ISIS चा तपास घेऊ बघणाऱ्या सामान्य car सेल्समनलाच झाली अटक
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
जॉन अब्राहमचा New York आठवतोय? कसा जॉन एका नं केलेल्या अतिरेकी कामासाठी जेलमधे डांबल्या जातो?
तसंच काहीसं एका माणसासोबत घडलंय.
Imagine – तुमचा लहानपणचा शाळकरी मित्र मोठा होऊन पत्रकार होतो – अफगाणिस्तानमधे जातो – तिथे मारला जातो.
तुम्हाला धक्काच बसतो…तुम्ही हे कसं झालं ह्याची माहिती काढता तर तुम्हाला ISIS बद्दल कळतं, त्यांच्या ऑनलाईन नेटवर्कबद्दल कळतं…आणि तुम्ही आश्चर्यचकित होता.
आपल्यापैकी बहुतेकांचा प्रवास इथे थांबेल.
पण – एका साध्या सज्जन कार सेल्समनने एक धाडसी पाऊल उचललं आणि दुर्दैवाने ते त्याच्या अंगलट आलं.
टोबी लोपेज ह्या, Toyota कार विकणाऱ्या तरुणाने ट्विटरवर ISIS ला संपर्क साधायचा प्रयत्न केला. त्याच्या ऑफिसमधून, रात्री उशिरापर्यंत जागून त्याने जिहादी नेटवर्कशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
लवकरच एका तोतया “ISIS लीडर”सोबत त्याचं Skype वर बोलणं सुरु झालं. अपहृत व्यक्तींच्या सुटकेबद्दल त्यांच्याशी टोबीची बोलणी सुरू झाली. पलीकडून जेव्हा पैश्यांची मागणी झाली – तेव्हा टोबीने तातडीने FBI ला माहिती दिली.
आणि तिथून FBI सोबत टोबीचं नाजूक, सावध नातं सुरू झालं.
दुर्दैवाने – ह्याचा शेवट टोबीच्याच अटकेत झाला.
चिंताजनक गोष्ट ही की टोबी तब्बल १४ महिने कुठ्ल्यायी न्याय्य प्रक्रीयेशिवाय जेलमधे डांबल्या गेला होता.
त्याच्यावर दोनदा निरनिराळ्या चाचण्या करण्यात असल्या ज्यात तो मानसिकदृष्ट्या नाजूक वाटला. FBI च्या मते तो ज्या लोकांशी ऑनलाईन बोलत होता, ते खोटे होते…अस्तित्वातच नव्हते !
चाचण्यांमधे टोबीला “delusional disorder, grandiose type” झाल्याचं निदान झालं.
वर्षभर टोबीच्या कुटुंबाच्या आणि विवीध पत्रकारांच्या पाठपुराव्यानंतर केस नव्या अधिकाऱ्याकडे दिली गेली. त्याने त्वरित टोबीच्या सर्व ऑनलाईन संभाषण आणि हिस्ट्रीची तपासणी केली आणि तिसऱ्या मानसिक चाचणीची आज्ञा दिली.
शेवटी टोबीला जामिनावर सोडण्यात आलंय.
टोबीच्या लेटेस्ट कमेंटनुसार – तो अमेरिकन सरकारविरुद्ध केस करण्याची तयारी करत आहे.
संपूर्ण वृत्त इथे वाचा.
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi