Site icon InMarathi

चाल, शब्द, संगीत सगळंच अप्रतिम असूनही ही गाणी चित्रपटात का घेतली नाहीत?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलिवूडचा चित्रपट म्हटलं की टिपिकल मसाला, ड्रामा, एखादी प्रेमकहाणी आणि गाणी या गोष्टींशिवाय तो पूर्णत्वाला येत नाही, हे मात्र खरं! गाणी हा तर बॉलिवूडपटांमधील अविभाज्य भाग आहे.

अगदी साठच्या दशकातील गाणी असोत, किंवा आजच्या नव्या पिढीची धांगडधिंगा असणारी उडत्या चालीची गाणी, आबालवृद्धांच्या तोंडी कुठलं ना कुठलं गाणं हे असतंच.

 

 

एखादा जुन्या गाण्याचा शौकिन असतो, तर कुणाला हल्लीच्या काळातील गाणीच आवडतात. त्यामुळेच बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये गाणी असणं मस्ट आहे. कधी कधी मात्र, काही गाणी प्रेक्षकांना आवडतात, ती त्यांच्या आवडीची असतात; पण तरीही चित्रपटांमध्ये मात्र ती घेतली जात नाहीत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कधी पैशांचा वाद, कधी ती गाणी अचानक अप्रासंगिक वाटू लागणं, कधी त्या गाण्यांच्या वेळामुळे चित्रपटाची लांबी वाढणं, अशी एक ना अनेक कारणं तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यामुळे अत्यंत उत्तम दर्जाची आणि सगळ्यांनाच आवडतील अशी गाणी असूनही, ती गाणी चित्रपटांमधून वगळण्यात आली.

अशाच काही गाण्यांविषयी आज जाणून घेऊया.

१. फिफी :

 

 

मजरुह सुलतानपुरी यांची गीतं अनेकांच्या आवडीची होती. एक उत्तम कवी आणि गीतकार म्हणूनच त्यांचं नाव कायम घेतलं जातं. त्यांनीही त्यांच्या गाण्यात थोडीशी चापलुसी केली आहे, असं जर तुम्हाला सांगितलं तर? होय हे अगदी खरं आहे.

१९५४ साली प्रदर्शित झालेल्या ‘आर-पार’मधील ‘सुन सुन झालीमा’ या गाण्यात त्यांनी ‘हमको’ असा शब्द वापरला. हा शब्द खरं तर कुठल्याच भाषेत अस्तित्वात नाही.

फिफी हे गाणं काही त्या चित्रपटासाठी लिहिलं गेलं नव्हतं. १९५६ साली सीआयडी या सिनेमात ते गाणं घेतलं जाणार होतं. यमक जुळवायचं म्हणून, त्यांनी फिफी असा नवा शब्द तयार केला. हा शब्द काही सेन्सॉरबोर्डकडून मान्य करण्यात आला नाही.

हे गाणं चित्रपटातून वगळण्यात आलं. या गाण्याचं कुठलंही चित्रीकरण करण्यात आलं नाही. पुढे २०१५ साली बॉम्बे वेलवेट या चित्रपटात हे गाणं घेण्यात आलं.

मात्र इथेही ते एक आठवड्याहून अधिक काळ चित्रपटात टिकाव धरू शकलं नाही.

२. बालमा खुली हवा, (कश्मीर की कली) :

 

 

हे गाणं चित्रपटातून काढून टाकलं गेलं, त्याची कहाणी अधिकच रंजक आणि आश्चर्यकारक आहे असं म्हणायला हवं. पहिल्या आठवड्यात चित्रपट पाहायला गेलेल्या मंडळींना हे गाणं चित्रपटात पाहता आलं.

मात्र गाण्यातील एका प्रसंगात शर्मिला टागोरची ओढणी उडून गेली असल्याची उपरती सेन्सॉरबोर्डाला उशिराने झाली आणि त्यावर आक्षेप घेण्यात आला. त्याकाळातील सेन्सॉरबोर्डाला हेसुद्धा ‘थोडं जास्त’च वाटलं आणि चित्रपटातून गाणं काढून टाकण्यात आलं.

३. साहिल के तरह कश्ती ले चल :

 

 

साहिब, बीबी और गुलाम या १९६२ सालच्या चित्रपटातील हे गाणं. हेसुद्धा चित्रपटातून काढण्यात आलं. मात्र यावेळी ज्यांना ते खटकलं, ते सेन्सॉरबोर्ड नव्हतं.

ते जनमत होतं. शकील बदायुनी यांनी लहिलेलं आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं हे गाणं; मात्र यात पडद्यावर दिसणाऱ्या मीना कुमारीचं पात्र योग्य वर्तणूक करत नाही असं लोकांचं मत होतं.

जो पुरुष आपला पती नाही, अशा व्यक्तीच्या मांडीवर एका विवाहित स्त्रीने डोकं टेकून झोपणं जनतेला मान्य नव्हतं. म्हणूनच हे गाणं चित्रपटातून काढलं गेलं.

