' चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला: ऍक्टिव्हा ७० हजारांची आणि नंबर १५ लाखांचा – InMarathi

चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला: ऍक्टिव्हा ७० हजारांची आणि नंबर १५ लाखांचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हौसेला मोल नाही असं आपण म्हणतो. आपली हौस भागवायला अनेक जण अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींचा त्याग करतात. अशा वेळी तो त्यागही वाटत नाही कारण, हौस पूर्ण करता येण्याचा आनंद त्याहीपेक्षा मोठा असतो. दागिने, कपडेलत्ते यांच्यापासून गाडी, घड्याळांपर्यंत अनेक प्रकारच्या हौशी आपल्याला असतात.

आपल्याला अगदी मनापासून हवी असलेली अशी एखादी किंमती, मौल्यवान वस्तू मिळवून आपल्याला ती चारचौघात मिरवायची असते. आपल्या मनात त्या गोष्टीचं महत्त्व इतकं असतं की त्यासाठी आपण कधी पैशांच्या स्वरूपात तर कधी आणखीन कशाच्या स्वरूपात त्याची किंमत मोजायला तयार असतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आवश्यक ती पुंजी जमा होईपर्यंत आपण संयम बाळगतो. पण हौसेच्या नावाखाली काही माणसं कधीकधी कहरच करतात. त्यांना त्यांची ती हौस आनंद देणारी असली तरी त्या सगळ्याकडे एक तिऱ्हाईत म्हणून पाहणाऱ्या आपल्याला त्या माणसाची गंमत वाटते.

असाच एक प्रकार एका माणसाने केलाय. हौसेपोटी किंवा ‘स्टेट्स सिम्बॉल’ म्हणून त्याने चक्क आपल्या स्कुटरपेक्षा कैक पटींनी महागडी नंबर प्लेट खरेदी केलीये.

 

number plate IM

 

‘चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. ही व्यक्ती या म्हणीला अक्षरश: जागलीये.

वाहन ही आपली खरी गरज असते. त्यावरची शोभेची नंबर प्लेट ही केवळ शो ऑफ करण्यासाठी असते. पण चंदिगढच्या ब्रिज मोहन या व्यक्तीने आपल्या ७१ हजारांच्या ऍक्टिव्हा स्कुटरसाठी ‘CH01- CJ-0001’ ची फॅन्सी नंबर प्लेट चक्क १५.४४ लाखांना विकत घेतलीये.

0001 number IM

 

चंदिगढमध्ये मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राज्यासाठी अतिरिक्त महसूल गोळा करायला सरकार ‘0001’ नंबरच्या प्लेट्स सर्वसामान्य माणसांकरता लिलावासाठी ठेवणार आहे अशी घोषणा केली.

‘चंदिगढ नोंदणी आणि परवाना प्राधिकरणा’ने ३७८ नोंदणी क्रमांक लिलावासाठी ठेवले आणि १.५ कोटींचा अतिरिक्त महसूल मिळवला. या नंबर्सचं वाटप इ-लिलावाद्वारे केलं जातं.

‘ 0001’ नंबर प्लेट्सना सर्वाधिक पसंती मिळते आणि प्रचंड मोठ्या किंमतींवर त्यांचा लिलाव होतो. गेल्या लिलावात CH01CH ने २४.४० लाख रुपये आणले होते. २०१२ साली एका व्यक्तीने २६.०५ लाखांच्या बोलीवर CH01 AP series घेतली होती.

‘CH01- CJ-0001’ ही नंबर प्लेट ५ लाखांच्या मूळ किंमतीवर लिलावात ठेवली होती जी मोहन यांनी अखेरीस १५.४४ लाखांना विकत घेतली. मात्र त्यांच्याकडे सध्या असलेली ऍक्टिव्हा स्कुटर ही केवळ ७१ हजारांची आहे. मोहन यांनी सांगितलं की ते यंदाच्या दिवाळीत नवं वाहन घेणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी ही नंबर प्लेट राखून ठेवली आहे.

 

brij mohan IM

 

त्यांनी सांगितलंय की तोपर्यंत ती नंबर प्लेट त्यांच्या होंडा ऍक्टिव्हावर दिसेल. श्री. मोहन हे एक जाहिरात संस्था चालवतात. सद्यस्थितीत 0001 नंबर प्लेट वापरणारी १७९ वाहनं आहेत. त्यातली ४ ही मुख्यमंत्री खट्टर यांच्याच मालकीची आहेत. मुख्यमंत्री खट्टर यांनी इतक्यातच हे नंबर्स विकायला काढायचं आणि ५ लाखांच्या बोलीपासून सुरुवात करून इ-लिलावाद्वारे महसूल मिळवण्याचं ठरवलं.

समोर आलेल्या वृत्तानुसार, या नंबर प्लेट्सच्या इ-लिलावातून १८ कोटींचा महसूल मिळवता येऊ शकतो.

१ एप्रिल पासून होंडाने ऍक्टिव्हा रेंजच्या किंमती वाढवल्या आहेत. ऍक्टिव्हा 6G आणि ऍक्टिव्हा 125 या दोन्हींच्या किंमती अनुक्रमे ५०० आणि १००० रुपयांनी वाढल्या आहेत.

 

activa 2 IM

 

त्यांच्या आताच्या किंमती अनुक्रमे ७१,४३२ आणि ७४,८९८ अशा आहेत. किंमतीतल्या या वाढीव्यतिरिक्त कंपनीने आणखी कुठले व्हिजुअल चेंजेस केलेले नाहीत. सुझुकी ऍक्सेस 125 आणि टीव्हीएस ज्युपिटर 125 यांच्यासोबत होंडा ऍक्टिव्हा 125 स्पर्धेत आहेत.

आपल्या हौसेसाठी एखादी व्यक्ती इतकी रक्कम खर्च करायला कशी तयार होऊ शकते असं आपल्यातल्या काहींना वाटू शकेल.

मात्र इथे खरी कमाल हरयाणाचे मुख्यमंत्री असलेल्या खट्टर यांनी केलीये. ग्राहकांच्या पसंतीचा नेमका अंदाज घेत प्रचंड मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त महसूल गोळा करण्यासाठी महागड्या नंबर प्लेट्स विकायला काढायच्या त्यांनी वापरलेल्या युक्तीला मानायला हवं.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?