Site icon InMarathi

दुर्दैव: दोन महिन्यापूर्वी मुलगा गमावला आणि आता….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलीवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपल्या कलेतून निश्चितच स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘२ स्टेट्स’ चित्रपटात आलियाच्या वडिलांची भूमिका साकारणारे दिग्गज अभिनेते शिव सुब्रमण्यम यांचं नुकतंच निधन झालंय. या दुःखद प्रसंगानंतर त्यांच्यासोबत काम केलेल्या चित्रपटसृष्टीतल्या काही कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना अलविदा म्हटलंय.

आपल्यातल्या अनेकांना कदाचित हे माहित नसेल, पण आपल्या ३० वर्षांपेक्षाही जास्त कारकिर्दीत शिव सुब्रमण्यम यांनी केवळ एक अभिनेता म्हणूनच नाही तर लेखक म्हणूनच नाव कमावलंय.

 

 

१९८९ साली ‘परिंदा’ या चित्रपटाद्वारे त्यांनी अभिनेता आणि लेखक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांच्या सिनेकारकिर्दित ते अभिनेते म्हणून बऱ्याचदा सहाय्यक भूमिकांमध्ये दिसले. त्यांची भूमिका छोटी असो अगर मोठी, त्यांनी कायमच आपल्या अभिनयाने रसिकमनावर छाप पाडली.

‘स्टॅनली का डिब्बा’ मध्ये त्यांनी साकारलेला गणिताचा शिक्षक, राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ चित्रपटात त्यांनी साकारलेलं शाळेच्या मुख्याध्यापकाचं पात्रं, ‘२ स्टेट्स’ चित्रपटात त्यांनी साकारलेलं आलीया भट्टच्या कडक वडिलांचं पात्रं, कलर्स टीव्हीवरच्या ‘मुक्ती बंधन’ या मालिकेत त्यांनी साकारलेलं मुख्य पात्रं आणि नेटफ्लिक्सवरच्या ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ मधल्या सान्या मल्होत्राच्या मीनाक्षी या पात्राच्या वडिलांचं त्यांनी साकारलेलं पात्रं या त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या आहेत.

लेखक म्हणून ‘परिंदा’खेरीज त्यांनी लिहिलेल्या ‘हजारो ख्वाईशे ऐसी’च्या मूळ कथालेखनासाठी आणि पट्कथालेखनासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराचा बहुमानही मिळालाय. ‘इस रात की सुबह नहीं’, ‘चमेली’ , ‘१९४२ : अ लव्ह स्टोरी’, ‘अर्जुन पंडित’ या चित्रपटांच्या पटकथाही त्यांनी लिहिल्या आहेत.

 

 

रविवारी रात्री शिव सुब्रमण्यम यांचं निधन झालं. ट्विटरवर त्यांचा फोटो शेअर करत त्यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त करत अभिनेते अनिल कपूर यांनी लिहिलंय, ” शिव यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला ‘परिंदा’ मध्ये आणि त्यानंतर ‘२४’मध्ये मिळाली आणि दोन्ही वेळेस ते असामान्य होते. या अप्रतिम अभिनेत्याचं कायमच स्मरण केलं जाईल. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.”

अभिनेत्री माधुरी दीक्षितनेही त्यांचा फोटो शेअर करत ‘आरआयपी’ असं लिहिलं आहे.

अर्जून कपूर हा अभिनेता ‘टू स्टेट्स’ या चित्रपटात त्यांच्यासोबत अनेक प्रसंगांमध्ये दिसला होता. त्यानेदेखील त्यांचा फोटो शेअर करून “तुमच्या आत्म्यास शांती मिळो, शिव सर. तुम्ही आमच्या कायम स्मरणात रहाल.” अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

आयेशा राझा मिश्रा या अभिनेत्रीने देखील “तुझ्या आत्म्यास शांती मिळो शिव. आणखी काय म्हणू? दुःखमुक्त हो आणि विश्रांती घे माझ्या मित्रा”, असा शोक व्यक्त केला आहे.

या अभिनेत्रीने फिल्म मेकर हंसल मेहता यांच्या बरोबरीने शिव यांच्या निधनासंदर्भात एक टिपण शेअर केलंय. त्यात त्यांनी म्हटलंय,” अत्यंत दुःखाने आम्ही तुम्हाला हे सांगतो की आम्हाला अतिशय प्रिय असलेल्या शिव सुब्रमण्यम या प्रतिष्ठित आणि थोर व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अत्यंत प्रतिभावान असलेल्या त्यांना व्यावसायिक आणि खाजगी जीवनात लोकांचं प्रेम आणि आदर मिळाला.”

याखेरीज पत्रकार बीना सरवार यांनीदेखील सोशल मीडियावरून त्यांना अलविदा करत त्यांचं निधन होण्याच्या काही महिन्यापूर्वीच त्यांच्या अवघ्या १६ वर्षांच्या असलेल्या जहान या मुलाचा ब्रेन ट्युमरने मृत्यू झाला होता अशी माहिती समोर आणली आहे.

सुब्रमण्यम यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो हीच प्रार्थना! असेच उत्तमोत्तम लेखक- अभिनेते इंडस्ट्रीला मिळत राहोत आणि कलेचा दर्जा उंचावत राहोत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version