स्वतःची विष्ठा दान करून ‘ही’ तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
दान करण्याचं महत्त्व आपल्याला फार पूर्वीपासून सांगितलं गेलंय. पैसे, उपयोगाच्या ठरतील अशा वस्तू, कपडे इथपासून ते आपल्या शरीराच्या अवयवांपर्यंत अनेक प्रकारचं दान आपण करू शकतो. शरीराच्या प्रत्येक अवयवाचं दान करता येणं आपल्याला शक्य आहे. अर्थात, त्यासाठी सुदृढ असायला हवं.
खाल्लेलं अन्न पचल्यावर शरीराला अनावश्यक ठरणारं टाकाऊ मलमूत्र, विष्ठा आपण रोज शरीराबाहेर टाकतो. प्राण्यांच्या शेणाचे आणि मूत्राचे बरेच उपयोग आपल्याला माहीत आहेत. गावाकडे शेण सारवण्यापासून ते शेणाच्या गोवऱ्या थापण्यापर्यंत अनेक प्रकारे गाईगुरांच्या शेणाचा उपयोग करता येतो.
मानवी मूत्राचा वैद्यकीय उपयोग होतो हे आपण ऐकून असू. पण माणसांची विष्ठाही उपयुक्त ठरू शकते हा विचारही आजवर आपल्या मनाला शिवला नसेल.
आपल्या शरीरातला नकोसा घटक म्हणून आपण विष्ठा बाहेर टाकत असलो तरी आपल्याच शरीराचे काही आजार बरे करायला ही विष्ठा वापरता येऊ शकते आणि ती दानही करता येऊ शकते असा एक भलत्याच प्रकारचा अभ्यास समोर आलाय.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
ब्रिटनच्या एका विद्यापीठात स्टुडंट सपोर्ट ऍडमिनिस्ट्रेस्टर असणारी ३१ वर्षीय क्लॉडिया कॅम्पनेला ही व्यक्ती आपल्या विष्ठेचं दान करून कित्येकांचं भलं करतेय. तुमच्या मनात या सगळ्याविषयी सहाजिकच कुतूहल निर्माण झालं असेल.
क्लॉडिया हे दान कशा प्रकारे करते? नेमके कुठल्या प्रकारचे आजार बरे करण्यासाठी मानवी विष्ठेचा उपयोग होऊ शकतो? आणि आपली विष्ठा जर कुणाला दान करायची असेल तर त्यासाठीचे निकष काय आहेत? या सगळ्याचा थोडक्यात वेध घेऊ.
क्लॉडिया ही तरुणी फावल्या वेळात हे विष्ठादानाचं काम करते. आता क्लॉडिया हे दान नेमकं कसं करते हे सांगताना तिने म्हटलंय, “मला रुग्नालयाकडून एक डबा मिळतो. मी त्यात विष्ठा एकत्र करते. मग मी जेव्हा कामावर जाते तेव्हा रुग्णालयात तो देऊन जाते. तुम्हाला त्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत.”
ती म्हणते, “माझ्या काही मित्रमैत्रिणींना असं वाटतं की हे थोडं विचित्र आहे. मला त्याची काळजी वाटत नाही. हे दान करणं अतिशय सोपं आहे. मी फक्त एका संशोधनात मदत करत आहे. मला काही योगदान दिल्याचा आनंद आहे.”
क्लॉडियाने कुठेतरी वाचलं होतं की व्हीगन लोकांच्या विष्ठेत चांगले जिवाणू असतात. मात्र व्हीगन लोकांची विष्ठा चांगली समजली जाते असा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. चांगल्या दर्जाची विष्ठा कशी तयार होते यावर संशोधन अजूनही सुरू आहे.
‘सुपर पु’ ची संकल्पना :
मानवी आतड्यात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे जीवाणू असतात. हे दोन्ही सूक्ष्म जीव एकमेकांपासून वेगळे असतात. वैद्यकीय क्षेत्रात मानवाची उपयुक्त विष्ठा संसर्ग किंवा आजार झालेल्या दुसऱ्याच्या व्यक्तीच्या आतड्यात टाकण्याचं अनोखं तंत्रज्ञान आहे.
हा वैद्यकीय उपचार जरी आधुनिक वाटला तरी अगदी चौथ्या दशकात चिनी डॉक्टरांनी विष्ठेचं प्रत्यारोपण केल्याचं दस्तऐवजीकरण झालं आहे. उत्तम विष्ठादाता म्हणजे काय याची व्याख्याही पूर्णतः स्पष्ट झालेली नाही.
उत्तम विष्ठादात्याच्या सूक्ष्मजीवांमध्ये जीवाणूंचं वैविध्य बऱ्यापैकी असतं आणि आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या आणखीनही महत्त्वाच्या प्रजाती असतात असं समजलं जातं.
