UPA सरकार सत्तास्थानी असताना झालेल्या ११ भीषण दंगली…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
दंगली आणि जातीय हिंसाचार या अशा भयंकर घटना आहेत ज्यांची आपल्याला लाज वाटली पाहिजे. दंगली या नेहमीच वाईट असतात. मात्र दुर्दैवानं असं म्हणावं लागतंय की भारताला या भीषण जातीय आणि धर्मीय दंगलींना खूप मोठी ‘परंपरा’ आहे. विशिष्ट धर्मावर किंवा विशिष्ट गटावर किंवा विशिष्ट सरकारवर या दंगली पेटवल्याचा किंवा या दंगलींना पाठिंबा दिल्याचा आरोप होतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
या आरोपांमध्ये तथ्यही आहेच. बिनबुडाचे आरोप असं याला म्हणताच येणार नाही. मात्र काही मूठभर लोकांच्या फायद्यासाठी हजारो लोकांचं आयुष्य उध्वस्त होतं.
पिढ्या न पिढ्या याची झळ सोसतात. आजवर भारतातल्या अनेक भागांमध्ये दंगली झाल्या. मात्र त्याची झळ किंवा त्याची भीषणता, गंभीरता भारतात इतरत्र बऱ्याच वेळा पोहचत नाही.
ती पोहचवली जात नाही असेही आरोप केले जातात. त्याला कारण म्हणजे राज्यकर्ते. पण कधीकधी एखादी घटना झाली तर त्याचे पडसाद भारतभरात उमटतात.
फाळणीच्या वेळी झालेल्या दंगली याचं उदाहरण म्हणता येतील. मात्र भारतात त्यानंतर अनेक दंगली झाल्या, काही आजही होत आहेत. पण या दंगली कोणत्या होत्या, ते बहुतेक जणांना माहीत नसण्याची शक्यता जास्त आहे.
१. १९६९ ची गुजरात दंगल
गुजरातमध्ये हिंदू आणि मुस्लिमांमध्ये अनेक दंगली झाल्या. मात्र १९६९ ला झालेली दंगल या अनेक दंगलींपैकी पहिली दंगल म्हणता येईल. या दंगलीमध्ये मारल्या गेलेल्या लोकांचा अधिकृत आकडा ६६० आहे. तर अनधिकृत आकडेवारी २०००च्या जवळपास आहे.
याशिवाय आणखी बरेच जण जखमी झाले आणि बरीचशी मालमत्ता नष्ट झाली, लुटली गेली. स्वातंत्र्याच्या वेळी फाळणीच्या दंगलीनंतरची ही भारतातील सर्वात भीषण दंगल होती. या दंगलीमागे राजकीय हेतू कारणीभूत होता, शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आरएसएसवर आणि भारतीय जनसंघावर दंगलीत सहभाग आणि आयोजन केल्याचा आरोप होता.
तेव्हाचे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील गुजरातचे मुख्यमंत्री हितेंद्र देसाई, इंदिरा गांधींच्या काँग्रेसला (आय) पाठिंबा देत नव्हते. त्यांचा पाठिंबा मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला (ओ) होता. मात्र काँग्रेसला आरएसएसला नाराज करायचं नव्हतं त्यामुळे पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप करण्यात आला. याबरोबरच दंगली होण्याचं कारण म्हणजे काँग्रेसने हिंदू धर्म नष्ट करण्यासाठी धर्मनिरपेक्षता स्वीकारली असा आरोप आरएसएसने केला.
२. १९८४ शीख विरोधी दंगली
काँग्रेसने ऑपरेशन ब्लू स्टार राबवल्यामुळे इंदिरा गांधींची हत्या त्यांच्याच दोन शीख अंगरक्षकांनी केली. त्यामुळे १९८४ च्या शीखविरोधी दंगली झाल्या. या दंगली अतिशय भीषण होत्या आणि त्यामुळे अंदाजे ८००० लोक मरण पावले.
२०११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या विकिलिक्सच्या दस्तऐवजात असे म्हटले होते, की या दंगलींमध्ये भारत सरकार आणि काँग्रेस पक्षाचा काय सहभाग होता हे अमेरिकेला माहीत होते. इंदिरा गांधींच्या हत्येचा बदला म्हणून या दंगलींना सरकारने पाठिंबा दिला होता आणि या दंगली हत्याकांड किंवा सामूहिक नरसंहारासारख्याच भयानक होत्या.
३. १९८९ भागलपूर दंगल
बिहारमधल्या भागलपूर जिल्ह्यात ऑक्टोबर १९८९ ची भागलपूर दंगल झाली होती. १००० लोक मारले गेले आणि ५०,००० हून अधिक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. जातीय हिंसाचार आणि मृतांच्या संख्येच्या बाबतीत ही दंगल १९६९ च्या गुजरात दंगलीपेक्षाही भयंकर होती. पोलिसांची भूमिका आणि एसपी केएस द्विवेदी यांच्या भूमिकांमुळे, ही दंगलही राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं दिसून येतं.
सीएम सत्येंद्र नारायण सिन्हा, दंगलीनंतर पायउतार झाले आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दंगल भडकवल्याचा आरोप केला. यानंतर केएस द्विवेदी यांची बदली थांबवण्याच्या राजीव गांधींच्या निर्णयावरही टीका केली.
