' चीनचा विकृत चेहरा दाखवणाऱ्या १३ गोष्टी : बुटक्यांचं प्रदर्शन, भुतांचं शहर आणि… – InMarathi

चीनचा विकृत चेहरा दाखवणाऱ्या १३ गोष्टी : बुटक्यांचं प्रदर्शन, भुतांचं शहर आणि…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. तसेच तिसरा सर्वात मोठा देश आहे. हा अवाढव्य देश पूर्व आशियाच्या मोठ्या भागात स्थित आहे. या देशाच्या चौदा राज्यांच्या सीमा येलो चीन, पूर्व चीन आणि दक्षिण चीनी समुद्राच्या तटांपर्यंत पसरलेल्या आहेत.

चीनचा बराचसा भाग हा डोंगराळ व वाळवंटी आहे. देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या एक दशांश म्हणजे १०% भागात शेती केली जाते.

या देशाच्या पूर्व भागाचा अर्धा भाग ही जगातील सर्वोत्तम जल-विभाजक भूमी म्हणून ओळखली जाते.

चीन म्हणजे सतत विकास करणारा, आधुनिक असणारा प्रगत देश अशीच त्याची सर्वत्र ओळख आहे. चीनने ज्या गतीने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे त्याने हा देश सतत कौतुकाचा विषय ठरलाय.

पण जगासमोर जरी फक्त असेच प्रगत आणि आधुनिक चित्र समोर येत असले तरी अगदी उलट परिस्थितीही इथे दिसते. चीनमध्ये अशाही काही गोष्टी आहेत ज्या तिथे असतील अशी तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल.

चीनची अशी काही रहस्ये आहेत जी प्रतिमा जपण्यासाठी जगासमोर न येण्याची त्यांनी संपूर्ण दखल घेतली होती. त्यांबद्दलच आम्ही या लेखात सांगणार आहोत.

 

१. गरीबी

 

china-secrets-marathipizza01

 

चीनची प्रगती, तेथील आधुनिक तंत्रज्ञान याबद्दल आपल्याला नेहमीच कुतुहूल वाटते. शिवाय आपण ज्या प्रमाणात चिनी वस्तू वापरतो त्यावरून तेथील उत्पादन, व्यवसाय आणि रोजगाराचा अंदाज येतो.

पण आपल्या समोर चीनची कितीही झगमगाटातील बाजू समोर आली असली तरीही याच्या अगदीच विरुद्ध परिस्थितीही काही ठिकाणी दिसते.

चीनमध्ये गरीबी मुख्य रुपात ग्रामीण भागात आहे. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार १०० दशलक्ष पेक्षा जास्त चीनी लोक निरक्षर आहेत. हे लोक प्रतिदिन १ डॉलरपेक्षा कमी पगारात जीवन जगत आहेत.

 

२. मृत्यू दंडाची शिक्षा

 

china-secrets-inmarathi

हे ही वाचा – हे १० पदार्थ जे आपण इथे ‘चायनीज’ म्हणून खातो ते खुद्द चीनमध्ये सुद्धा मिळत नाहीत!

चीन कठोर शिक्षा देण्यासाठी ओळखला जातो. जेव्हा कधी चीनमध्ये एखाद्याला मृत्युदंड दिला जातो तेव्हा त्याला एक विषारी इंजेक्शन दिले जाते किंवा गोळ्या घालून मारले जाते. या शिक्षेचा उल्लेख चीनच्या गुन्हेगार प्रक्रियात्मक कायद्याच्या कलम २५२ मध्ये केला आहे.

मानव अधिकार रिपोर्टनुसार जगातील इतर देशांच्या तुलनेत चीनमध्ये चार पट जास्त लोकांना मृत्युदंड दिला जातो. नोंदीनुसार चीनमध्ये जवळपास १७७० लोकांना गोळ्या घालून मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे.

 

३. वायू प्रदूषण

 

china-secrets-inmarathi

 

चीन मध्ये झपाट्याने होणारे औद्योगिकीकरण आणि खराब शहर नियोजनामुळे वायू प्रदूषणाचा स्तर खूप जास्त आहे.

झपाट्याने होणाऱ्या औद्योगिकीकरणामुळे चीनच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झालेली आहे. शिवाय जेटस्ट्रीम हे प्रदूषण अधिक पसरवते. त्याचा परिणाम म्हणून उत्तर कॅलिफोर्निया आणि सॅन फ्रांसिस्कोमध्येही या प्रदूषणाचे दुष्परिणाम जाणवतात.

 

४. रेनकार्नेशनचे निर्बंध

 

china-secrets-marathipizza04

 

हा निर्णय धार्मिक नाहीतर राजनैतिक होता. चीनी सरकारने लोकांवरील दलाई लामांचा प्रभाव कमी करण्यासाठी बौद्ध भिक्षूंच्या पुनर्जन्मावर प्रतिबंध लावला आहे.

 

५. जगातील सर्वात मोठा “रिकामा मॉल”

 

china-secrets-inmarathi

 

चीन नेहमीच नवीन उत्पादनाला आणि श्रमबळाला पाठींबा देतो. परंतु चीनमध्ये एक असा मॉल देखील आहे, ज्याच्या प्रवेशद्वारावरील एक दोन खाण्यापिण्याचे काऊंटर सोडले तर संपूर्ण मॉल रिकामा आहे.

