आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
ट्रॅक्टरसारखा पण प्रचंड महाकाय दिसणारा ‘बुलडोझर’ आपण सगळ्यांनीच कधी ना कधीतरी पाहिलेला असतो. बुलडोझर्सना मोठमोठी, वजनदार, धारदार पाती असतात.
खाणकाम, उत्खनन करायला, बांधकामाच्या ठिकाणी माती, वाळू, डांबर यांचं लेव्हलिंग करायला, मोठमोठ्या इमारती, झाडं तोडायला बुलडोझरचा वापर केला जातो.
काही काही गोष्टी या एका विशिष्ट प्रकारेच असतात. त्या तशाच असतात हे आपल्याही डोक्यात इतकं पक्कं झालेलं असतं की त्यापेक्षा वेगळ्या प्रकारे त्या का नाहीत असा विचार आपला मेंदूला सहसा शिवत नाही.
आजवर बऱ्याचदा आपल्या दृष्टीस पडलेल्या बुलडोझरचा रंग पिवळाच का असतो? लाल, काळा, निळा, जांभळा, हिरवा किंवा अन्य कुठला का नसतो?
हे प्रश्न आता वाचताना अनेकजण बुचकळ्यात पडतील. बुलडोझरला ‘बुलडोझर’ असं का म्हणतात? आणि त्याचा रंग कायम पिवळाच का असतो? हे जाणून घेऊ.
‘बुलडोझर’ या नावावरूनच आपल्याला काहीशी कल्पना येतेच. तरी हा शब्द नेमका कसा निर्माण झाला हे पाहू. ‘बुल’ आणि ‘डोस’ या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून बुलडोझर हा शब्द तयार झाला.
बुलडोझर नावाच्या या प्रचंड मोठ्या मशीनद्वारे मोठमोठी कामं अगदी लीलया पार पाडली जातात. कधीकधी एकाच मशीनचा दुहेरी उपयोग होतो.
त्या मशीनची रचनाच अशी असते की त्याच्या साहाय्याने आपल्याला निर्मितीही करता येते आणि एखादा आमूलाग्र बदल करण्याची गरज निर्माण झाली तर काहीतरी नवं उभं करण्याआधी आहे ते पाडता येणंही शक्य होतं.
बुलडोझर हे असंच एक मशीन आहे ज्याद्वारे आपल्याला एखादी वास्तू मूळापासून उभीही करता येते आणि एखादी मोठाली वास्तू पूर्णतः नेस्तनाभूत देखील करता येते.
क्रॉलर, व्हील, हायब्रिड, शिप आणि मल्चर असे बुलडोझरचे वेगवेगळे प्रकार आहेत. अगदी अवजड अशा वस्तू हलवण्यासाठी क्रॉलर बुलडोझरचा वापर केला जातो. चाकांऐवजी या बुलडोझर्सना क्रॉलर्स असतात.
—
- बापरे! या गावातील सगळेजण आहेत बुटके, वाचा एक न उलगडलेलं रहस्य…
- भारतात पांढऱ्या रंगाच्या कार्सचीच सर्वात जास्त विक्री का होते? जाणून घ्या ६ कारणे
—
सैन्याच्या रणगाड्यांमध्ये जे क्रॉलर्स असतात तेच या बुलडोझर्सना असतात. जिथे व्हील बुलडोझर्स व्यवस्थित काम करत नाहीत अशा ठिकाणी या बुलडोझर्सचा वापर केला जातो.
रस्त्यांवरची बांधकामं करण्यासाठी ‘व्हील बुलडोझर्स’चा वापर केला जातो. बऱ्याचदा हायवेवर हे बुलडोझर्स दिसतात. मल्चर बुलडोझर्स हे रानावनात वापरले जातात.
वाहतुकीदरम्यान आणि विमानतळांवर जे बुलडोझर्स दिसतात त्यांना ‘मिनी बुलडोझर्स’ म्हणातात. याद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू पोहोचवल्या जातात.
आता बुलडोझर पिवळ्याच रंगाचा का असतो हे पाहू. ओरिसा पोस्टच्या एका अहवालानुसार, बुलडोझर्सचा रंग सुरुवातीपासूनच पिवळा नव्हता. इतर रंगांचे बुलडोझर्सही यापूर्वी वापरले गेले आहेत.
५०व्या दशकात जेव्हा बुलडोझर तयार केला गेला तेव्हा त्याचा रंग लाल आणि पांढरा ठेवण्यात आला होता. मात्र, हे रंग वैज्ञानिकदृष्ट्या योग्य असल्याचं सिद्ध झालं नसल्यामुळे या रंगांवरून बरेच वादविवाद झाले. त्यानंतर हे रंग बदलण्यासंदर्भात चर्चा सुरू झाली आणि त्यानंतरच पिवळ्या रंगावर बुलडोझरचा रंग म्हणून शिक्कामोर्तब झालं.
हाच रंग निवडण्यामागे वेगवेगळे तर्क आहेत. पहिलं म्हणजे हा रंग व्यावसायिक बांधकामाचं प्रतीक आहे. दुसरं मोठं कारण म्हणजे हा रंग चटकन डोळ्यात भरेल असा चकचकीत असल्यामुळे तो दुरूनही सहज दिसेल म्हणून कुठल्याही बांधकामाच्या ठिकाणी वापरला गेला पाहीजे आणि तशाप्रकारे तो वापरला जातोही.
बऱ्याचदा अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टींमागे फार रंजक कारणं असतात. लहानपणी सगळ्याविषयीच फार कुतूहल असायचं तेव्हा रोज दिसणाऱ्या नवनव्या गोष्टींविषयी आपल्याला चटकन प्रश्न पडायचे.
मनोरंजनासाठी आता मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसणारे आपण कुठेतरी अशा छोट्या छोट्या गोष्टींचा उलगडा करण्यातल्या आनंदाला मुकतोय का? हा प्रश्न स्वतःला अधूनमधून विचारत राहायला हवा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.