महिलांनो, ”गरम होतंय” म्हणत ही चूक करत असाल तर पुढच्या उन्हाळ्यापर्यंत निम्मे केसही टिकणार नाहीत
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
शराब का नही ये तो उनके जुल्फोंका का कमाल है
जबसे देखी है उनकी जुल्फें मेरा हाल बेहाल है !!!!
केसांच्या कौतुकासाठी लिहिल्या गेलेल्या या ओळी किती समर्पक आहेत न??
छोट्या छोट्या मुलींपासून ते अगदी म्हातार्या कोतार्यांपर्यंत असे कुणीही सापडणार नाही ज्यांना आपले केस आवडत नाहीत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
आपले केस लांब सडक आणि मजबूत असावेत ही प्रत्तेकाची मनोमन इच्छा असते. त्या साठी बाजारात अनेक सौदर्य प्रसाधने ही उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू, तेल, साबण अशा अनेक गोष्टी आपण आपले केस चांगले राहावेत या साठी वापरत असतो.
जेवढे जमेल तेवढ्या छान पद्धतीने आपण केसांची निगा रखतो, वेगवेगळ्या स्टाइल करतो, आणि उन्हाळ्यात घामानी नको नको झाल की आपण कसलाही विचार न करता थेट केसांचा डोक्यावर अंबाडा बांधून टाकतो. पण त्यामुळे केसांचे होत असलेले नुकसान आपण लक्षात घेत नाहीत.
उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्या शरीराची प्रचंड लाही-लाही होते या दिवसांमध्ये सतत अंगावर पाणी घ्यावं आणि फॅनखाली किंवा एसीमध्ये बसून राहावं असं वाटते. या दिवसांत आपण पातळ आणि कॉटनचे कपडे वापरतो. वेगवेगळ्या प्रकारची थंड पेय, सरबते यांचा आस्वाद घेतो दिवसातून किमान दोन वेळा तरी आंघोळ करतो.
बाजारात उपलब्ध असणार्या सौन्दर्य प्रसाधनांचा वापर करून करुन आपल्याला कमीत कमी घाम येईल याची काळजीही घेतो. पण बाहेर उन्हाचा तडाखा इतका असतो की काही केल्या आपल्याला सहन होत नाही आणि आपण घामाघुम होऊन जातो. या काळात घाम येण्याच शरीरातील आणखी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे आपले केस आणि डोके!
स्त्री आणि पुरुष यांच्या केसांच्या ठेवणी मध्ये बराच फरक आहे. पुरूषांचे केस लहान असल्याने ते रोज डोक्यावरुन पाणी घेऊ शकतात परंतु मुलींचे आणि महिलांचे मात्र लांब सडक केस असल्याने रोज धुणे शक्य होत नाही. परिणामी केसांमधून घामाच्या धारा वाहने, केस चिकट होणे अशा समस्या उद्भवतात. अगदी रोजच्या सवयी प्रमाणे आपण आपले केस गोल गोल गुंढाळून त्याचा अंबाडा किवा पोनिटेल बांधतो. घामाचा त्रास टाळण्यासाठी शोधलेला हा उपाय मात्र काही कालावधी नंतर अपायकरक ठरतो.
आपण दिवसा शॅम्पू, स्टाइलिंग , ब्रशिंग करतो आणि रात्री आपण आपले केस वर उचलून त्याचा अंबाडा पडतो . दिवसभर हे सर्व करताना तुमचे केस खराब होतायत का? बहुतेकदा केस ओढल्यामुळे त्यांच्या मुळांना नुकसान होते आणि परिणामी याचे रूपांतर “ट्रॅक्शन अलोपेसिया” या व्याधीत होते. जिम्नॅस्ट, जलतरणपटू आणि बॅलेरिना यांना ही समस्या आली आहे, कारण बहुतेक वेळा त्यांना त्यांचे केस खूप घट्ट बांधावे लागतात.
अभ्यासकांनी असेही सूचित केले आहे की शीख पुरुषांना देखील केस सतत बांधल्यामुळे आणि पगडी घातल्यामुळे बहुतेक वेळा ट्रॅक्शन एलोपेशियाचा त्रास होतो.