न्यू साऊथ चायना मॉल असे त्या मॉलचे नाव आहे. यातील २३५० दुकानांची जागा पूर्णपणे रिकामी आहे. हा जगातील सर्वात मोठा रिकामा मॉल म्हणून ओळखला जातो.

असा “रिकामा मॉल” आपल्या देशात असणे म्हणजे आपल्या प्रतिष्ठेला डाग असल्याचे चीनला वाटते. त्यामुळे असा मॉल आपल्या देशात असल्याच्या गोष्टीचे त्यांनी वेळोवेळी खंडन केले आहे.

 

६. वेबसाईटवर प्रतिबंध

 

china-secrets-marathipizza06

 

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चीनमध्ये प्रतिबंध आहे.

येथे जवळपास ३००० संकेतस्थळांवर इंटरनेट सेंसरशीप धोरणानुसार बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना सूचना देण्यात आली आहे की त्यांनी फक्त सरकारने मान्य केलेल्या संकेतस्थळांचा वापर करावा.

तिथे २००९ पासून फेसबुक आणि ट्विटरवर बंदी आहे. तसेच २०१२ पासून न्यूयॉर्क टाइम्सवर सुद्धा बंदी आहे. कारण त्यात प्रसिद्ध झालेला एक लेख चिनी सरकारला पसंत नव्हता.

 

७. गुहेत राहणारे लोक

 

china-people-in-caves-inmarathi

 

चीनच्या शानक्सी प्रांतातील लोक गुहा खोदून आदिमानवांप्रमाणे राहतात असे काही वर्षांपूर्वी जगापुढे आले होते.

संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार चीनमध्ये गुहेत राहणाऱ्या लोकांची संख्या जवळपास ३५ मिलियन आहे.

 

८. जल प्रदूषण

 

china-secrets-marathipizza08

 

चीनी लोक अपुऱ्या पाणीसाठ्याने आणि सांडपाण्याच्या समस्येने त्रासले आहे. एकूण लोकसंख्येच्या अर्ध्या अधिक लोकसंख्येला दूषित पाणी प्यावे लागते हे सत्य आहे.

चीनमध्ये तयार होणाऱ्या सांडपाण्यापैकी फक्त दहा टक्के पाण्यावर प्रक्रिया होऊन त्याचा पुनर्वापर होतो. इतर दूषित पाणी चांगल्या पाण्यात मिसळते. त्यामुळे पाण्याच्या समस्येत अधिकच भर पडली आहे.

 

९. जन्म दोष

 

china-secrets-marathipizza09

हे ही वाचा – जोक्सवर बंदी ते पॉर्नसाठी मृत्यूदंड, उत्तर कोरियाचे १४ विचित्र कायदे!

प्रदूषित पर्यावरण आणि असुरक्षित खाद्यपदार्थांच्या वाढीमुळे चीनमध्ये इतर देशांच्या तुलनेत सर्वात जास्त जन्मदोष आढळून येतात.

चीनमध्ये १.२ मिलियन बालके जन्मतः दोषी आहे. २००१ पासून जन्मतः दोष असणाऱ्या बाळांचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढली आहे. आरोग्याबाबतची ही निरास्था चीनने जगासमोर येऊ दिलेली नाही.

 

१०. ख्रिश्चन धर्म

 

china-secrets-marathipizza10

 

चीनमध्ये ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची संख्या खूप जलद गतीने वाढत आहे. इथे इटलीमध्ये राहतात त्यापेक्षा जास्त ख्रिश्चन धर्माचे लोक राहत आहेत. एका अहवालानुसार सध्या चीनमध्ये अमेरिकेपेक्षा जास्त चर्च आहेत.

 

११. बुटक्या लोकांचे थीम पार्क

 

china-secrets-marathipizza11

 

चीनमध्ये पर्यटन वाढवण्यासाठी “फुलपाखरांसाठी वर्ल्ड इको गार्डन” आणि “ड्वोर्फ एम्पायर” (बुटक्या लोकांचे साम्राज्य) निर्माण केले आहे

 

१२. घोस्ट टाऊन (भूतांचे शहर)

 

china-secrets-marathipizza12

 

चीन जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे, परंतु असे असून सुद्धा चीनमध्ये कित्येक घोस्ट टाऊन (भूतांचे शहर) आहेत.

इथे ६५ मिलियन पेक्षा जास्त घरे रिकामी आहेत, परंतु ही घरे एवढी महाग आहेत की चीनी लोक त्यांना खरेदी करू शकत नाहीत.

 

१३. गोबी वाळवंटाचा वाढता विस्तार

 

china-secrets-inmarathi

 

एकीकडे संपूर्ण जग पर्यावरण असंतुलन रोखण्यासाठी काम करत आहे, तर दुसरीकडे चीनमध्ये मात्र गोबी वाळवंटाचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत चालला.

त्याबाबत चीन सरकार काहीही करू शकत नाहीये. पाण्याच्या स्त्रोतांची कमी असल्यामुळे आणि खूप मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड झाल्यामुळे हे गोबी वाळवंट वाढत चालले आहे.

चीनने प्रतिष्ठेपायी आणि जगात असलेली आपली कठोर प्रतिमा बदलू नये यासाठी उपरोक्त गोष्टी लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु अखेर त्या प्रकाशात आल्याच!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?