४. काश्मीर दंगल, १९९० ते आजपर्यंत
जम्मू आणि काश्मीर हे भारतातील एकमेव राज्य आहे, ज्याचा स्वतःचा ध्वज आहे. १९९० पासून भारताच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील परिस्थिती जास्त बिघडली आहे. याची सुरुवात काश्मिरी पंडितांविरुद्धच्या दंगलीपासून झाली. तेव्हापासून भारतीय सशस्त्र दलांवर माहिती मिळवण्यासाठी आणि नियंत्रण राखण्यासाठी छळ आणि अमानवी पद्धतींचा वापर केल्याचा आरोप आहे.
तेव्हापासून अनेकवेळा काश्मीरमध्ये दंगली उसळल्या आहेत. त्यावेळी तरुण आणि निमलष्करी दलांमध्ये चकमक झाली आहे. दंगलींच्या या कालावधीतील बहुतांश काळ केंद्रात आणि राज्य पातळीवर नॅशनल कॉन्फरन्ससोबत युती करून काँग्रेस सत्तेत असल्याचं दिसतं. या ठिकाणी कोणत्याही मानवाधिकार उल्लंघनाचं प्रकरण झालं नाही, असं सरकारचं म्हणणं आहे. तर सरकारकडूनच हिंसाचाराला प्रोत्साहन दिलं जातं असा दावा स्वतंत्र निरीक्षकांनी केला आहे.
५. मुंबईतील दंगली १९९२-९३
अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यामुळे मुंबई दंगल सुरू झाली. बाबरी मशीद पाडल्यानंतर काही हिंदूंनी हे प्रकरण साजरं केलं. त्याचा बदल घ्यायचा म्हणून मुस्लिमांनी त्यांच्यावर आक्रमण केलं. हा या दंगलीचा पहिला टप्पा म्हणता येईल. मात्र याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या टप्प्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील हिंदूंनी मुस्लिमांवर घेतलेला सूड होता.
या दंगलींमुळे १९९३ चे मुंबई बॉम्बस्फोट झाले. केंद्रात काँग्रेसची सत्ता होती मात्र या दंगलींचा त्यांच्याशी डायरेक्ट संबंध नाही. बाबरी मशीद पाडल्याचा आरोप आरएसएस आणि भाजपच्या नेत्यांवर झाला होता.
६. २००६ अलिगढ दंगल
रामनवमी साजरी करण्यावरून ५ एप्रिल रोजी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दंगल उसळली. या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला होता.
–
- ‘वाढती मुस्लिम लोकसंख्या आणि हिंदू वास्तव’
- ३२,००० मुलींची तस्करी आणि धर्मपरिवर्तनाचं भयावह वास्तव ‘केरळ स्टोरी’मधून येणार समोर!
–
७. २००८ धुळे दंगल
ऑक्टोबर २००८ मध्ये हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये चकमक होऊन ४ लोक मारले गेले. या घटनेत ११३ पोलिसांसह २०० हून अधिक लोक जखमी झाले.
८. २०१० देगंगा दंगल
देगंगा दंगल सोमवारी ६ सप्टेंबर २०१० ला सुरू झाली होती आणि अनेक दिवस चालू होती. कोलकात्यापासून साधारणपणे १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या उत्तर २४ परगणा येथील बसीरहाट उपविभागात हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये झालेल्या संघर्षात २४ जण जखमी झाले. शिवाय अनेक घरं आणि मालमत्ता उध्वस्त झाल्या.
९. २०११ भरतपूर दंगल
१४ सप्टेंबर २०११ला राजस्थानमध्ये भरतपूर येथे गुज्जर आणि मेओ मुस्लिमांमध्ये संघर्ष झाला. त्यात आठ जण ठार झाले, तर २३ जण जखमी झाले. या दंगलीत भाजप आणि काँग्रेसचे प्रमुख नेते सहभागी होते, असं म्हटलं जातं.
१०. २०१२ आसाम दंगल
२० जुलै ला कोक्राझारमध्ये दंगल उसळली, जी नंतर आसामच्या खालच्या भागात पसरली. या दंगलीमध्ये ७७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अंदाजे ५०० गावांमधल्या साधारणपणे ७९,००० लोकांना १२८ मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला. बोडो समुदाय आणि बंगाली भाषिक मुस्लिम यांच्यात या दंगली झाल्या. दंगलींची मुळं नव्वदच्या दशकाच्या मध्यात आहेत आणि आजही दंगली होत राहिल्याने या प्रदेशात शांतता कायम आहे.
११. २०१३ मुझफ्फरनगर दंगल
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये, उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात दंगली उसळल्या. यामध्ये जवळ जवळ ६२ लोकांचा मृत्यू झाला. या मृत्यू झालेल्यांपैकी ४२ मुस्लिम तर २० हिंदू होते. हिंदू जाट आणि मुस्लिम यांच्यातील दंगल लैंगिक छळाच्या घटनेमुळं झाली असं म्हटलं जात होतं. परंतु प्रत्यक्षात हिंदू उजव्या गटांनी केलेल्या तीव्र जातीय मोहिमेचा परिणाम होता.
१९६७ पासून, जातीय हिंसाचाराच्या १५ मोठ्या घटना घडल्या. त्यापैकी १० घटना काँग्रेस किंवा काँग्रेसच्या सहयोगी शासित प्रदेशांतर्गत घडल्या. काँग्रेस पक्षाची धार्मिक कट्टरतावादी गटांशी कोणतीही राजकीय युती नसली, तरी देशात शांतता राखण्यात काँग्रेस सातत्याने अपयशी ठरल्याचं दिसून येतं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.