झेरोधाच्या कर्मचाऱ्यांना मिळणार चक्क अर्धा पगार बोनस, पण अट अशी आहे की…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कोविड-१९ रोगाने जगाच्या जवळजवळ प्रत्येक भागाला प्रभावित केले आहे. सततचे लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होम, सोशल डिस्टन्सिंग, प्रवासावर निर्बंध, व्हिडिओ कॉल, मास्क, ई. मुळे लोकांच्या जीवनशैलीमध्ये फार मोठा बदल झाला आहे. तसेच दिवसभर स्क्रीनसमोर बसल्याने, जंक फूडचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्यामुळे आणि व्यायाम न केल्याने लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे.
अशा परिस्थितीत, निरोगी जीवनशैलीबद्दल काही काळापासून सतत चर्चा होत आहे. याच गोष्टीचा प्रचार करण्यासाठी झेरोधा (Zerodha) या वित्तीय सेवा देणाऱ्या कंपनीने एक अनोखा पुढाकार घेतला आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
या कंपनीने तंदुरुस्त कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा अर्धा पगार बोनस म्हणून देण्याची घोषणा केली आहे.
झिरोधाचे संस्थापक आणि सीईओ निखील कामथ यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जागतिक आरोग्य दिनी याची घोषणा केली आहे. ते म्हणाले, “पहिल्या लॉकडाऊननंतर, शारीरिक श्रमाच्या अभावामुळे, तसेच लोकांची बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या खराब सवयींमुळे ज्याप्रकारे इतर लोकांमध्ये शारीरिक समस्या निर्माण झाल्या. त्याच समस्या आमच्या कंपनीमधील कर्मचाऱ्यांमध्येही आढळून आल्या होत्या,
जसे की वाढलेले वजन आणि आळशीपणा. अशा परिस्थितीत आम्ही आमच्या टीम ला निरोगी ठेवण्यासाठी काही उपक्रम हाती घेतले आणि त्याचे परिणाम ही चांगले मिळाले आहेत.
अशाच एका उपक्रमात जर झेरोधा कर्मचाऱ्यांनी त्यांचे वजन कमी केले तर ते बोनस मिळविण्यासाठी पात्र असतील.
नितीन कामत यांनी सांगितले की, त्यांच्या कर्मचाऱ्यांचा सरासरी बॉडी मास इंडेक्स (BMI) २५.३ आहे. ते म्हणाले की जर झेरोधाच्या कर्मचाऱ्यांचा सरासरी BMI ऑगस्टपर्यंत २४ च्या खाली आला तर सर्व कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून १५ दिवसांचा पगार मिळेल. झिरोधा येथील बॉडी मास इंडेक्स किंवा बीएमआय २५ पेक्षा कमी असलेल्या कर्मचाऱ्यांना आम्ही बोनस म्हणून अर्ध्या महिन्याचे अधिकचे वेतन द्यायला सुरूवात करणार आहोत.
—
- वय वर्ष ३४, रोज कोटींची उलाढाल….श्रीमंत तरुणांची अविश्वसनीय यशोगाथा!
- श्रीमंत व्हायचंय? एका जाणकार माणसाचा सल्ला, फक्त ५ टिप्स!
—
बॉडी मास इंडेक्स म्हणजे काय ?
बॉडी मास इंडेक्स हे शरीराचे वजन आणि उंची यांचे गुणोत्तर आहे. किलोग्रॅम मधील वजनाला मीटर मधील उंचीच्या वर्गाने भागले असता बॉडी मास इंडेक्स कळतो. १८ ते २५ हा नॉर्मल बॉडी मास इंडेक्स मानला जातो. २५ ते ३० बॉडी मास इंडेक्स ला वाढलेले वजन असे मानले जाते. तर ३० च्या पुढील बॉडी मास इंडेक्स ला लठ्ठपणा असे म्हणतात.
असाच एक उपक्रम त्यांनी मागच्या वर्षी पण राबवला होता. ज्यात प्रत्येकाला कर्मचाऱ्याला आरोग्याशी संबंधित १२ महिन्यांचे लक्ष्य सेट करण्यास सांगितले होते आणि या उपक्रमाध्ये सहभाग लोकांची वाढवण्यासाठी, लक्ष्य गाठणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बोनस म्हणून एक महिन्याचा पगार मिळेल आणि लकी ड्रॉ विजेत्याला १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे त्यांनी मागील वर्षी जाहिर केले होते.
वर्क फ्रॉम होम दरम्यान तुम्ही तुमचा फिटनेस कसा सुधारू शकता ?
कदाचित तुमची कंपनी तुम्हाला फीट राहण्यासाठी बोनस देत नसेल, परंतु तरीही आपण आपल्या शरीराला सुदृढ आणि लवचिक ठेवण्याचा प्रयत्न करावा. यासाठी प्रत्येक तासानंतर ५-१० मिनिटांचा ब्रेक घेऊन चालले पाहिजे आणि आपले हातपाय ताणण्याचे हल्के व्यायाम केले पाहिजे.
वर्क फ्रॉम होम मध्ये पलंगावर झोपून काम न करता खुर्ची वर नीट व्यवस्थित बसून काम करावे.
शक्य असेल तेवढ साखर आणि तेलकट पदार्थ टाळावे. दिवसातून एकदा तरी फळे खा आणि सकाळचा नाश्ता कधीही वगळू नका. जीवनशैलीतील हे छोटे बदल तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.
आता, तुमचे संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक कितीही पॅक असले तरीही, किमान २० मिनिटे ते अर्धा तास तरी व्यायामासाठी वेळ काढा. अशी अनेक अॅप्स आहेत जी तुम्हाला व्यायामामध्ये मदत करू शकतात. जर व्यायाम करणे खूप अवघड असेल तर तुम्ही नाचणे किंवा दोरीवर उडी मारणे यांसारख्या सोप्या गोष्टी करू शकता.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.