आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सध्या सगळीकडे एकच बातमी धुमाकूळ घालतेय. रणबीर कपूर-आलीया भट्टचं लग्न. समोर आलेल्या वृत्तानुसार, आजपासून तीन दिवस त्यांचे सगळे लग्नविधी पार पडणार असल्याचं समजतंय. आपल्याला मनापासून आवडलेल्या व्यक्तीसोबत आपलं लग्न होणं याहून अधिक भाग्याची गोष्ट आणखीन कुठली!
बॉलिवूड इंडस्ट्रीत ‘कपूर घराण्याचा’ अगदी शाही थाट आहे. पण तुम्हाला माहितीय का? आलिया भट्ट ही कपूर घराण्याची ११वी सून आहे. या निमित्ताने, कपूर घराण्यातल्या इतर दहा सुनांविषयी थोडक्यात जाणून घेऊ.
१९२८ पासून कपूर घराण्याच्या तब्बल ५ पिढ्या बॉलिवूड गाजवत आहेत. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून रणबीर कपूर पर्यंत या घराण्यातल्या जवळपास ३० जणांनी बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये कामं केलेली आहेत.
पृथ्वीराज कपूर हे बॉलिवूडमध्ये अभिनय केलेले कपूर घराण्यातले पहिले सदस्य. १९२८ साली ‘दो धारी तलवार’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पृथ्वीराज कपूर यांच्या राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर या तिन्ही मुलांनी बॉलिवूडमध्ये आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं.
पृथ्वीराज कपूर यांचे ज्येष्ठ पुत्र असलेले राज कपूर यांची तिन्ही मुलं रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर यांनीदेखील बॉलिवूडच्या चित्रपटांतून कामं केली.
—
- बोहल्यावर चढणाऱ्या रणबीरच्या या ५ ‘गलतीसे मिस्टेक्स’ कुणीही विसरलेलं नाही
- ‘कपूर अण्ड सन्स’ चे हे २७ दुर्मिळ B&W फोटो चित्रपटप्रेमींनी पहायलाच हवेत
—
पृथ्वीराज कपूर यांचा दुसरा मुलगा शम्मी कपूर यांना आदित्य राज कपूर आणि कंचन केतन देसाई अशी दोन मुलं झाली, तर पृथ्वीराज कपूर यांचे सगळ्यात धाकटे पुत्र शशी कपूर यांना करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर अशी तीन मुलं झाली.
शम्मी कपूर यांचा मुलगा आदित्य राज कपूर याने काही चित्रपटांमध्ये कामं केली, पण तो काही आपली विशेष चुणूक दाखवू शकला नाही. कुणाल कपूर, करण कपूर आणि संजना कपूर या शशी कपूर यांच्या मुलांनीदेखील चित्रपटांमध्ये कामं केली आहेत.
करीना कपूर आणि करिष्मा कपूर या रणधीर कपूर यांच्या दोन्ही मुली बॉलिवूडमध्ये चांगल्याच यशस्वी झाल्या. ऋषी कपूर यांचा मुलगा असलेला रणबीर कपूर हा केवळ एक मोठा स्टार म्हणूनच नाही तर उत्तम अभिनेता म्हणूनही ओळखला जातो. राजीव कपूर यांनी लग्न केलं. मात्र त्यानंतर लवकरच त्यांचा घटस्फोट झाला.
आलियापूर्वी ज्या १० सुना कपूर घराण्याचा भाग झाल्या त्या कोण होत्या हे पाहूया :
१. पृथ्वीराज कपूर – रामसरणी मेहरा कपूर :
पृथ्वीराज कपूर यांनी रामसरणी मेहरा यांच्याशी लग्न केलं. राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर आणि उर्मिला कपूर अशी चार अपत्य त्यांना झाली.
२. राज कपूर – कृष्णा मल्होत्रा कपूर :
राज कपूर यांनी कृष्णा मल्होत्रा यांच्याशी विवाह केला. त्यांना रणधीर कपूर, ऋषी कपूर, राजीव कपूर अशी ३ मुलं आणि रतु नंदा आणि रीमा जैन अशा दोन मुली झाल्या.
३. शम्मी कपूर – गीता बाली कपूर – नीला देवी कपूर :
१९५५ साली बॉलिवूड अभिनेते शम्मी कपूर यांनी गीता बाली यांच्याशी लग्न केलं. या दोघांना आदित्य राज कपूर आणि कंचन केतन देसाई अशी दोन अपत्य झाली. गीता बाली यांच्या मृत्यूनंतर शम्मी कपूर यांनी नीला देवी यांच्याशी दुसरं लग्न केलं.
४. शशी कपूर – जेनिफर केंडल कपूर :
शशी कपूर यांनी जेनिफर केंडल या इंग्लिश अभिनेत्रीशी लग्न केलं. करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर अशी तीन मुलं त्यांना झाली.
५. रणधीर कपूर – बबीता कपूर :
अभिनेते रणधीर कपूर यांनी अभिनेत्री बबीता यांच्याशी विवाह केला. करिष्मा कपूर आणि करीना कपूर या त्यांच्या २ मुली आहेत.
६. ऋषी कपूर – नीतू सिंग कपूर :
अभिनेते ऋषी कपूर यांनी अभिनेत्री नीतू सिंग यांच्याशी लग्न केलं. त्यांना रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी अशी दोन मुलं आहेत.
७. राजीव कपूर – आरती सभरवाल कपूर :
अभिनेते राजीव कपूर यांनी आरती सभरवाल यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांना मुलं नाहीत. लग्नानंतर लगेचच त्यांचा घटस्फोट झाला.
८. आदित्य राज कपूर – प्रीती कपूर :
शम्मी कपूरचे पुत्र आदित्य राज कपूर यांनी प्रीती कपूर यांच्याशी विवाह केला. विश्वा कपूर आणि तुलसी कपूर अशी दोन मुलं त्यांना आहेत.
९. कुणाल कपूर – शीना सिप्पी :
शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर यांनी शीना सिप्पी यांच्याशी लग्न केलं. कुणाल आणि शीना यांना जहान पृथ्वीराज कपूर आणि शायरा लौरा कपूर अशी दोन मुलं आहेत.
१०. करण कपूर – लोर्ना कपूर :
शशी कपूर यांचा मुलगा करण कपूर यांनी लोर्ना कपूर यांच्याशी लग्न केलं आहे. त्यांना आलिया कपूर आणि जैच कपूर अशी दोन मुलं आहेत.
११. रणबीर कपूर – आलिया भट्ट :
रणबीर-आलीयाच्या लग्नाद्वारे आता कपूर घराण्याचे भट्ट कुटुंबीयांशीही संबंध जोडले जात आहेत.
कपूर घराण्यातल्या अभिनेत्यांची चर्चा कायमच झालीये. पण स्वतः अभिनेत्र्या असल्यामुळे चर्चेत राहिलेल्या नीतू सिंग, बबीता आणि आता आलिया असे मोजके अपवाद वगळल्यास कपूर घराण्यातल्या सुना मात्र कधी फारश्या चर्चेत आल्या नाहीत.
सुनांची इतकी लांबलचक यादी असलेलं कपूर घराण्याइतकंइतकं बडं दुसरं घराणं बॉलिवूडमध्ये नसावं. कपूर घराण्याच्या अजून किती पिढ्या बॉलिवूडवर राज्यं करतील हे येणारा काळ ठरवेलच.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.