बँकॉक, थायलंडला बॅचलर ट्रिप प्लॅन करताय? या १० गोष्टी कटाक्षाने टाळा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मंडळी..असं म्हणतात प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो. आपल्या प्रत्येकाला फिरायला आवडत असतं. काहींना आपला देश नीट फिरून समजून घ्यायचा असतो तर काहींना परदेशात जाऊन तिथली संस्कृती, राहणीमान आणि खाद्यपदार्थ यांचा आस्वाद घ्यायला आवडत असतं.
‘दिल चाहता है’ सिनेमाने तरूणांमध्ये बॅचलर पार्टीची क्रेज निर्माण झाली आणि सगळेच देशात तसेच विदेशात बॅचलर पार्टी प्लॅन करू लागले. सध्याच्या जमान्यात तर बॅचलर पार्टी म्हंटलं की कित्येकांच्या डोळ्यासमोर एकच ठिकाण येतं ते म्हणजे बँकॉक, थायलंड!
तुम्हीसुद्धा तुमची बॅचलर ट्रीप बँकॉकला प्लान करत असाल तर थोडं थांबा..आधी हे पूर्ण वाचा आणि मग बॅग भरायला घ्या !
तुम्ही बँकॉक, थायलंडच्या ट्रीपला निघाल्यावर काय करा? कुठे जा? कसं जा? या गोष्टी सांगणारे अनेक लोकं तुम्हाला आतापर्यंत भेटली असतील मात्र या ट्रीपदरम्यान कोणत्या गोष्टी तुम्हाला कटाक्षाने टाळायच्या आहेत..? चला पाहुयात !
१. राष्ट्रगीताच्या वेळी आहात तिथे उभं राहायला विसरू नका :
थायलंडमध्ये तुम्ही प्रवास करत असताना किंवा तिथल्या अनेक पर्यटनस्थळांचा आनंद तुम्ही जोरदार एन्जॉय करत घेणार असाल मात्र हे करत असताना त्या देशातील राष्ट्रीय मूल्यांचा आपल्याकडून अपमान होणार नाही याची काळजी घ्या.
थायलंडमध्ये दिवसातून दोन वेळेस राष्ट्रगीत किंवा राजगीत हे देशातील सर्व ठिकाणी लावले जाते त्यावेळी प्रत्येकाने आहात तिथे उभे राहून त्याला मानवंदना द्यायची असते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
अगदी सार्वजनिक ठिकाणे म्हणजे चित्रपटगृह, गार्डन्स, रेल्वे स्टेशन या सर्व ठिकाणी या नियमाचे पालन केले जाते. सकाळी ८ आणि संध्याकाळी ६ वाजता प्रामुख्याने ही वेळ असते.
त्यामुळे थायलंडमध्ये गेलात की या गोष्टींची आवर्जून काळजी घ्या जेणेकरून त्या देशाच्या मूल्यांचादेखील अपमान होणार नाही आणि आपली ट्रिपसुद्धा मस्त होईल !
२. थायलंडमध्ये टॅक्सी करणार?आधी हे वाचा :
मंडळी, थायलंडमध्ये वैयक्तिक वाहन नसेल तर सार्वजनिक वाहनांनी प्रवास करणं जरा खर्चिक आहे. तुम्हाला जर आधीपासून सर्व टॅक्सीचे दर माहीत असतील तर ठीक पण नसेल तर तुम्ही फसण्याची शक्यता आहे.
स्थानिक टॅक्सी ड्रायव्हर नवीन लोक दिसली की अवाजवी दर आकारण्यात पटाईत आहेत. त्यामुळे तुम्हाला दर योग्य वाटत नाही तोपर्यंत चालत राहा किंवा Uber,Grab Taxi सारख्या वाहनसेवेचा आनंद घ्या जिथे तुम्हाला आधीच भाड्याचा अंदाज आलेला असेल .
३. पाणी वापरताना ‘हा’ विचार अजिबात करू नका :
बँकॉकमध्ये पाणी शुद्ध आहे का? किंवा हे दात घासण्यासाठी वापरता येईल का? असे प्रश्न चुकूनसुद्धा कोणाला विचारू नका!
कारण त्या देशात सर्व पाणी हे वॉटर प्युरीफिकेशनच्या विशिष्ट कारखान्यातून शुद्ध होऊनच नागरिकांपर्यंत येतं. त्यामुळे तेथील कोणत्याही सार्वजनिक स्रोतांवर येणारे पाणी तुम्ही तुमच्या दैनंदिन वापरला अगदी बेशक वापरू शकतात !
४. चुकूनसुद्धा..स्थानिक लोकांच्या डोक्याला स्पर्श होऊ देऊ नका :
—
- भारतातील या सुंदर ७ जागा, फॉरेन लोकेशन्सला देखील देतात टक्कर!
- Foreign trip वरचे पैसे वाचवा – भारतातील ह्या डेस्टिनेशन्स ला जा – भाग २
—
मंडळी,थायलंडला ट्रीपला तर जाताय पण ही एक महत्वाची टीप लक्षात घ्या. चुकूनसुद्धा..स्थानिक लोकांच्या डोक्याला स्पर्श होऊ देऊ नका! हो कारण..थाई बौद्ध परंपरेनुसार, डोके हा आपल्या शरीराचा सर्वोच्च भाग आहे आणि स्वर्गाच्या सर्वात जवळचे स्थान आहे.
एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या डोक्याला स्पर्श करणे, अगदी सहजरित्या देखील हे अनेक थाई लोकांसाठी आक्षेपार्ह आहे, म्हणून शक्यतो गमतीमध्ये स्थानिकांना डोक्याला स्पर्श करणे टाळा !