४. आज दिल पे कोई जोर चलता नहीं :

 

 

या गाण्याचं नाव आणि त्याची चित्रपटातून झालेली गच्छंती एकमेकांशी अगदी साम्य साधणारे आहेत असं म्हणायला हरकत नाही. लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीचं हे गीत लोकांना आवडलं नाही.

आवडलं नाही म्हणजे तरी किती, चित्रपटाच्या मध्यंतरानंतर लगेच असणारं हे गीत ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी लोक चित्रपटगृहात परतत नसत. त्यांच्यासाठी मध्यंतर थोडं मोठचं होतं म्हणा ना. आता प्रेक्षकच ‘दिल पे कोई जोर चलता नहीं’ म्हणू लागले म्हटल्यावर, गाणं चित्रपटातून काढून टाकण्यात आलं.

५. चाँदसा कोई चेहरा :

 

 

शोले हा एक सुपरडुपर हिट चित्रपट म्हणायला हवा. जा चित्रपट उत्तम आहे यात कुणाचंही दुमत नसेल. तसाच हा चित्रपट काहीसा मोठा सुद्धा आहे.

या चित्रपटात ‘चाँदसा कोई चेहरा’ नावाची एक कव्वाली सुद्धा होती. मात्र चित्रपट मुळातच मोठा झाल्यामुळे या कव्वालीला कात्री लावण्यात आली.

६. चैन से हमको कभी :

 

 

एखाद्या चित्रपटातून गाणं वगळण्यासाठी वैयक्तिक मतभेद सुद्धा कारणीभूत असू शकतात याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आशा भोसले यांनी गायलेलं ‘प्राण जाये पार वचन न जाये’ सिनेमातील ‘चैनसे हमको कभी’ हे गाणं.

ओ पी नय्यर यांच्याशी आशा भोसले यांचा झालेला वाद हे निव्वळ कारण झालं, आणि हे गाणं चित्रपटातून वगळण्यात आलं. या गाण्यासाठी आशाजींना चक्क फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा मिळालं आहे बरं का मंडळी.

७. इव्हनिंग इन पॅरिस :

 

 

अगदी नजीकच्या काळातही चित्रित झालेलं गाणं चित्रपटात नसण्याची घटना घडलेली आहे. ‘ए दिल हैं मुश्किल’ या सिनेमात रणबीर आणि अनुष्का यांच्यावर चित्रित झालेलं ‘इव्हनिंग इन पॅरिस’ हे गाणं घेतलं जाणार होतं.

रफी यांचं मूळ गाणं नव्याने नव्या ढंगात चित्रित झालं होतं. मात्र काही कारणाने हे गाणं चित्रपटातून वगळण्यात आलं.

८. मुझसे मिलती हैं एक लडकी रोजाना :

 

 

विनोदी सिनेमांच्या यादीमधील एक जबरदस्त नाव म्हणजे हेराफेरी. विनोदाचा एक तुफान धिंगाणा असं या चित्रपटाचं वर्णन केलं, तरी ते चुकीचं ठरणार नाही. या चित्रपटातील गाणी सुद्धा लोकांच्या मनावर राज्य करणारी ठरली.

या सिनेमाच्या गाण्यांची कॅसेट ८ गाण्यांसह तयार होती, मात्र प्रत्यक्ष चित्रपटात ही सगळी गाणी नव्हती.

यातीलच एक उत्तम गाणं म्हणजे ‘मुझसे मिलती हैं एक लडकी रोजाना’ चित्रपटात नसलं, तरी हे गाणं सगळ्यांनाच खूप आवडलं होतं. अलका याज्ञीक आणि उदित नारायण यांनी हे गाणं गायलं होतं.

९. कितनी हैं बेकरार यह चिंता की चांदनी :

 

 

‘दिल तो पागल हैं’ या चित्रपटाच्या वेळी यश चोप्रा आणि कुमार सानू यांच्यात बेबनाव झाल्याचं म्हटलं जातं. कुमार सानू हा त्याकाळातील सर्वात प्रसिद्ध आणि लाडका गायक होता. यशजींनी त्याला फी कमी करायची विंनती केली आणि ती कुमार सानूने मान्य केली नाही.

कुणीही मागे न हटल्याने वाद विकोपाला गेला आणि कुमार सानू यांनी त्यानंतर कधीही यश चोप्रा यांच्यासह काम केलं नाही. या वादाचा परिपाक म्हणून, ‘कितनी हैं बेकरार यह चिंता की चांदनी’ हे गाणं चित्रपटाच्या कॅसेटमध्ये सुद्धा घेतलं गेलं नाही.

उदित नारायण आणि लता मंगेशकर यांच्याच आवाजात सिनेमाची सगळी गाणी रेकॉर्ड झाली. कुमार सानू यांच्यासह लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत सिनेमाचा भाग होऊ शकलं नाही.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version