Site icon InMarathi

घराचं रिनोवेशन स्वस्तात मस्त होण्यासाठी महत्त्वाच्या ५ टिप्स!

renovation 2 IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून’ ही म्हण सर्वमान्य आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकाने अनुभवली असेल आणि खरच आहे ते! लग्न करताना आणि घर बांधताना आपण आपल्या कल्पनांना पंख देतो आणि आपल्या स्वप्नाना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतो.

काही वर्षांनंतर, आपले तेच स्वप्नातले घर आपल्याला नव्याने सजवावेसे वाटते. घराच्या नुतनीकरणाचा अर्थ फक्त नव्याने सजावट किंवा प्लंबिंग दुरूस्ती किंवा छप्पर दुरूस्ती करणे हा होत नाही तर घराचे नूतनीकरण करताना खर्चाचा आकडा देखील वाढत जातो.

 

 

तेव्हा तुमच्या घराचे नूतनीकरण करताना तुम्ही जर काही स्मार्ट टिप्स वापरल्या तर ते नक्कीच फायदेशीर ठरू शकेल. आणि तुमचा खिसाही सांभाळला जाईल. कोणत्या आहेत या टिप्स?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१. ऑनलाइन खरेदी आणि डिजिटल वॉलेट :

 

 

तुमच्या घरासाठी नवीन फर्निचर, सजावटीचे सामान किंवा अक्सेसरीज खरेदी करायच्या असतील तर ऑनलाइन खरेदी हा उत्तम पर्याय आहे. कारण त्यात तुम्हाला एकाच ठिकाणी अनेक पर्याय उपलब्ध होवू शकतात. आणि ते तुमच्या बजेटमध्ये देखील असतात.

त्याचबरोबर कॅशबॅक आणि रिवार्ड्सचा आनंद घेण्यासाठी तुम्ही तुमच्या डिजिटल वोलेटचा पर्याय वापरू शकता. ऑनलाइन खरेदी करणे सोयीचे देखील आहे कारण त्यामुळे वेळेचीही बचत होते.

२. तुमच्याकडील जुन्या वस्तूंचा पुन्हा वापर करा :

 

 

बर्‍याचदा नवीन फर्निचर खरेदी करण्यापेक्षा जुना सोफा किंवा खुर्च्या यांचे नूतनीकरण करणे जास्त किफायतशीर आहे. तेव्हा नवीन फर्निचर खरेदी आणि जुन्याचे नूतनीकरण कण्यासाठी येणारा खर्च यांची तुलना करून त्यात जो बचत करून देईल असा पर्याय निवडावा.

३. वापरात नसलेल्या गोष्टी टाकून देण्यापेक्षा त्याची विक्री करा :

 

 

बरेचदा नूतनीकरण करताना आपण जुन्या किंवा वापरात नसलेल्या वस्तु टाकून देतो अशावेळी त्या वस्तूंची जुन्या बाजारात अथवा OLX सारख्या वेबसाइटवर आपण चांगल्या दरात विक्री करू शकतो किंवा एखाद्या संस्थेला वापरण्यास देवू शकतो.

४. आवश्यकतेनुसार बदल करा :

 

 

जेव्हा नुतनीकरणासाठी तुमच्याकडे मर्यादित बजेट उपलब्ध असते तेव्हा त्या बजेट मध्ये बसणारे सर्वोत्तम पर्यायी मार्ग शोधा.

कोणतेही बांधकामविषयक बदल करायचे असतील तर तुमच्या कॉंट्रॅक्टर सोबत चर्चा करून दोन/तीन पर्यायांवर विचार करा. सीमेंट ,वाळू अशी खरेदी करताना देखील हाच पर्याय निवडा. जेणेकरून तुमच्या बजेटमध्ये सर्वोत्तम मिळण्यास तुम्हाला मदत होईल.

खोल्यांचा ले आऊट बदलणे किंवा नवीन खिडक्या लावणे अशी काही कामे करायची असतील तर त्यातील मध्यम मार्ग निवडा जसे की संपूर्ण घराऐवजी घरातील एक किंवा दोन खोल्यांचे नूतनीकरण करा किंवा केवळ स्ट्रक्चरल दुरूस्ती करून घ्या. जेणेकरून तुमचे बजेट जास्त वाढणार नाही.

५. मोठ्या खर्चांवर पर्याय शोधा :

 

indianexpress.com

 

जेव्हा तुम्ही बजेटमुळे बांधील असता तेव्हा तुमच्या घराचे नूतनीकरण करण्याचे प्रभावी आणि परवडणारे मार्ग शोधा. जसे की इंटिरियर डेकोरेटरची नियुक्ती करण्या ऐवजी तुमच्या कल्पनेनुसार तुमचे घर सजवा. शेल्फ, ड्रॉवर अशा गोष्टी डिझाईन करून जागेची बचत करा.

अनेक सजावटीच्या वस्तु खरेदी करण्यापेक्षा काही आयकोनिक वस्तु सजावटीसाठी खरेदी करा. जागा मोठी दिसावी म्हणून प्रकाश व्यवस्था किंवा कार्पेट सारख्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करा.

एकाच क्लस्टरमध्ये वेगवेगळी कौटुंबिक छायाचित्रे लावून सजावट करा जेणेकरून कमी खर्चात आणि बजेटमध्ये तुम्ही तुमचे घर नव्याने सजवू शकता. याखेरीज पाइपिंग आणि ड्रेनेज सिस्टममध्ये मोठे बदल करू नका. या यंत्रणा हलवणे तुमच्या खिशाला भारी पडू शकते. त्यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाच्या पाईप्स वापरा ज्यांचे आयुष्य जास्त आहे आणि ते अडकणार नाही याची खात्री करा.

 

 

नूतनीकरण करताना, सौर पॅनेल, एलईडी लाइटिंग, स्टार-रेट केलेली उपकरणे यासारख्या ऊर्जा-कार्यक्षम वैशिष्ट्यांमध्ये गुंतवणूक करा. यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होवू शकेल.

तेव्हा मित्रांनो घराचे नूतनीकरण करताना तुमच्या कल्पनांना आमच्या स्मार्ट टिप्सची जोड द्या आणि तुमचे घर नव्याने सजवा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version