Site icon InMarathi

त्याच्याकडे एवढा पैसा होता की, करोडो रुपये वर्षाला अगदी ‘कुजून’ जायचे!

Pablo escobar IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

ड्रग्स किंवा तत्सम अंमली पदार्थ आणि त्यांचा होणार अवैध व्यापार आपल्याला नवीन नाही, जगातील प्रत्येक देशात आगदी जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ही कीड लागलेली आहे आणि दिवसेंदिवस पसरत चालली आहे.

या ड्रग मार्केट आणि ड्रग माफिया ची राजधानी कोणती असेल तर ते मेक्सिको शहर, बऱ्याच लोकांच असंही म्हणण आह की यामध्ये सर्वात महत्वाचा भाग कुणाचा असेल तर तो अमेरिकेचा, पण ते खरं का खोटं करण्यात काही अर्थ नाही.

 

 

कारण एकेकाळी मेक्सिकन ड्रग वॉर ने घेतलेले भयानक स्वरूप आणि त्याचे पडसाद आपण पहिले आहेतच! आजही परिस्थिति फारशी सुधारलेली नाही!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आजही तिथे या ड्रग वॉर ने तसंच भयानक रूप धारण केलं जातं, या सगळ्या ड्रग वरुन चाललेल्या हिंसाचारात, आणि गॅंगवॉर मध्ये होणाऱ्या चकमकीत निर्दोष लोकं आणि पोलिस अधिकारी यांना नाहक जीव गमवावा लागतो!

 

मध्यंतरी मेक्सिकोचा प्रसिध्‍द अंमलीपदार्थांचा तस्कर अल चापोला तिस-यांदा तुरुंगातून पळून गेल्याची अफवा पसरली होती. मात्र हे खरे नव्हते. जवळजवळ दोन दशकापूर्वी जगभरात ड्रग लॉर्ड पाब्लो एमिलियो एस्कोबर गॅविरियाचे देखील असेच नाव घेतले जात होते.

तो जगातील सर्वात श्रीमंत व हिंसक ड्रम माफीया होता. त्याला २४ वर्षांपूर्वी एका चकमकीत मारण्‍यात आले होते.

 

 

मध्यंतरी नेटफ्लिक्स या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर ‘नारकोस’ नावाची एक वेबसिरीज सुद्धा रिलीज केली गेली, या वेब सिरिज ची सुरुवात च ड्रग लॉर्ड पाब्लो एस्कोबार च्या कहाणीने  झाली आणि हळू हळू मेक्सिको मधल्या सगळ्या ड्रग माफीयांची या सिरिज ने पोलखोल करायला सुरुवात केली!

भारतात तर ही सिरिज प्रचंड गाजली आणि संपूर्ण जगभरातच लोकांच्या ती सिरिज पसंतीस पडली!

 

यात पाब्लो एस्कोबार बद्दल अत्यंत बारकाईने आणि अभ्यासपूर्वक मांडणी करून त्याने जगाला हा ड्रग्सचा कॅन्सर कसा दिला याबाबत सगळी माहिती दिली आहे!

पाब्लो हा एक कसलेला, अट्टल ड्रग लॉर्ड होता, मेक्सिकन तसेच अमेरिकन सरकार आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांना त्याने कशाप्रकारे त्रास दिला, आणि शेवट तर त्याने स्वतःसाठी एक वेगळ तुरुंग बांधायला लावलं इथवर सगळया सिरिज मध्ये दाखवलं आहे!

 

 

त्यासोबतच त्याच्या बरोबर काम करणारे त्याचे सोबती जेंव्हा त्याच्या विरुद्ध कट कारस्थान करू लागले तेंव्हा हा पाब्लो एकटाच त्या सगळ्यांवर भारी पडला होता, पान तरीही समाजात हे विष पसरवणाऱ्या पाब्लो चा शेवट अगदी नाट्यमय आणि अपेक्षित असाच झाला!

असे लोकं कितीही धाडसी असले तरी समाजासाठी ते घातकच असतात!

 

 

पाब्लो एमिलियो एस्कोबार गॅविरिया एक कोलंबियन ड्रग माफीया होता. तो कोकिन या अंमलीपदार्थाचा व्यापार करत होता. पाब्लोचा भाऊ रॉबर्टो एस्कोबारचे पुस्तक ‘ द अकाउंट्स स्टोरी’ नुसार, तो एका दिवशी १५ टन कोकिनची तस्करी करत होता.

१९८९ मध्‍ये फोर्ब्स मासिकाने एस्कोबारला जगातील ७ वा सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान दिला होता.

त्याची खासगी अंदाजित संपत्ती ३० अब्ज डॉलर इतकी होती. त्याच्याकडे अनेक लक्झरी बंगले व गाड्या होत्या.

 

 

पाब्लोचा भाऊ रॉबर्टोच्या म्हणण्यानुसार, पाब्लोचा वार्षिक नफा २६ हजार ९८८ कोटी रुपये इतका होता. त्यावेळी गोदामात ठेवलेल्या या रक्कमेतील १० टक्के भाग उंदरांनी खाल्ले होते.

पाणी किंवा इतर कारणांमुळे काही रक्कम तर अशीच कुजून जात होती.

रॉबर्टोनुसार, तो १ लाख ६७ हजार प्रत्येक महिन्याला नोटांचे बंडल बांधण्‍यासाठी रबर बँडवर खर्च करत होता.

१९८६ मध्‍ये त्याने कोलंबियाच्या राजकारणात शिरकाव करण्‍याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने देशाला ५.४ अब्जांचे राष्‍ट्रीय कर्ज देण्‍याची इच्छा व्यक्त केली होती.

 

 

१९७ मध्‍ये २६ व्या वर्षी पाब्लोने १५ वर्षांच्या मारिया व्हि‍क्टोरियाशी विवाह केला. त्यांना जुआन व मॅन्युएला असे दोन मुले झाली होती.

एस्कोबारने ५ हजार एकरात पसरलेले हैसियेंदा नॅपोलेस नावाचे एक आलिशान इस्टेट तयार केले होते. त्याचे कुटुंब यात राहत होते.

यासोबतच त्याने ग्रीक पध्‍दतीचा एक किल्ला बांधण्‍याचा संकल्प देखील केला होता.  किल्ल्याचे बांधकाम सुरु झाले होते. मात्र त्याचे काम कधीच पूर्ण झाले नाही.

त्याची शेती, प्राणीसंग्रहालय आणि किल्ल्याला सरकारने आपल्या ताब्यात घेतले व १९९० मध्‍ये एक कायदा करुन सामान्य लोकांना राहण्‍यासाठी देऊन टाकले. ही मालमत्ता आता एका थीम पार्कच्या रुपात पाहायला मिळते.

 

पाब्लोची संपूर्ण कथा चित्ररुपात पहायची असल्यास ‘नार्कोज’ ही टीव्ही सिरीज नक्की पहा! 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :


===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version