हनुमानाला वेगळ्या रूपात साकारणारा अवलिया आणि त्यामागची संकल्पना
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
रामजन्मानंतर रामभक्त आपल्या लाडक्या बजरंबलीच्या उत्सवाच्या तयारीला लागतात. रामजन्मीनंतर अवघ्या काही दिवसातच हनुमान जयंती असते. देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. अगदी उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या रूपात या संकटमोचक अशा मारुतीची रूपे पाहवयास मिळतात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
मारुतीच्या जन्मावरून देखील काही मिथ्य आहेत, काहींचं म्हणणं आहे मारुतीचा जन्म महाराष्ट्रातला आहे तर काहींचं म्हणणं आहे दक्षिण भारतात हनुमानाचा जन्म आहे. मारुती म्हंटल की आपल्यासमोर गदाधारी धष्टपुष्ट अशी प्रतिमा उभी राहते, रामाचा सर्वात मोठा भक्त असलेल्या मारुती रायाची प्रतिमा आपल्या मनात एकदम फिट बसली आहे तशीच एक प्रतिमा खूप मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आहे, आजच्या लेखात याच प्रतिमेबद्दल जाणून घेणार आहोत..
अगदी दुकानांच्या पाट्यांपासून ते अगदी गाडीच्या काचेवर वरील रंगीत हनुमानाची प्रतिमा दिसून येतेच. रामापुढे कायम नतमस्कत राहणारा मारुती या वेगळ्या रूपात लोकांना चांगलाच भावाला. मारुतीची ही प्रतिमा बनवण्याचं श्रेय जातं एका कलाकाराला आणो तो कलाकार आहे करण आचार्य.
मूळचा केरळचा असलेला करण पेशाने ग्राफिक डिजायनर आहे. न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत त्याने स्पष्ट केले की माझा मित्र आहे संघटना चालवतो त्या संघटनेसाठी त्यांना एका ध्व्ज हवा होता आणि इथूनच या रागीट हनुमानाचा जन्म झाला. त्याने पुढे हे नमूद केले की मी तयार केलेला मारुती एका दृष्टिकोनातून बनवला आहे त्यात कोणताही आक्रमकता नाही.
मारुतीची ही प्रतिमा २०१५ साली बनवण्यात आली होती, जी २०१७ साली लोकांच्या जास्त लक्षात येऊ लागली कारण बंगलोर शहरात या मारुतीच्या प्रतिमेचे स्टिकर्स ठिकठिकाणी आढळून आले. आणि इथपासून या प्रतिमेची चर्चा होऊ लागली. इतकाच नव्हे तर या प्रतिमेचा वापर दक्षिणेतील सिनेमांमध्ये केला आहे, मात्र त्याचे कॉपीराईटचे हक्क करणला मिळाले नाहीत.
उत्तरेत चर्चा :
मारुतीचं प्रस्थ जस ऊत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलं तसेच या प्रतिमेचे प्रस्थ दक्षिणेतून उत्तरेकडे पसरलं. दिल्लीमधील अनेक गाड्यांवर या प्रतिमेचे स्टिकर्स लावण्यात आले आहेत. अनेक टॅक्सी ड्रायव्हर, बाईक चालवणारे अशा लोकांच्या गाड्यांवर हे स्टिकर्स मोठ्या प्रमाणावर दिसून आले. मात्र हे स्टिकर्स मिळत कुठे असणार असं प्रश्न तुम्हाला पडला असेल ना तर हे स्टिकर्स गाड्यांच्या पार्ट्सची विक्री करणारे विक्रेत्यांकडे ३०० रुपयांना विकले गेले आहेत.
हनुमानाच्या स्पर्शाने निर्माण झालेल्या या तळ्याची किर्ती सातासमुद्रापार पोहोचली आहे
राजकीय रंग :
आज भारतात कोणत्याही गोष्टीला राजकीय रंग लागले नाही असं होणे नाही. अगदी देवदेवतांच्या प्रतिमांना देखील हे रंग लावण्यात आले. पारंपरिक मारुतीची ही प्रतिमा नाही तर याउलट त्याच्याकडे तीव्र डोळे आणि ज्वलंत डोळे आणि भगवा रंग अनेकांना भावला. मात्र काही हिंदू संघटनांनी याचा राजकीय विषय बनवला तर विरोधकांनी या प्रतिमेला बॉयकॉट करण्याची मागणी केली होती.
त्यांचं म्हणणं असं की अशा प्रकारे रिक्षा टॅक्सिवर अशा प्रतिमा लावून हिंदूंचे समर्थन करणे चुकीचे आहे. उजवी विचारसरणी फोफावत आहे अशी ही ओरड त्यांनी केली.
खुद्द मोदींनी केली प्रशंसा :
२०१४ साली मोदी सत्तेत आले आणि त्यानंतर लगेचच २०१५ साली ते मंगळूर येथे एका कार्यक्रमादरम्यान आले होते तेव्हा त्यांनी करण सारख्या कलाकाराचे कौतुक केले आणि काँग्रेसवर टीका करायला देखील विसरले नाहीत.
ही घटना जरी काही वर्षांपूर्वीची असली तरी आजही हनुमान चालीसा आणि मशिदीवरील भोंग्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.