५. मंदिरात जाताना ‘हे’ कपडे टाळा :
थायलंडमध्ये बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म आहे आणि अनेक भव्य मंदिरे बँकॉकच्या जुन्या शहरांमध्ये आहेत. अनेक पर्यटकांना तेथील भव्य प्रार्थनास्थळे, सुंदर मंदिर हे खुणावत असतात. तिथे जावं, तिथली माहिती जाणून घ्यावी. तिथल्या धार्मिक संस्कृतीचा आस्वाद घ्यावा असे वाटत अनेकांना असते.
मात्र त्या धार्मिक जागी जाताना स्लीव्हलेस, हाल्फ पॅन्ट, स्कर्ट अश्या कोणत्याही पध्दतीचे कपडे घालणे टाळा. तिथे भेट देताना शक्यतो पारंपरिक कपड्यांना पसंती द्या कारण पूर्ण अंग न झाकणारी कपडे न घालणे हे तेथील धार्मिक आचारणाच्या विरोधात जाणारे आहे.
त्यामुळे शक्यतो पारंपरिक पोशाखासह तेथील धार्मिक स्थळांचा आनंद घ्या !
६. तुमचा पासपोर्ट सोबत ठेवू नका :
पासपोर्ट सोबत ठेवू नका? आता तुम्ही म्हणत असाल की हे काय नवीन? बाहेरच्या देशात जायचं म्हणजे पासपोर्ट लागेलंच की, पण ही एक व्यावहारिक टीप आहे असं समजा जी तुम्हाला पोलीस स्टेशन,दूतावास आणि लवकरात लवकर परत जाण्यास वाचवू शकते.
आणि आणखी एक गोष्ट म्हणजे मंडळी, थायलंडमध्ये फिरताना पासपोर्ट सोबत ठेवू नका. तिथे फिरताना,मजा-मस्ती करताना पासपोर्ट हरवण्याची शक्यता असते त्यामुळे सोबत पासपोर्टची झेरॉक्स कॉपी आणि मोबाईलमध्ये फोटो असला तरी बेस्ट!
७. त्या देशातील पैश्यांवर कधी पाय पडू देऊ नका :
बऱ्याच वेळा मजा, मस्ती किंवा आपल्या एन्जॉयमेंटच्या मूडमध्ये स्थानिक चलनातील पैसे खाली पडण्याची किंवा वाऱ्यासोबत उडण्याची शक्यता असते. त्यावेळी आदराने ते पैसे उचलून पुन्हा व्यवस्थित ठेवा त्यावर पाय पडणार नाही किंवा ते फाटणार नाही याची काळजी घ्या.
थायलंडमध्ये त्यांच्या चलनावर तेथील राजाची प्रतिमा आहे, तुमच्याकडून जर त्या नोटेवर पाय पडला तर देशाच्या राजाला पायाचा स्पर्श झाला म्हणून राष्ट्रीय अपमान गृहीत धरला जातो.
ज्याप्रमाणे मानवी शरीररचनेत डोके हे मानवी शरीराचा सर्वोच्च भाग मानले जाते त्याचप्रमाणे पाय सर्वात खालचा म्हणून तुलनेने अपवित्र मानलं जातं. थोडक्यात काय मजा-मस्ती करताना स्थानिक लोकांच्या व देशाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत ना याची काळजी घ्या!
८. स्त्रियांनी तर बौद्ध भिक्षूंपासून लांबच राहा :
थायलंड किंवा बँकॉक या देशातील अनेक भागात सूंदर मंदिरे आणि विविध बौद्ध प्रार्थनास्थळे आहेत. शक्यतो अनेक ठिकाणच्या प्रार्थनास्थळांमध्ये बौद्ध साधू, संन्यासी किंवा भिक्षू असतात ते कठोर आणि कडक शिस्तीचे असतात. त्यांचे काही धार्मिक व आचरणाचे नियम असतात म्हणून त्यांच्या पासून विशिष्ट अंतर ठेवूनच राहा.
ते प्रार्थना किंवा ध्यानस्थ बसले असतील तर त्यांच्या शेजारी वगैरे बसू नका. त्या भिक्षूंच्या आचरण नियमात महिलांना स्पर्श न करण्याचादेखील समावेश आहे तर याचीदेखील खबरदारी घेणे गरजेचे आहे.
९. थाई मनोरंजन अनुभवणार असाल तर.. सावधान :
थायलंडमध्ये मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम किंवा इव्हेंट्स आयोजित केले जातात. मात्र तुम्ही बँकॉक, फुकेत आणि पट्टायाच्या काही भागांत गेलात तर ‘पिंग पॉंग शो’ या कन्सेप्टचा एक सेक्स शो आहे त्या ठिकाणी जाणे टाळा.
कारण त्या शोमध्ये एकदा तुम्ही आत गेलात तर एक विशिष्ट पैशाची रक्कम भरल्याशिवाय तुम्हाला बाहेर पडता येत नाही. तेथील काही बारच्या पेयांची किंमत इतकी महाग आहे की तुमचा खिसा अगदी स्वच्छ होऊ शकतो.
१०. थेट दारूची बाटलीच विकत घ्या :
ही माहिती खास ड्रिंक्स लव्हर्ससाठी…नाईट क्लबमध्ये एन्जॉय करताना शक्यतो वैयक्तिक पेयं घेणे टाळा. कारण तिथल्या बारमध्ये किंवा क्लबमध्ये वैयक्तिक असे सिंगल दारूचे ग्लास महागात जातात अश्या वेळी ग्रुपमध्ये एक संपूर्ण बाटली खरेदी केल्यास परवडते.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.