कुठली अंडी बनावट आहेत ओळखण्यासाठी सोप्या आणि खात्रीशीर ८ टिप्स..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आजकाल भल्याचा जमानाच राहिला नाही. घोर कलियुग आहे हेच खरं! लोक बनावट ब्रँडचे कपडे, शूज, इलेक्ट्रॉनिक गोष्टी, सोनं, हिरे, सौंदर्यप्रसाधने इथपासून ते बनावट नाणी व नोटा बनवत होते इथपर्यंत ठीक होतं.
पण काही स्वार्थी लोक ह्यापुढेही जाऊन अन्नपदार्थांत भेसळ, प्लास्टिकचे तांदूळ, केमीकल्सयुक्त दूध, बनावट औषधे, बनावट भाजीपाला हे सुद्धा साध्याभोळ्या ग्राहकांच्या माथी मारून त्यांच्या जीवाशी खेळू लागले तेव्हा हे घोर कलियुग आहे असंच म्हणावं लागेल.
प्लास्टिकचे तांदूळ, केमीकल्सयुक्त दूध यात बनावट अंड्यांचीही आता भर पडली आहे. म्हणजेच प्रोटीनसाठी, तब्येत सुधारण्यासाठी खायची अंडी आता आपल्या अनवधानाने चुकून बनावट असली तर तब्येत सुधारण्याऐवजी बिघडणार हे नक्की!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
चीनमधून सध्या भारत, पाकिस्तान व बांग्लादेशच्या बाजारात बनावट अंड्यांचा सुळसुळाट झाला आहे. अशीच बनावट अंडी विकताना आढळल्यामुळे दुकानदाराला पोलिसांनी अटक केल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत.
–
–
रिपोर्ट असे सांगतात की,
ह्या बनावट अंड्यांचा बाहेरचा भाग हा कॅल्शियम कार्बोनेट, पॅराफिन वॅक्स आणि जिप्सम पावडर ह्यापासून तयार करतात व आतील पांढरा बलक सोडियम अल्जिनेट, तुरटी, जिलेटीन, एडिबल कॅल्शियम क्लोराईड, बेंझॉइक ऍसिड, पाणी व खाण्याचे रंग ह्यापासून बनवतात.
या केमिकल्समुळे अनेक घातक शारीरिक आजार उद्भवतात.
यामुळे मेटाबॉलिजमची समस्या निर्माण होते तसेच मेंदू आणि मज्जातंतूच्या पेशींची हानी होते, यकृताचे आजार तसेच रक्तनिर्मितीत अडथळे निर्माण होण्याची शंका असते.
आता ही बनावट अंडी अस्सल अंड्याप्रमाणेच अगदी बेमालूम बनवलेली असतात त्यामुळे आपली गफलत होण्याची दाट शक्यता असते.
परंतु अस्सल ते अस्सलच!
पारखी नजरेला बनावट व अस्सलतेमध्ये फरक करता येतो. त्यामुळे काळजी करू नका! आज आम्ही तुम्हाला बनावट अंडी कशी ओळखायची याच्या काही टिप्स सांगणार आहोत म्हणजे पुढच्या वेळी अंडी घेताना तुम्ही फसवणूक टाळू शकाल.
१. बनावट अंड ओळखण्याची पहिली खूण म्हणजे खऱ्या अंड्याच्या वरचा भाग (टरफल) जास्त चकाकत नाही तर बनावट अंड्याचा बाहेरचा भाग चांगला चकाकतो.
२. खऱ्या अंड्याचे टरफल हे थोडे खडबडीत असते तर बनावट अंड्याचे टरफल हे अत्यंत गुळगुळीत असते.
३. अंडे फोडण्याआधी ते हलवून बघा. जर तुम्हाला आतून पाण्याचा आवाज आला तर ते अंडे बनावट आहे हे नक्की!
४. अंडे फोडण्याआधी त्यावर थोडे टॅप करून बघा. त्यावर टॅप केल्यानंतर क्रिस्प आवाज येत असेल तर ते अंडे अस्सल आहे.
–
–
५. जर अंडे बनावट असेल तर तुम्ही ते फोडल्यानंतर त्यातील पिवळा व पांढरा बलक तव्यावर लगेच एकत्र झालेला तुम्हाला दिसेल. कारण हे दोन्हीही भाग एकाच पदार्थातून कृत्रिमरित्या तयार केलेले असतात.
अस्सल अंड्याचा पिवळा व पांढरा बलक आपण फेटल्याशिवाय एकत्र होत नाही.
६. बनावट अंड्याच्या आत एक रबरासारखे आवरण असते जे अस्सल अंड्यात नसते.
७. खऱ्या अंड्याला कच्च्या मांसासारखा एक विशिष्ट वास येतो परंतु कृत्रिम अंड्याला कुठल्याही प्रकारचा वास येत नाही.
८. खऱ्या अंड्यावर बऱ्याच वेळा माश्या किंवा मुंग्या असतात पण बनावट अंड्यांवर कधीही माश्या किंवा मुंग्या बसत नाहीत.
पुढच्या वेळी अंडी घेताना ह्या आठ गोष्टी लक्षात ठेवा आणि स्वतःची फसवणूक टाळा.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.