Site icon InMarathi

त्यांनी अंतराळात पाठवले कबाब, त्याचं पुढे काय झालं ते एकदा बघाच…

kabab im3

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मंडळी..अंतराळ, ग्रह-तारे याबद्दल आपल्याला कायमच अप्रूप असतं. त्याविषयी अभ्यास करण्यासाठी तर विशिष्ट अभ्यासक्रम आणि विज्ञानाची आवश्यकता असते .
एवढंच काय मंडळी..आपण म्हणतो की मनुष्य अंतराळात पोहोचला इतकी त्याची प्रगती झाली पण तुम्हाला जर विचारलं की मनुष्याने आता कबाब अंतराळात पाठवला आहे तर? आता ही प्रगती म्हणावी की अतरंगीपणा हे आपल्याला वाचूनचं ठरवावे लागेल!

 

 

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओज ज्या वेगात व्हायरल होत असतात अगदी त्याचप्रमाणे हा व्हिडीओसुद्धा व्हायरल होत होता.

तुर्कीमधील एका रेस्टॉरंटने हा कबाब अंतराळात पाठवण्याचा पराक्रम करायचे ठरवले खरे आणि तयारी देखील सुरू केली. एक कबाब हेलियम फुग्याला जोडून अवकाशात पाठवायचे ठरवले. आजवर कुत्रा मग मनुष्य आणि आता कबाब अंतराळात पाठवण्याचा निर्णय यांनी घेतला खरा पण पुढे काय झाले हे पाहा..

कबाब अंतराळात गेले का?

 

 

मंडळी…पाइप कबाबसाठी प्रसिद्ध असलेल्या तुर्कीच्या अदाना प्रांतात हा प्रयोग झाला.

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोकांचा एक गट कबाबला एका मोठ्या हेलियम बलूनला बांधून आकाशात सोडताना दिसतोय. वृत्तानुसार, कबाबच्या अंतराळ उड्डाणासाठी कॅमेरा आणि ट्रॅकिंग यंत्रासह खास तयार केलेला बॉक्स तयार करण्यात आला होता.

या बॉक्समध्ये डिश ठेवली गेली होती, ज्यामुळे ते तीव्र तापमानापासून देखील संरक्षित होते. त्याच डिशमध्ये एक छोटा कॅमेरासुद्धा बसवण्यात आला होता जेणेकरून संपूर्ण प्रवासाचा व्हिडीओ आणि वर गेल्यावर दिसणारा सुंदर नजारा लोकांना बघायला मिळेल.

तो कबाबचा सेटअप जमिनीपासून दिमाखात उडाला खरा, पण जमिनीपासून केवळ ३८ किलोमीटर उंचीवर पोहोचला आणि तुर्कीच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर पडला.

१२ एप्रिललाच हा प्रयोग का?

शेफ यासार आणि अंतराळ अभियांत्रिकी विद्यार्थी इद्रिस अल्बायराक यांनी मंगळवारी १२ एप्रिल रोजी हा प्रयोग केला. हा दिवस निवडण्यामागचे कारण म्हणजे या दिवशी पहिल्या मानवी अंतराळ उड्डाणाचा ६१वा वर्धापन दिन असतो.

एवढेच नाही तर त्या दिवशी आलेला मंगळवार देखील मानवी अंतराळ उड्डाणाच्याच दिवशीचा वार होता. याच दिवशी सोव्हिएत अंतराळवीर युरी गागारिन १९६१ रोजी पृथ्वीची एक कक्षा पूर्ण करणारी पहिली व्यक्ती बनले.

 

 

एलियन्सला जास्त मिरपूड असलेले कबाब नाही आवडले म्हणून…

खरंतर त्या अंतराळ उड्डाण दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त हा प्रयोग करण्यात आला होता. हा प्रयोग अयशस्वी झाला असला तरी या मेहनतीला दाद देणाऱ्या कमेंट्स या व्हिडिखाली सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

तुझा हा प्रयोग कसा काय फसला असं विचारल्यावर त्या शेफने विनोदाने उत्तर दिले की.. “ते कबाब एलियन्सने ते परत पाठवले कारण त्यात मिरपूड जास्त होती”

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version