर्याय अभ्यासणे गरजेचे आहे.

दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये कंपनीच्या फंडामेंटल्सचा अभ्यास केला जातो. ज्यामध्ये कंपनीचा महसूल, निव्वळ नफा, बॅलन्स शीट, दर वर्षी नफ्यामध्ये किती वाढ होत आहे, पुढील काळामध्ये कंपनीच्या नफ्यामध्ये कशी वाढ होऊ शकते, कंपनीचा व्यवसाय वाढीकरिता पूरक आहे का या आणि अश्या अनेक गोष्टींचा अभ्यास केला जातो. आणि हा सर्व अभ्यास करुन गुंतवणुकीवर मिळत आलेला सरासरी परतावा हा पंधरा वीस टक्क्यांहून अधिक नसतो.

दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये “पेशन्स” ठेवावा लागतो. चांगले चांगले शेअर्स देखील बरेचदा अपेक्षित वाढ दाखवित नाहीत. अश्या वेळेस दीर्घकालीन गुंतवणूकदाराला शांतपणे बसून रहावे लागते.

तसेच दीर्घकालीन गुंतवणुकीमधील सर्वात मोठी अडचण म्हणजे यामध्ये आपण एखादा शेअर शंभर रुपयांना खरेदी करतो, पुढील दोन तीन वर्षे तो अजिबात वाढत नाही, आपण कंटाळतो आणि हा शेअर आपल्या खरेदीच्या आसपासच्या किमतीला दोन तीन वर्षांमध्ये विकून टाकतो आणि आपण शेअर विकला रे विकला, की याच शेअरमध्ये जबरदस्त तेजी येते. आणि आपल्या वाट्याला येतो फक्त पश्चात्ताप!

 

share market featured inmarathi 2

 

दीर्घकालीन गुंतवणूक करु नये असे मी अजिबात म्हणत नाही. किंबहुना शेअर मार्केटमधील आपले फाऊंडेशन घट्ट करायचे असेल तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक ही हवीच हवी. परंतु आपले सर्व पैसे हे दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये ठेवून उपयोग होत नाही. आपल्याला आपल्या पैश्यांचे “अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन” करणे अत्यंत गरजेचे आहे.

शेअर मार्केटमध्ये काम करण्याचा अजून एक उत्तम प्रकार आहे तो म्हणजे “स्विंग ट्रेडिंग”. या स्विंग ट्रेडिंगला “पोझिशनल ट्रेडिंग”, “मोमेंटम ट्रेडिंग” या नावांनीदेखील ओळखले जाते. या स्विंग ट्रेडिंगमध्ये शेअरच्या भावांमध्ये जे चढ-उतार होतात त्यांचा फायदा घेऊन काम केले जाते.

 

swing trading IM

 

तुम्ही कोणत्याही शेअरचा चार्ट काढून बघितलात तर तुम्हाला असे लक्षात येईल की हा भाव सतत वर-खाली होत असतो. शेअरच्या किमतीचे हे असे वर खाली होणे यालाच “स्विंग” म्हणजे “झोका” असे म्हणतात. शेअरचा भाव वर केव्हा जातो, आणि खाली केव्हा येतो याचा अभ्यास करुन ट्रेड्स घेतले जातात व प्रॉफिट बूक केला जातो. यालाच स्विंग ट्रेडिंग असे म्हणतात. सामान्यतः स्विंग ट्रेडिंगचा कालावधी हा एखाद-दोन आठवडे ते दोन तीन महिन्यांपर्यंत असतो.

म्हणजेच समजा आज आपण शेअर्स खरेदी केले तर पुढील एक दोन आठवड्यांमध्ये किंवा जास्तीत जास्त दोन ती महिन्यांमध्ये हे शेअर्स विकून त्यामध्ये नफा बूक करणे अपेक्षित आहे. यशस्वी स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी पुढील तीन गोष्टी आपल्याला शिकून घ्याव्या लागतात –

१ – येत्या काळामध्ये ज्या शेअर्सचा भाव वर जाऊ शकेल असे शेअर्स ओळखणे
२ – आपले पैसे गुंतवताना “पोझिशन साईझिंग” व “स्टॉप लॉस” या दोन नियमांचे पालन करणे
३ – आपल्या कामामध्ये शिस्त बाळगणे

पोझिशन साईझिंग आणि स्टॉप लॉस हा एक फार मोठा विषय आहे. स्विंग ट्रेडिंग करताना आपण कोणत्या शेअरमध्ये किती पैसे गुंतवतो, आणि आपला स्टॉप लॉस कसा मॅनेज करतो हा या स्विंग ट्रेडिंगमधील सर्वात कळीचा मुद्दा आहे.

 

stop loss IM

 

यशस्वीरित्या स्विंग ट्रेडिंग कसे करावे या विषयावर गुंतवणूक कट्ट्याद्वारे येत्या रविवारी एका विनामूल्य वेबिनारचे आयोजन केले आहे. या वेबिनारमध्ये स्विंग ट्रेडिंगचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच स्विंग ट्रेडिंग कोणत्या शेअर्समध्ये करावे हे ओळखण्यासाठी एक स्पेशल इंडिकेटर तुम्हाला विनामूल्य देण्यात येईल व हा इंडिकेटर कसा वापरावा याचे विनामूल्य ट्रेनिंग देण्यात येईल.

या वेबिनारला उपस्थित राहण्याकरिता (विनामूल्य) रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. पुढील लिंकवरुन या वेबिनारसाठी रजिस्ट्रेशन करता येईल https://www.guntavnook.com/webinar

रजिस्ट्रेशन पूर्ण होताच वेबिनारची लिंक व्हॉट्सअ‍ॅप आणि ईमेलवर पाठवण्यात येईल.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

टीप : वरील माहिती ही फक्त आणि फक्त तुमच्या ज्ञानात भर पडावी याच उद्देशाने दिली गेली आहे. या माहितीच्या आधारावर शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये, शेअर्समध्ये गुंतवणूक करताना तज्ञ मंडळी यांचा सल्ला घेऊन नीट अभ्यास करूनच गुंतवणूक करावी.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?