' ‘ये दिवार टूटेगी नही’ हा विश्वास भारतीयांच्या मनात ठसवणाऱ्या कंपनीने गुंडाळला गाशा? – InMarathi

‘ये दिवार टूटेगी नही’ हा विश्वास भारतीयांच्या मनात ठसवणाऱ्या कंपनीने गुंडाळला गाशा?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपला एकूण विकास साधणे हे कुठल्याही कंपनीपुढचं मुख्य उद्दिष्ट असतं. कुठलीही कंपनी उभारायला, मोठी करायला जशी एखाद्या अभिनव कल्पनेची आणि पुरेश्या भांडवलाची आवश्यक्ता असते तशीच तिचा विस्तार करण्यासाठी योजनाबद्धतेचीही आवश्यक्ता असते. आपल्याला कधी कुठे थांबायचंय आणि कशाप्रकारे नवी सुरुवात करण्यासाठी प्रयत्न करायचेत हे अशा वेळी लक्षात घेणं त्या कंपनीच्या प्रगतीच्या दृष्टीने फार महत्त्वाचं असतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत आपण एका जाहिरातीत ‘ये दिवार टूटेगी नहीं’ हे घोषवाक्य ऐकत होतो.’अंबुजा सिमेंट’च्या जाहिरातीतले हे शब्द आजही आपल्या कानांत ऐकू येतात. आपल्या सिमेंटच्या दर्जाबद्दल इतका दृढ विश्वास भारतीयांच्या मनात ठसवणाऱ्या ‘होलसिम ग्रुप’ या जगातली सर्वात मोठी सिमेंट कंपनीने १७ वर्षें भारतात व्यवसाय केल्यानंतर भारतातून आपला गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे.

 

ambuja cement inmarathi

 

असा निर्णय घेण्याचा विचार करण्यामागे कंपनीचं काहीएक धोरण आहे. नेमकं काय आहे हे धोरण? आणि भारतातला आपला व्यवसाय कुठल्या कंपन्यांना विकण्याचा विचार ‘होलसिम ग्रुप’ करतोय? जाणून घेऊ.

‘होलसिम ग्रुप’चे ‘अंबुजा सिमेंट’ आणि ‘एसीसी लिमिटेड’ असे दोन सिमेंट ब्रँन्डस आहेत. आपल्या कोअर मार्केटवर लक्ष केंद्रित करणं हे या कंपनीचं धोरण असल्यामुळे भारतातून पाय काढता घेण्याच्या निर्णय ही कंपनी घेत आहे.

२०१५ साली ‘होलसिम’ ही स्वित्झर्लंडमधील कंपनी ‘लाफार्ग’ या फ्रेंच कंपनीसोबत एकत्र आली. LafargeHolcim या नावाने ही कंपनी इमारत बांधकाम साहित्यातील मोठी युरोपियन कंपनी बनली. मात्र भारतासह युरोप आणि आशियातील बऱ्याच बाजारपेठांमध्ये ‘अँटी-ट्रस्ट’ कायद्यांचं पालन करावं लागल्यामुळे कंपनीला आपली काही मालमत्ता हटवावी लागली. त्यानंतर ‘होलसिम ग्रुप’ या नावाने ही कंपनी री-ब्रँड झाली आणि अशा प्रकारे ती बाजरपेठेत आली.

 

lh im

 

२०२२ मध्ये सिमेंट इंडस्ट्रीतली मागणी ७ टक्क्यांहून अधिक वाढेल अशी आपली अपेक्षा असल्याचं अंबुजा सिमेंटने सांगितलं. आम्ही या दृष्टीने तयार आहोत असं कंपनीने म्हटलंय. अंबुजा सिमेंट अशी अपेक्षा करत असतानाच ‘होलसिम’ ‘अंबुजा सिमेंट’ आणि ‘एसीसी’ या कंपन्या विकत असल्याची बातमी समोर आली आहे.

अंबुजा सिमेंट कंपनीने यापूर्वी म्हटलं होतं की, पायाभूत सुविधांची वाढ, घरांची मागणी, ग्रामीण उत्पन्नांमधली वाढ आणि औद्योगिक विकास हे घटक कंपनीच्या विकासासाठी मदतीचे ठरू शकतील.

