नोटेवर गांधीजींचाच फोटो का बरं? अनेकांच्या मनात असणाऱ्या प्रश्नाचं परखड उत्तर…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
महात्मा गांधी यांना आपण रोजच पाहतो नाही का? अहो आपल्या नोटांवर असतात की हो ते! तर तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, महात्मा गांधीना भारताच्या चलनावर स्थान कसं मिळालं? त्यांचा फोटो नोटेवर कोठून आला?
इतर कोणाचा का नाही?
आज याच प्रश्नांशी निगडीत गोष्टी आपण जाणून घेऊया. म्हणजे “नोटांवर महात्मा गांधीजींचं का?” ही तुम्हाला सतावत असलेली शंका दूर होईल.
जेव्हा गांधीजी तत्कालीन भारत आणि बर्माचे (ब्रह्मदेश) राज्य सचिव म्हणून कार्यरत होते, तेव्हा ब्रिटीश राजनीतीतज्ञ फ्रेडरिक पेथिक लॉरेंस यांच्यासोबत त्यांची भेट झाली होती. या भेटीवेळीच एका अज्ञात फोटोग्राफरने त्या दोघांचा फोटो घेतला होता.
पुढे जाऊन हे छायाचित्र भारतीय चलनाचे ट्रेडमार्क बनले. प्रत्यक्षात हे गांधीजींचे खरे छायाचित्र आहे. कोणताही पोर्टेट फोटो वगैरे नाही.
या छायाचित्राचा वापर आरबीआयद्वारे १९९६ मध्ये महात्मा गांधीं सीरीजच्या नोटांवर करण्यात आला.
रिजर्व बँक ऑफ इंडियाद्वारे १९९६ मध्ये नोटांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे आज आपण भारतीय नोटांवर गांधीजींचे चित्र पाहत आहोत. परंतु ही काही सुरुवाती पासूनची गोष्ट नव्हे! १९९६ आधी नोटांवर अशोकस्तंभ अंकित होते.
–
- नोटांवर आडव्या रेषा का असतात? यामागचं अगदी खास कारण जाणून घ्या
- शंभराच्या नव्या नोटेवर झळकणारी भारतातील ‘ही’ ऐतिहासिक वास्तू कोणती? जाणून घ्या…
–
नवीन बदलानुसार अशोकस्तंभ डाव्या बाजूच्या खालच्या बाजूला छापण्यात आला आणि अशोकस्तंभाच्या जागी गांधीजींचे छायाचित्र छापण्यात आले.
आता ५ रुपयांच्या नोटेपासून २००० च्या नोटेपर्यंत सगळ्या नोटांवर गांधीजींचा फोटो छापलेला दिसतो.
या आधी १९८७ मध्ये जेव्हा पहिल्यांदा ५०० ची नोट चलनात आली तेव्हा गांधीजींचा वॉटरमार्क वापरला गेला होता.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
जून १९९६ मध्ये दहा रुपयांचे नोट चलनात आणले. त्या नोटीच्या समोरील बाजूवर गांधीजींचे छायाचित्र आणि पाठीमागे भारतातील प्राण्यांची छायाचित्र छापण्यात आली, ज्यामुळे भारतातील जैवविविधता अधोरेखित व्हायची.
नोटांच्या सध्याच्या सीरीजला महात्मा गांधी किंवा एमजी सीरीज म्हटले जाते. या सीरीजमध्ये सुरुवातीला १० आणि ५०० रुपयांच्या नोटा आल्या होत्या.
ऑक्टोंबर १९९७ मध्ये ५०० रुपयांची नोट चलनात आणली होती. या नोटीच्या समोरील बाजूस गांधीजींचे चित्र आणि पाठीमागे दांडी यात्रेचे चित्र होते.
या सत्याग्रहाची सुरुवात १२ मार्च १९३० रोजी गांधीजींनी भारतात इंग्रजांच्या मिठाच्या वर्चस्वाच्या विरोधात केली होती.
