एका पायावर जग जिंकणाऱ्या भारतीय सैनिकाची प्रेरणादायी कहाणी!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
जीवन ही एक परीक्षा आहे आणि या परीक्षेला सर्वांना सामोरे जावेच लागते. फरक फक्त एवढाच असतो की तुम्ही ती परीक्षा किती धैर्याने देता. जीवनाच्या या परीक्षेत काही लोक आपल्या इच्छा शक्तीने आणि दृढ संकल्पाने असंभव गोष्टीना सुद्धा संभाव करून दाखवतात आणि दुसऱ्यांसाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरतात.
अशाच लोकांपैकी एक आहेत पप्पू सिंह!
पप्पू सिंह यांनी १७ वर्ष भारतीय सैनेमध्ये काम केले. दोन वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केले. पिस्तुल शूटिंग मध्ये सुद्धा राष्ट्रीय विजेता झाले आणि आता पॅरा वॉलीबॉल मध्ये राजस्थान संघाचे कर्णधार बनून पप्पू सिंह अपंग लोकांना प्रेरित करत आहेत.
हा निवृत्ती घेतलेला सैनिक प्रत्येक क्षणाला पूर्ण जोशात आणि आनंदाने जगतो. एवढेच नाही तर पप्पू सिंहची जिद्द पाहून बघून हताश आणि निराश झालेल्या अपंगांनी सुद्धा पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
पप्पू सिंह जयपुरचे राहणारे आहेत. पप्पू सिंह यांनी २००७ रोजी एका रेल्वे अपघातात आपला डावा पाय गमावला होता. पप्पू सिंह आपल्या एका पायाने दोन पायाने धावणाऱ्या खेळाडूंना हरवण्यामध्ये तरबेज आहेत. या माणसासाठी त्याचा एक पाय नसणे कमजोरी नाही तर ताकद आहे.
“द दिव्य खेळ प्रतिष्ठान फेस्टिवल’ मध्ये पप्पू सिंह यांनी राजस्थानच्या पॅरा वॉलीबॉल संघाचे प्रतिनिधित्व करून, तेथे उपस्थित सर्व लोकांचे मन जिंकले. संभाषणाच्या वेळी पप्पूने सांगितले,
मी १९८५ पासून सामने खेळत आहे. अपघात होण्याच्या आधी मी दोनदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅरा वॉलीबॉलचे प्रतिनिधित्व केले आहे. १९८८ मध्ये सैन्यात भरती झालो आणि यानंतर २००२ आणि २००३ मध्ये ४५ देशांच्या प्रतिस्पर्ध्यांसमोर देशाचे प्रतिनिधित्व केले.
पप्पूने पुढे सांगितले की,
पिस्तुल शूटिंग, अॅथलेटीक्स, स्विमिंग, तायक्वांडो, बॅडमिंटन आणि पॉवर लिफ्टिंग यासारखे कित्येक खेळ आहेत ज्यामध्ये भाग घेऊन अपंग स्वतःला सिद्ध करून दाखवू शकतात. फक्त त्यांना स्वत:वर दृढ विश्वास हवा. आपल्या सगळ्यांमध्ये एक कला लपलेली असते, ती फक्त ओळखणे गरजेचे आहे.
खरंच, पप्पू हा त्या लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे जे नेहमी आपल्या आयुष्याला आणि नशिबाला दोष देत असतात. कोणीतरी सत्यच सांगितले आहे की, सक्षम बना यश अपोआपच मिळेल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.