 

patrachawl im

उद्योजकांसाठी धडा: आपल्या उर्मटपणामुळे ‘फेरारी कंपनी’ने मोठा प्रतिस्पर्धी जन्माला घातला

कधीकाळी सुपरमार्केटमध्ये दादा असलेले बिग बझार आज रिलायन्स घेऊ पाहतंय

स्पर्धकांची उडी :

जेएसडब्ल्यू आणि अदानी समूह या दोन्ही कंपन्यांनी इतक्यातच सिमेंट इंडस्ट्रीत प्रवेश केला आहे. बाजारपेठेवर अव्वल स्थान मिळवण्यासाठी या दोन्ही कंपन्या कंबर कसून प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर ‘होलसिम ग्रुप’ जेएसडब्ल्यू आणि अदानी समूह आणि त्याचप्रमाणे इतरही कंपन्यांसोबत भारतातला आपला व्यवसाय विकण्याची चर्चा करत असल्याचं सूत्रांकडून समजतंय.

‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या एका अहवालानुसार, अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर या वाटाघाटी सुरू आहेत. कदाचित, ही बोलणी अंतिम व्यवहारापर्यंत पोहोचणारदेखील नाहीत अशी महिती ‘ब्लूमबर्ग’च्या सूत्रांनी दिली आहे. श्री सिमेंट सारख्या स्थानिक कंपन्यांनाही या संभाव्य विक्रीनिमित्ताने संपर्क साधला गेल्याचं समजतंय.

 

adani inmarathi

 

अंबुजा सिमेंट ही भारतीय बाजारपेठेत होलसिम कंपनीची फ्लॅगशिप कंपनी आहे. अंबुजा सिमेंटचं बाजारपेठ मूल्य सुमारे ९.६ बिलियन डॉलर इतकं आहे. यामध्ये ६३.१% इतकी प्रमोटर्सची भागीदारी आहे. ‘होल्डरिंड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड’द्वारे होलसिमकडे ही भागीदारी आहे.

एसीसी लिमिटेडमध्ये अंबुजा सिमेंटची ५०.०५% इतकी भागिदारी आहे. एसीसीमध्ये होल्डरिंड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडची प्रत्यक्ष भागीदारी ४.४८% आहे. २०१८ पासून होलसिम हे दोन्ही ब्रॅण्ड्स एकत्र करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

सद्यस्थितीत आदित्य बिर्ला समूहाची ‘अल्ट्राटेक सिमेंट’ ही कंपनी सगळ्यात मोठी कंपनी आहे. दरवर्षी ११७ दशलक्ष टन सिमेंट उत्पादन करण्याची या कंपनीजवळ क्षमता आहे. ‘होलसिम ग्रुप’च्या ‘अंबुजा सिमेंट’ आणि ‘एसीसी सिमेंट’ या दोन्ही कंपन्यांची उत्पादनक्षमता एकत्र केली तर ती प्रति वर्षाला ६६ दशलक्ष टन इतकी आहे.

त्यामुळे जो कुठला समूह या कंपन्या विकत घेईल त्याला ते इतकं फायद्याचं पडेल की ती थेट दुसऱ्या क्रमांकाची भारतातली सिमेंट कंपनी होईल. या कारणामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्याही या व्यवहारात लक्ष देत आहेत.

 

ultra tech im

 

बुधवारी अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेड या दोन्ही कंपन्यांचं एकत्रित बाजर भांडवल १.१४ लक्ष कोटी (१५ बिलियन डॉलर) होतं. त्यातल्या एकट्या अंबुजा सिमेंटकडे ७३,३४९ कोटी (९.७ बिलियन डॉलर) इतकं भांडवल आहे. संभाव्य विलीनीकरणाच्या अपेक्षेमुळे ६ एप्रिलपासून कंपनीचे शेअर्स १६ टक्क्यांनी वाढले आहेत.

मोठ्या पातळ्यांवर हे सगळे व्यवहार घडत असल्यामुळे त्यांची व्याप्ती आणि गांभीर्य आपल्याला कळू शकणार नाही. होलसिम ग्रुप आपला व्यवसाय सरतेशेवटी कुणाला विकेल हे वृत्त काही काळाने समोर येईलच. अंबुजा सिमेंटची ती जाहिरात दिसायची बंद झाल्याचं कदाचित आपल्याला अनेकांच्या अचानक लक्षात आलं असेल. पण या बातमीमुळे आपल्या कानांत रुंजी घालणारे या जाहिरातीचे शब्द पुन्हा प्रत्यक्षात ऐकता येणार नाहीत हे जवळपास निश्चित झालंय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?