Site icon InMarathi

चक्क या ‘मुस्लिम’ देशाने ही मशिदीवरील भोंग्यांवर बंधने टाकली आहेत

masjid im 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मशिदींमध्ये लाऊडस्पीकर वरून अजान वाजवण्याचे विवाद पुन्हा एकदा जोर पकडत आहे. याप्रकरणी वर्षप्रतिपदा दिवशी राज ठाकरे यांनी त्यांच्या सभेमध्ये वक्तव्य दिले होते की, जर सरकारने ३ मे पर्यंत मशिदींतील लाऊडस्पीकर हटवले नाहीत तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असे ते म्हणाले होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जर सरकार यात अपयशी झाली तर अजान च्या वेळी मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवण्यात येईल असेही त्यांनी म्हटले. तसेच राज ठाकरे म्हणाले की, हा एक सामाजिक प्रश्न आहे, याला धार्मिक वळण  देण्याचा प्रयत्न करु नका.

 

ईद वर्षातून तीनदा का साजरी केली जाते? याचं कारण अनेकांना ठाऊक नसेल….वाचा

मशिदींवरील भोंग्यावर मनसेच नव्हे तर जावेद अख्तरसुद्धा विरोधात होते

तसेच ते म्हणाले की, मी राज्य सरकारला सांगू इच्छितो की आम्ही या मुद्द्यावर मागे हटणार नाही, तुम्ही हवे ते करू शकता. परंतु आपल्याला माहित आहे का, जगामध्ये काही मुस्लिम बहुल देशांमध्ये अजान आणि नमाजसाठी लाउड स्पीकर वापरण्यावर बंदी आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या देशांविषयी :-

● सौदी अरेबिया

सौदी अरेबिया हे एक मुस्लिम बहुल देश असून, या देशाची एकूण लोकसंख्या सुमारे साडेतीन लाख आहे. त्यापैकी ९४ टक्के मुस्लिम आणि ३ टक्के ख्रिश्चन आहेत. या देशात सुमारे ९४ हजार मशिदी असल्याचे सांगितले जाते.

सौदी अरेबियाचे इस्लामिक व्यवहारांचे मंत्री डॉ अब्दुल लतीफ बिन अब्दुल्ला अझीझ अल-शेख यांनी गेल्या आठवड्यातच या निर्बंधांची घोषणा केली आहे. ते म्हणाले होते की, मशिदींमधील लाऊडस्पीकरमध्ये ध्वनी लाऊडस्पीकरच्या कमाल ध्वनीच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त आवाज नसावा. दुसरे म्हणजे, मशिदींवर लावलेले लाऊडस्पीकर फक्त अजान आणि इकामतसाठी वापरले जाऊ शकतात. इकामत म्हणजे लोकांना दुसऱ्यांदा नमाजासाठी बोलावणे होय.

 

 

सौदी प्रशासनाने सांगितले की, “त्यांच्याकडे अशा तक्रारीही आल्या होत्या ज्यात काही पालकांनी लाऊडस्पीकरच्या मोठ्या आवाजामुळे मुलांना झोपेचा त्रास होत असल्याचे लिहिले होते.”

तसेच या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी लिहिले आहे. इस्लामच्या अनुयायांच्या मते, इमाम त्याच्या जागी बसला आहे आणि नमाज नुकतीच सुरू होणार आहे हे लोकांना कळवणे हा अजान आणि इकमतचा उद्देश आहे.

● इंडोनेशिया

जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला इंडोनेशिया या देशामध्ये पण अजान वर नवीन नियम बनवण्यात आले आहे. २०२१ मध्ये इंडोनेशिया मध्ये राहणाऱ्या अनेकांनी लाउड स्पीकर च्या आवाजाला घेऊन तक्रारी केल्या होत्या, त्याचवेळी स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासनाने या तक्रारींची दखल घेत नवंबर महिन्यात लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितले होते, मात्र तरीही लोकांच्या तक्रारी सुरूच होत्या.

यानंतर लाऊडस्पीकरच्या वापराबाबत मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण केले जात आहेत. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या देशातील ७० हजार मशिदींमधील लाऊडस्पीकरचा आवाज कमी झाला आहे.

 

 

● कुराणचे दाखले

सौदी मधील इस्लामिक तज्ञांनी या आदेशामागे शरियतचा युक्तिवाद केला आहे. सौदी प्रशासनाचा हा आदेश पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद यांच्या सूचनेवर आधारित आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

सौदी प्रशासनाने आपल्या आदेशात असा युक्तिवाद केला आहे की “इमाम नमाज सुरू करणार आहेत, हे मशिदीत उपस्थित असलेल्या लोकांनाच माहित पडले पाहिजे ना की शेजारच्या घरात राहणाऱ्या लोकांना. मोठ्या आवाजात अजान वाजवने हा कुराणचा अपमान आहे.

 

patrika

● राज ठाकरे प्रमाणेच अनेक लोकांनी याचा विरोध केला आहे.

काही दिवसांपूर्वी अनुराधा पौडवाल यांनी देखील या प्रकरणवार आपले मत नोंदवले आहे. त्या म्हणाल्या की, “मी मध्यपूर्वेतील देशांमध्येही प्रवास केला आहे. पण भारतात जसं घडतं, तसं इतर कोठेही होत नाही. मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही.

मशिदीतून मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर लावून अजान वाजवली जाते आणि याला आपल्याकडे प्रोत्साहन पण दिले जाते. तसेच त्यांनी विचारले की, मुस्लिम देशांमध्ये लाऊडस्पीकरचा वापर होत नसताना फक्त भारतातच का होत आहे?

 

 

अनुराधाप्रमाणेच सोनू निगमने २०१७ मध्ये असाच प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी विचारले होते की, इस्लामची स्थापना झाली तेव्हा तर वीज नव्हती. मग हे सर्व आता का घडते? तो म्हणाला की तो मुस्लिम नाही, तरीही त्याला त्या भोंग्याच्या आवाजामुळे सकाळी उठावे लागते. धर्म बळजबरीने लादणे कधी थांबणार? त्यांच्या या वक्तव्यानंतर कट्टरवाद्यांनी त्यांच्यावर टक्कल पडल्याचा फतवा काढला होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version