Site icon InMarathi

RSS चं हॉस्पिटल फक्त हिंदूंसाठीच का? जेव्हा रतन टाटांनी गडकरींना केला होता सवाल

tata im 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ हे तीन शब्द माहीत नसणारा व्यक्ती भारतात क्वचित सापडेल. १९२५ मध्ये स्थापना झाल्यानंतर संघाचे सुरूवातीचे ध्येय फक्त एकच होते आणि ते म्हणजे हिंदूंचे संघटन करणे. परंतु हळूहळू संघाने अनेक आयामांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. जसे की मजूरांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, कुटुंब प्रबोधन, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि वैद्यकीय विभाग.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आज जवळपास देशामधील सर्व प्रमुख शहरांमध्ये आणि काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये संघाने आपली स्वतःचे दवाखाने सुरु केले आहेत आणि या सर्व दवाखान्यांना संघाचे आद्यसरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव देण्यात आले आहे. सध्या अशाच एका रुग्णालयाच्या उद्घाटनाच्या वेळेचे एक प्रसंग चर्चेचा विषय बनला आहे.

 

 

काही दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील सिंहगड परिसरात एका धर्मादाय रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते कार्यक्रमामध्ये उपस्थित लोकांना संबोधित करत होते, त्यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत घडलेली एक किस्सा उपस्थित लोकांना सांगितला.

जेव्हा ही घटना नितीनजी सोबत घडली होती तेव्हा ते महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये मंत्री होते. त्यावेळी त्यांनी रतन टाटा यांना एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते आणि यांवर आधारित त्यांनी एक मजेशीर गोष्ट सांगितली.

 

 

गडकरी म्हणाले की, तेव्हा मी महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये मंत्री होतो.औरंगाबादमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्यसरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार यांच्या नावाने हॉस्पिटलचे उद्घाटन होत होते. तेव्हा संघाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने हॉस्पिटलचे उद्घाटन रतन टाटा यांच्या हस्ते व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली आणि यासाठी त्यांनी मला मदत करण्यास सांगितले.

पुढे गडकरी म्हणाले की, त्यानंतर त्यांनी रतन टाटा यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यासाठी राजी केले, त्यावेळी गडकरींनी देशातील गरिबांना टाटा कॅन्सर हॉस्पिटलद्वारे कॅन्सर उपचार अगदी स्वस्त दरामध्ये दिल्या जाणाऱ्या सेवेची प्रशंसा केली होती.

रुग्णालयात पोहोचल्यावर रतन टाटा यांनी गडकरी यांना प्रश्न विचारले की हे रुग्णालय फक्त हिंदू समाजातील लोकांसाठी असेल का? तेव्हा मी त्यांना विचारले की तुम्हाला असे का वाटते? त्यांनी लगेच उत्तर दिले की, कारण हा दवाखाना आरएसएस चा आहे.

 

 

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी त्यांना उत्तर दिले की, हा रुग्णालय फक्त हिंदूंसाठीच नाही तर सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी उघडे राहणार आहे, तसेच आरएसएस धर्माच्या आणि जातीच्या आधारावर कधीही भेदभाव करत नाही. गडकरी म्हणाले की, त्यानंतर त्यांनी टाटा यांना संघाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे रतन टाटा यांना संघाबद्दल जाणून घेण्याचे आकर्षण निर्माण झाले.

तसेच कोरोना संकटाच्या काळात जेव्हा आपले नातेवाईक आपली साथ सोडत होते, तेव्हा आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक पीडितांच्या सेवेसाठी स्वयंसेवक पुढे आले होते. त्याकाळात संकटाने वेढलेल्या लोकांची मदत करण्यासाठी स्वयंसेवकांनी रात्रंदिवस काम केले होते.

 

 

 

संघाने आपल्या एका परिपत्रक मध्ये सांगितले आहे की, एकूण ९२,००० ठिकाणी सेवाकार्य केले गेले. ज्यात ७३ लाख राशन किट, ४ कोटी पेक्षा जास्त जेवणाच्या किट, ९० लाख पेक्षा जास्त मास्क, ६० हजार पेक्षा जास्त रक्तदान आणि एकूण १ लाख पेक्षा जास्त केंद्रांवर औषधीचे वाटप करण्यात आले.

यावरून आपल्याला दिसून येईल सामाजिक क्षेत्रात ही संघाने खुप मोलाची कामगिरी केली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version