इंग्लंडच्या एका रुग्णालयात पोटाच्या विकाराच्या तज्ञ असलेल्या जॉन लँडी विष्ठा प्रत्यारोपणाच्या कामात मदत करतात. त्या म्हणतात, “विष्ठा देणारा सुदृढ रहावा असा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मात्र आम्ही त्यांच्या शरीरात असलेल्या सगळ्याच जीवाणूंचा अभ्यास करत नाही. मला असं वाटतं की अशा पद्धतीचीही चाचणी व्हायला हवी.”
—
- विमानातील विष्ठेची विल्हेवाट कशी लावतात? प्रत्येकाला पडलेल्या प्रश्नाचं नेमकं उत्तर…
- “या” कैद्यांना पत्नी फक्त एकदाच भेटतात आणि ‘संबंध’ न ठेवताही मातृत्व घेऊन जातात…
—
‘सुपर पू डोनर’ म्हणजेच ‘उत्तम विष्ठा दाता’ होण्याचे निकष :
कुणीही आपली विष्ठा दान करू शकतं का? तर नाही. विष्ठा दान करून पैसे कमावता येतात हे संशोधनातून समोर आलेलं आहे. मात्र, “विष्ठा द्यायची आणि पैसे कमवायचे इतकं सोपं ते नाही.”, असं डॉक्टर वार्डील यांनी म्हटलंय.
मेलबर्नच्या ऑस्टिन हेल्थ मधील गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट असलेल्या ख्रिस लेऊंग यांनी आपल्या विष्ठेचं दान करायचं असेल तर त्यासाठी कुठले निकष पाळणं गरजेचं आहे हे सांगितलं आहे.
ते म्हणतात, “दाता हा १८ ते ५५ या वयोगटातील असायला हवा, त्याची तब्येत चांगली असायला हवी, जठर आणि आतड्यासंबंधीचा आजार त्याला असता काम नये, दान करण्याआधी सहा महिने त्याने कुठल्याही प्रकारचे अँटिबायोटिक्स घेता कामा नयेत आणि त्याची विष्ठा घट्ट असायला हवी.” हे सगळं असेल तर त्याच्या रक्ताची आणि विष्ठेची चाचणी घेतली जाते.
डॉ. लेऊंग म्हणाले, “हिपॅटिटिस ए, बी आणि सी चा संसर्ग झालाय का हे पहायला, ग्रंथींमुळे ताप आलाय का आहे पहायला, सायटोमेगॅलोव्हायरस, सिफिलिस, एड्स आहे का हे पहायला आम्ही रक्ताची तपासणी करतो.”
‘फ्रंटियर्स इन सेल्युलर अँड इन्फेक्शन मायक्रोबायोलॉजी’ या जर्नलमध्ये डॉ. ओ’सुलीवन यांच्या संशोधनानुसार प्रत्येक व्यक्तीच्या विष्ठेत विशिष्ट प्रकारचे जीवाणू असणं फायद्याचं ठरू शकतं. हे केल्यामुळे ज्यांच्या शरीरात विष्ठेचं प्रत्यारोपण होतं त्यांच्याही शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू असू शकतात.
मात्र त्यासाठी दाता आणि ज्याच्या शरीरात प्रत्यारोपण होतं त्यांची शरीरं एकमेकांना अनुरूप हवीत. हे केवळ विष्ठेत जे जीवाणू असतात त्यावर अवलंबून असतं. डायरियाच्या बऱ्याच केसेसमध्ये गाळलेल्या विष्ठेचं प्रत्यारोपण केलं आहे. या विष्ठेतले काही जीवाणू निघून गेले असले तरी डीएनए, विषाणू आणि इतर गोष्टी त्यामध्ये होत्या.
विष्ठा दान करणाऱ्या क्लॉडिया या तरुणीला लोकांनी आपली विष्ठा दानाबाबतची विचारसरणी बदलावी आणि विष्ठा दाता बनण्याचा विचार करावा असं वाटतं. हे फार सोपं आणि सरळ आहे. तुम्हीही विष्ठा दानाचा विचार करत असाल तर जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधा असं ती सांगते.
भारतात विष्ठा दानाचं काय चित्र आहे याची आपल्याला कल्पना नाही. मात्र, आपल्या विष्ठेचा अभ्यास करावा, मानवी रोग बरे करायला त्याचा काही उपयोग होऊ शकतो का याचा शोध घ्यावा हा विचार एखाद्याला सुचणं हेच सामान्यांच्या कल्पनेपलीकडलं आहे.
एखादा अजब विचार मनात आला म्हणून लगेचच तो मुर्खात न काढता त्यातून काय घडू शकतं याच्या शक्यता तपासून बघून अखेरीस तो विचार कसा उपयुक्त आहे हे सिद्ध करून दाखवणाऱ्यांची चिकाटी आणि आत्मविश्वास कुठल्याही प्रयोगशील वृत्तीच्या व्यक्तीने शिकण्यासारखा आहे.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.