' …आणि ती हवेत विरून गेली; ५२ वर्षं उलटली तरीही न सुटलेली केस – InMarathi

…आणि ती हवेत विरून गेली; ५२ वर्षं उलटली तरीही न सुटलेली केस

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

५९ वर्षांच्या रिकीला आता तिचा फक्त सततचा हसणारा चेहरा आठवतो ‘शेरिल कशी होती?’असं जर कोणी विचारलं तर पटकन रिकी सांगतो की “गोबरे गोबरे लाल गाल आणि गोंडस’. ती नेहमी आनंदी असायची. आमची छोटी राजकुमारी ही बदमाश तर होतीच पण तितकीच स्वभावाने गोडदेखील होती.”

रिकी आजही बोलताना भावूक होतो..त्याच्या या छोट्या बहिणीच्या बाबतीत असं काय घडलं की आजही त्या घटनेकडे रहस्य म्हणून लोक बघतात.चला तर मग जाणून घेऊयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ही घटना आहे अपहरणाची, एका कुटुंबातील चिमुरडीच्या गायब होण्याची आणि एका भावाने आपल्या बहिणीचा ५० वर्षांहून जास्त काळ शोध घेण्याची.

सत्तरच्या दशकात ग्रीमर कुटुंब ऑस्ट्रेलियात स्थायिक झालं. न्यू साऊथ वेल्स मधील फेअरी मेडो या गावात त्यांनी आपला संसार थाटला. “कॅरोल आणि व्हिन्स ग्रिमर आईवडील तर आम्ही चार भावंडं. सगळ्यांत मोठा मी रिकी, मग स्टीव्हन आणि पॉल आणि शेरील ही आमची सगळ्यात लहान बहीण होती आणि माझ्या आईवडीलांसाठी एकुलती एक मुलगी होती” आजही ‘मुलगी होती’ हे सांगताना रिकी यांचे डोळे पाणावल्याशिवाय राहात नाही!

 

grimmer family IM

आणि समोर असलेली शेरील अचानक गायब झाली :

तो दिवस होता १२ जानेवारी १९७० चा आणि वेळ होती दुपारची. ऑस्ट्रेलियातला उन्हाळा चांगलाच तापला होता म्हणून मुलांनी आग्रह केला आणि आई त्यांना घेऊन बीचवर आली. बीचवर सर्व भावंड खेळत असताना अचानक वारा सुटला आणि धुळीचं वादळ उठलं.

अचानक गोंधळ उडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. आई (व्हीन्स) रिकीला ओरडून सांगू लागली की ‘रिकी तू सर्वांना घेऊन वरती चेंजिंग रूमपाशी थांब मी आलेच’.

सर्व भावंड ड्रेसिंग रुमपाशी येत होते इतक्यात तीन वर्षांची चिमुरडी शेरील पळत पळत लेडीज रूममध्ये घुसली. रिकी आणि इतर भाऊ बाहेरचं थांबले. काही वेळाने तिला हाक मारूनही ती बाहेर आली नाही म्हणून ते आईला बोलवायला गेले. लेडीज रूम असल्याने त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला नाही.

ते आईला घेऊन वर येईपर्यंत फक्त फार फार तर ९० सेकंद गेले असतील पण तोवर चेरील नाहीशी झाली होती…हो म्हणजे अगदी एका क्षणी होती आणि दुसऱ्या क्षणी नाहीशी झाली.

 

cheryl grimmer IM

 

त्या सर्वांनी खूप शोधाशोध केली बीचवर ओरडत हाका मारल्या. इतर लोकांनीही तिला खूप शोधलं पण अखेर ती सापडली नाहीच!

तपसानंतर हाती काय आले?

शेरील प्रकरण माध्यमांवरसुद्धा चांगलच तापलं.शेरील गेली कुठे? तिला कोणी मारलं का? ती समुद्रात ओढली गेली? की कोणी तिचे अपहरण केले? असे अनेक प्रश्न समोर येऊ लागले.

मात्र या सगळ्यात अपहरण झालं असल्याचीच शक्यता पोलिसांना जास्त वाटली आणि त्यांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला. काही दिवसांनी पोलिसांना अपहरण स्थळाजवळ एक निळी फॉक्सवॅगन गाडी आढळली. त्यांना तिसऱ्याच दिवशी त्यांना खंडणी मागणारी एक चिठ्ठी मिळाली ज्यात १० हजार डॉलर्सची मागणी केली होती.

 

cheryl grimmer 2 IM

 

एका विशिष्ट जागेवर पैसै घेऊन भेटा म्हणजे मुलगी जिवंत परत मिळेल असं त्यात लिहिलं होतं. पण चिठ्ठी लिहिणारी व्यक्ती आलीच नाही. ना कधी त्या व्यक्तीने पुन्हा कोणाशीही संपर्क केला.

अखेर..एकाला अटक!

अचानक २०१७ साली या प्रकरणी पोलिसांनी एका माणसाला अटक केली. तो मनुष्य आता साठ वर्षांचा झाला होता. हा तोच माणूस होता ज्याने ५० वर्षांपूर्वी गुन्ह्याची कबुली दिली होती. पोलिसांचं म्हणणं होतं की याच माणसाने शेरीलचं अपहरण आणि खून केला.

मात्र आता तिचा मृतदेह सापडू शकत नाही..कारण त्या घटनेला ४७ वर्ष झालं आणि तिथे आता खूप बांधकाम होऊन तो भाग बदलला आहे. रिकी आता ऑस्ट्रेलियामध्ये राहतात.वयोमानाने त्यांना आता जास्त प्रवास करता येत नाही.

आजही शेरीलच्या गायब होण्याला ते स्वतः कारणीभूत असल्याची खंत मनात बाळगून ते जगत आहेत मात्र “आता इथून पुढे कधीही बीचवर जाणार नाही असा निर्धार करूनच..!”

 

cheryl brothers IM

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?