धक्कादायक! ठाकरे सरकारने रमाबाई आंबेडकर, छ. संभाजी महाराज यांचे जयंती कार्यक्रम केले रद्द?!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
अनेक महापुरुषांनी आपलं आयुष्य या महाराष्ट्रासाठी खर्च केलं. या महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास जपण्यासाठी कित्येकांनी त्यांचे प्राण पणाला लावले. अशाच काही महापुरुषांची आपण जयंती दरवर्षी साजरी करतो.
छत्रपती शिवाजी महाराजांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत कित्येक महान लोकांची जयंती या राज्यात भव्य पद्धतीने साजरी होते.
महाराष्ट्र सरकारदेखील दरवर्षी या महापुरुषांच्या जयंती साजरी करण्याचे कार्यक्रम आखते, पण नुकतंच याबाबत एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते तुषार दामगुडे यांनी नुकतंच RTI ची मदत घेऊन एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. कोविड काळात आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारने या जयंत्या साजऱ्या करण्याच्या कार्यक्रमात बरेच बदल केले आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
तसेच रमाबाई आंबेडकर, गुरु गोविंदसिंह, गुरुनानक, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे कार्यक्रम काही कारणास्तव रद्द केले आहेत. अशी माहिती या RTI च्या अर्जातून समोर आलेली आहे.
याचसंदर्भात तुषार यांनी त्यांचं मत फेसबुकच्या माध्यमातून मांडलं आहे ते आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
===
प्रतिवर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महापुरुषांची जयंती साजरी करण्याचा कार्यक्रम होत असतो. महापुरुषांची जयंती साजरी करताना ते महापुरुष कोणते आहेत याची यादी शासनाच्या वतीने वेळोवेळी प्रमाणित करण्यात येते.
जयंती साजरी करण्याच्या यादीत आपल्याला पसंत असलेल्या व्यक्तींचा नव्याने समावेश करण्यासाठी विविध संस्था, व्यक्ती ‘सामान्य प्रशासन विभागाकडे’ शिफारस करतात.
त्या शिफारशींवर शासन नियुक्त व्यक्ती विचार करतात व याबाबतचा अंतिम निर्णय सद्य मुख्यमंत्री घेतात. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामान्य प्रशासन विभाग’ स्वतःच्या अखत्यारीत ठेवला आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार त्या त्या व्यक्तीचा समावेश महापुरुषांच्या यादीत अथवा शासकीय पातळीवर जयंती साजरी करण्याच्या यादीत होतो अथवा होत नाही.
यासंदर्भात मी म्हणजे तुषार दामगुडे यांनी महाराष्ट्र शासनाकडून माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीवरून काही गोष्टी उघड झाल्या आहेत त्या पुढील प्रमाणे.
डिसेंबर २०२० पर्यंत शासकीय स्तरावर जयंती साजरी केली जावी यासाठी सरकारकडे नऊ व्यक्तींच्या नावांची शिफारस झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यातील पाच नावे नाकारली व नव्याने ४ व्यक्तींचा समावेश केला.
मंजूर झालेल्या चार नावातील एक नाव आहे सद्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वडील शिवसेना संस्थापक श्री बाळासाहेब ठाकरे व दुसरे नाव आहे ते मुख्यमंत्र्यांचे आजोबा श्री प्रबोधनकार ठाकरे यांचे. ही दोन नावे मंजूर करण्यासाठी आधार घेतला गेला तो शिवसेनेचेच पदाधिकारी असलेल्या दोन व्यक्तींच्या शिफारसीचा.
या शिव सैनिकांनी ज्या वर्षी बाळासाहेब ठाकरे व प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाची शिफारस केली, आश्चर्य म्हणजे त्याच वर्षी ती लगेच मंजूर झाली.
प्रकरण फक्त एवढेच नाही तर “आपल्या अधिकारांचा वापर करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरे व आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा समावेश महापुरुषांच्या जयंती यादीत केला इथपर्यंत ठीक आहे. परंतु हे करताना मुख्यमंत्र्यांनी त्याच वर्षी शिफारस केले गेलेल्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेले छत्रपती संभाजी महाराज, शीख समुदायाचे गुरू नानक सिंग, नांदेड येथे ज्यांची समाधी आहे ते गुरू गोविंद सिंग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई, थोर क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांना डावलले हे माहिती अधिकारात उघड झाले आहे.
शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन झालेला व जहाल हिंदुत्वाचा पुरस्कर्ता असलेला पक्षच संभाजी महाराजांच्या नावाची शिफारस डावलतो हे अधिक दुःखद आहे.
यासंदर्भातले RTI चे काही स्क्रीनशॉटसुद्धा याबरोबरच जोडले आहेत :
–
- मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्षा बंगल्याचा अज्ञात इतिहास!
- महाराष्ट्रासमोर उभं ठाकलेलं “हे” राजकीय संकट कोरोनापेक्षाही जास्त संभ्रमात टाकणारं आहे
–
आधुनिक हिंदुस्थानच्या जडणघडणीत वरील व्यक्तींचे किती मोठे कर्तृत्व आहे हे तमाम भारतातील सर्वसामान्य जनता जाणते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्या व्यक्तींना डावलण्यामागे नेमके काय निकष लावले हे समजण्यास किमान मला तरी मार्ग नाही.
आजवर सर्वसामान्य नागरिकांच्या पैशातून निर्माण केले जाणारे महामार्ग, विमानतळ, महापौर बंगले व इतर शासकीय मालमत्ता यांच्यावर स्वतःची नावं लावणे, वेळप्रसंगी त्या मालमत्ता ताब्यात घेऊन तिथं जवळपास खाजगी मालकीच्या म्हणता येईल अशा पध्दतीने स्मृतिस्थळ, व्यावसायिक आस्थापने उभारणे हे प्रकार राज्यभर सुरू होतेच.
आता या जोडीनेच स्वतःच्या अधिकारात, दिवंगत असलेल्या मोठमोठ्या व्यक्तिमत्वांना डावलून स्वकुटुंबियांची वर्णी महापुरुष म्हणून करवून घ्यायची व जनतेच्या खर्चात सरकारी कार्यालये व शाळा कॉलेज यामध्ये जयंती साजरी करून पुढील पिढ्यांवर प्रभाव निर्माण करायचा हा नवीन पायंडा राजकीय नेते पाडत आहेत काय हा प्रश्न मनात उभा राहतो.
यासंदर्भात मी ‘शासन स्तरावर छत्रपती संभाजी महाराज, गुरू नानक, माता रमाई, लहुजी वस्ताद, गुरू गोविंदसिंग यांची जयंती साजरी करण्यात यावी यासाठी पत्रव्यवहार करणार आहे.
त्याचप्रमाणे महापुरुषांच्या यादीत व्यक्तींचा समावेश करण्यासाठी नेमके कोणकोणते गुण,कार्य-कर्तृत्व आवश्यक आहेत याचे लिखित स्वरूपातील निकष बनवण्यासाठी मान्यवरांची समिती गठीत करण्यात यावी अशी मी मागणी करतो. जेणेकरून भविष्यात अनावश्यक वादविवादाचे प्रसंग टळतील.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.