या आंदोलनात गांधीजी आणि त्यांच्या अनुयायांनी अहमदाबाद मधल्या साबरमती आश्रमापासून गुजरातच्या नवसारी मध्ये असलेले तटावरील गाव दांडीपर्यंत पदयात्रा काढली होती आणि ब्रिटीश सरकारला कर न भरता मीठ तयार केले होते.
याप्रकारे गांधीजींनी ५ एप्रिल १९३० रोजी मिठाचा कायदा तोडला होता.
आता आपण जाणून घेऊया की महात्मा गांधीचे चित्र नोटांवर का लावण्यात आले.
आपल्याला हे माहितच आहे की, नोटांवर राष्ट्रीय नेत्यांचे चित्र लावण्याची परंपरा जगभरात आहे. त्यामागचं दार्शनिक कारण आपल्या नेत्यांचा सन्मान हे जरी असलं, तरी खोट्या नोटा तयार करताना एखाद्या चेहऱ्याला जसंच्या तसं रिप्लिकेट करणं फार कठीण समजलं जातं.
म्हणूनच गांधीजींचा फोटो आपल्या नोटांमध्ये येण्यास सुरूवात झाली.
अर्थात, महात्मा गांधींचेच चित्र नोटांवर का लावण्यात येते या आपल्याकडील एक वादग्रस्त विषय आहे. तरीही गांधींनी केलेलं कार्य दुर्लक्षित करून चालणार नाही.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचे देखील अमुल्य योगदान आहे हे आपण विसरता कामा नये. त्यांचे हेच अमुल्य योगदान आणि संपूर्ण भारतीय जनतेमध्ये त्यांच्याविषयी असलेला आदर लक्षात घेऊनच त्यांच्या चित्राला भारताच्या चलनातील नोटांवर वापरण्यात आले आहे.
–
- या ‘गंभीर कारणा’साठी चक्क शून्य रुपयांची नोट बनवली गेली आहे, माहित्ये का?
- ८७.३% मुस्लिम असलेल्या देशाच्या नोटेवर गणरायाची प्रतिमा आली कुठून? वाचा…
–
नोटेवर महात्मा गांधीचं का असा प्रश्न अनेकवेळा विचारण्यात आला.
आपला देश हा विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक राज्याला आपल्या राज्यातील महानायकाचे चित्र नोटेवर असावे असे वाटते, ज्यात चूक काहीच नाही. पण हा वाद उकरून काढून त्यावरून राजकारण केले जाते आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो हे देखील नाकारता येणारे नाही.
राजस्थानमध्ये महाराणा प्रताप, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, तामिळनाडू मध्ये रजनीकांत, एम.जी.रामचंद्रन, बिहार मध्ये जयप्रकाश नारायण, पंजाब आणि हरियाणा मध्ये भगतसिंह, गुजरात मध्ये सरदार पटेल, उत्तरप्रदेश मध्ये जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी इत्यादींच्या नावावरून नेहमीच हा वाद उकरून काढला जात असे.
इतर कोणत्याही ठराविक धर्माच्या, समुदायाच्या नेत्याचा फोटो संपूर्ण जनतेने स्वीकार करणे अशक्य होते.
पण गांधीजी मात्र संपूर्ण भारताला मान्य होते. गांधीजी हे सर्वव्यापी होते. त्यांनी संपूर्ण भारतावर प्रेम केले – ते कोणत्या राज्याचे-समाजाचे म्हणून आजही ओळखले जात नाहीत.
तत्कालीन भारत त्यांना देवासमान मानत असे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांना प्रतिष्ठा होती.
जर आपण भारतातील इतर महान व्यक्ती आणि गांधीजी यांच्याकडे पाहिले तर आपल्या लक्षात येते की गांधींचेच छायाचित्र नोटीवर लावणे हा एकमेव तटस्थ पर्याय तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता आरबीआय समोर असावा.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.