' अर्जुन रणतुंगा म्हणतोय, “IPL जाऊद्या आधी ‘आपल्या’ देशासाठी उभे रहा” – InMarathi

अर्जुन रणतुंगा म्हणतोय, “IPL जाऊद्या आधी ‘आपल्या’ देशासाठी उभे रहा”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सद्य परिस्थितिमध्ये कोरोना संपला असे जरी म्हंटले जात असले तरी कोरोना काही गेलेला नाही. तो या न त्या वेरीएंटच्या रूपामध्ये डोके वर काढतोच आहे. चीन मध्ये सध्या कोरोना चे शेकडो रुग्ण परत वाढल्याची व चौथी लाट येण्याच्या शक्यतेची बातमी देखील सध्या सगळीकडे चर्चेत आहे. दोन वर्षापूर्वी आलेलल्या कोरोना च्या लाटेमुळे सगळे जग जणू ठप्प झाले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

देशाबाहेर किंवा देशांतर्गत देवाण घेवाण, प्रवास यावरती बंधने लादली गेली.आता परिस्थिती निवळलेली दिसत असली तरी या मागची व्यथा प्रचंड भयानक आहे. कारण कोरोना मुळे अनेक देशांचे बारा वाजले आहेत. प्रगती पथावर असलेल्या देशांना देखील पुन्हा पहिल्या पासून सुरुवात करायची वेळ आली आहे. यापैकी च एक देश म्हणजे आपला सहचारी, सख्खा शेजारी श्रीलंका.

 

sri lanka im

 

सध्याची श्रीलंका म्हणजे रामायणातील लंकेचा राजा रावण याची सोन्याची लंका. असे म्हंटले जाते की श्रीलंका ही पूर्ण सोन्याची होती,अफाट संपत्ती, प्रचंड संपन्नता ,आणि अपार वैभव या त्रिसूत्रांनी नटलेली ही नगरी सध्या बेरोजगारी, व कर्जबाजारी श्रीलंका म्हणून उदयास येत आहे.परकीय चलंनाच्या घट्ट विळख्यात सापडलेला हा देश आवश्यक आयातीचे बिल भरण्यास देखील असमर्थ आहे.

श्रीलंकेच्या आर्थिक संकटाला करणीभूत ठरलेली कारणे म्हणजे पर्यटन , परदेशी कर्ज, रोजच्या जीवनात लागणार्‍या मूलभूत वस्तूंची महागाई, फूड माफीयांचा सुळसुळाट, आणि राष्ट्रपतींबद्दल असलेला रोष ही आहेत.

परकीय चलनाचा तुटवडा आणि गगनाला भिडलेली महागाई यामुळे देशात रेशन, इंधन आणि वैद्यकीय पुरवठ्यासह अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंची तीव्र कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्र गंभीर आर्थिक संकटातून जात असतानाही श्रीलंकेच्या खेळाडूंनी इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझीमध्ये खेळणे सुरू ठेवल्याबद्दल विश्वचषक विजेता श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा याने निराशा व्यक्त केली.

 

ipl inmarathi

३ लग्नं, असंख्य लफडी आणि क्रिकेट : राजकारणी इम्रान खानचा वादग्रस्त प्रवास!

चीनशी वाढती जवळीक नडली आणि पाकिस्तान श्रीलंकेत अस्थिरता निर्माण झाली

कोविड-१९ या रोगाच्या पहिल्या लाटेनंतर देशाची अर्थव्यवस्था प्रचंड ढासळल्याने श्रीलंकेच्या विविध भागांमध्ये सरकारच्या विरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. अर्थव्यवस्थेच्या वाईट हाताळणीसाठी सरकार वर ठपका ठेवत राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत अनेक श्रीलंकन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

याच पार्श्वभूमीवर श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी आयपीएलमधील श्रीलंकन खेळाडूंना एका आठवड्यासाठी मायदेशी जाण्यास आणि देशातील गंभीर आर्थिक संकटाला सामोरे जात घडणार्‍या निदर्शनांमध्ये सामील होण्यास सांगितले आहे.

 

arjun ran im

 

माजी कर्णधार कुमार संगकारा आणि महेला जयवर्धनेसारखे माजी क्रिकेटपटू आयपीएलशी बांधले गेले आहेत. त्याचसोबत सपोर्ट स्टाफचा सदस्य म्हणून माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा हा आपले योगदान देत आहे तर वनिंदू हसरंगा, भानुका राजपक्षे, दुष्मंथा चमीरा, चमिका करुणारत्ने (चमिका करुणारत्ने) आणि महेश थेक्षाना सारखे हे आयपीएल मधील संघाशी जोडले गेले आहेत.

रणतुंगा म्हणतात, मी आंदोलनात का नाही? असा प्रश्न लोक मला विचारतात. मी गेली १९ वर्षे राजकारणात आहे परंतु हा काही राजकीय मुद्दा नाही. आजपर्यंत कोणताही राजकीय पक्ष किंवा राजकारणी आंदोलनात उतरला असल्याचे स्मरणात नाही आणि हीच या देशातील जनतेची सर्वात मोठी ताकद आहे.

 

sri lanka im 4

 

श्रीलंकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेता, मला खरंच माहित नाही पण असे ही काही क्रिकेट खेळाडू आहेत ज्यांची आयपीएल मधली खेळी दमदार आहे पण आपल्या देशाबद्दल ते काहीच बोलत नाहीत.

दुर्दैवाने म्हणू परंतु लोक सरकारविरोधात बोलायला घाबरतात. मंत्रालय आणि बाकी लोक त्यांच्या नोकऱ्यांचा विचार करत आहेत, परंतु आता त्यांना ठोस पाऊल उचलावेच लागेल कारण काही युवा क्रिकेटपटूं जसे वणिंदू हसरंगा, भानुका राजपक्षे यांसारखे श्रीलंकेचे खेळाडू आर्थिक संकटाविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांच्या समर्थनार्थ पुढे आले होते.

जेव्हा काही चुकीचे घडत असेल तेव्हा तुमच्या व्यवसायव नोकरी चा विचार न करता पुढे येऊन त्याविरोधात बोलण्याची ताकद प्रत्येकामध्ये असलीच पाहिजे असे रंतुंगा या वेळी म्हणाले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?