आपल्या केसांसोबत जे काही करतो जसे त्यांना घट्ट बांधणे, केस ओढून वेणी घालणे, पिन लावणे याचा अतिशय वाईट परिणाम आपल्या केसांच्या आरोग्यावर होऊ शकतो. सौंदर्य तज्ज्ञ जेनेट फर्नांडिस म्हणतात की , जेव्हा तुम्ही तुमचे केस इलास्टिकने रबराने बांधता तेव्हा तुमचे केस तुटू लागतात. जेव्हा तुम्ही तुमच्या केसांना सतत वेणी घालता तेव्हा त्यांच्या तणावामुळे केसांचे नुकसान होते आणि परिणामी तुमचे केस शेवटी गळू लागतात.
आता घाम येऊ नये म्हणून आपण या पद्धतीने केस बांधत असलो तरी त्यामुळे केसांचे काय नुकसान होते हे पाहणे देखील आवश्यक आहे.
१. केस तुटणे
अनेकदा केस वरच्या बाजूला रबरने घट्ट बांधले जाऊन त्याचा आंबाडा घातला जातो. त्यावेळी तो बांधताना किंवा मोकळा सोडताना घामाने चिकट झालेले केस तुटतात.
आपण बळजबरीने ओढून ताणून रबराने केस बांधल्यामुळे ते ओढले जातात आणि त्यांची मुळे नाजूक होऊन केस तुटण्याची व गळण्याची समस्या वाढते. त्यामुळे तुम्ही केस वरती बांधत असाल तरी ते हलके राहतील याची काळजी घ्या.
२. इन्फेक्शन किंवा कोंडा यांची लक्षणे
केस वरती बांधल्यानंतर आपल्याला मानेवर आणि कानाच्या मागे घाम येणे जरी कमी होत असले तरी पण डोक्यात ज्या ठिकाणी केस आहेत त्याठिकाणी घाम येणे बंद होत नाही तो काहीही केल तरी येतोच.
केस घट्ट बांधल्याने व त्यांना हवा न लागल्याने घामामुळे याठिकाणी कोंडा होणे, इन्फेक्शन होणे किंवा केसांना घामाचा कुबट वास येणे अशा समस्या उद्भवू शकतात.
३. केस गळती आणि मुळे सैल होणे
अतिशय नाजूक असलेल्या आपल्या केसांना अतिशय हळुवार पणे हाताळणे आवश्यक असते. आपण घाईगडबडीत केस घेऊन ते गुंडाळतो आणि वर बांधून टाकतो. अशाप्रकारे केस घट्ट वर बांधल्याने त्यांची मुळे ओढली जातात आणि केस गळण्याची समस्या सुरू होते.
त्यामुळे केस वर बांधत असाल तरी हळूवार बांधायला हवेत. त्यांची मुळे ओढली जाणार नाहीत, त्यांना ताण पडणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
—
महिलांनो उन्हात बाहेर जाताय? मग या गोष्टी पर्समध्ये ठेवाच!
आंब्याची कोय आणि साल आपण फेकून देतो, पण त्यांचे “हे” औषधी गुणधर्म तुम्हाला माहितीयेत का?
—
४. केसांमध्ये होणारा गुंता
केस बराच वेळ वर बांधून ठेवल्यामुळे केसांमध्ये गुंता होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे केस सोडल्यानंतर कितीतरी वेळ केस विंचरले तरी हा गुंता निघत नाही. अशावेळी केसात जाळ्या होणे, केसांचा गुंता काढताना केस तुटणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे केस एकसारखे दोन भागांमध्ये विभागून मग हळूवापणे विंचरायला हवेत.
येथे आम्ही तुम्हाला काही अगदी सोपे उपाय सांगत आहोत जे तुम्ही लक्षात ठेवल्यास तुमचे केस सुंदर राहतील .
केसांचे तुटणे टाळण्यासाठी, आपली वेणी बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या धातूचा वापर न करणारे काहीतरी साधन वापरा.
स्कार्फ वापरणे हा केस बांधण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग असू शकतो.
ओले असताना केस बांधणे टाळा. ओल्या केसांवर लवचिक बँड घातल्याने तुमचे केस तुटू शकतात.
तुमच्या केसांना सुरक्षित ठेवण्यासाठी बाजारात उपलब्ध असणार्या उत्कृष्ट साधणांपैकी एक असे हेअर सीरम लावू शकता आणि तुटणे टाळण्यासाठी उंच पोनीटेल बनवू शकता.
विशेषतः झोपताना आपले केस मोकळे ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून उशीवर डोके फिरवताना केसांमध्ये घर्षण होणार नाही .
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.